पोस्ट्स

मराठवाडा मुक्ती संग्रामातील एकजूट प्रेरणादायी - प्रा. डॉ. आर्य

इमेज
 मराठवाडा मुक्ती संग्रामातील एकजूट प्रेरणादायी - प्रा. डॉ. आर्य प्रतिनिधी परळी वैजनाथ : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. हर्षवर्धन आर्य यांनी (दि.१२) सप्टेंबर रोजी उपरोक्त मत व्यक्त केले.                 शहरातील थर्मल कॉलनी परिसरातील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लातूर येथील इतिहास तज्ञ प्रा. डॉ. हर्षवर्धन आर्य यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यामध्ये झालेले अन्याय, अत्याचार, सामाजिक परिस्थिती व त्यामध्ये मराठवाड्यातील सामाजिक ऐक्य, तत्कालीन काळातील परिस्थिती त्यातून समाजाला मिळालेले संस्कार , दिलेला लढा व सामाजिक एकोपा याचे सुसूत्र पद्धतीने पुराव्यानिशी सादरीकरण करू

वैद्यनाथ कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्युवमध्ये 55 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

इमेज
  वैद्यनाथ कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्युवमध्ये 55 विद्यार्थ्यांनी  नोंदवला सहभाग परळी प्रतिनिधी ---येथील जवाहर शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ कॉलेज आणि एन आय आय टी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12/ 09/ 2023 रोजी कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले. आय सी आय सी आय बँकेत वरिष्ठ अधिकारी या पदावर पात्र विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे, ही मुलाखत घेण्यासाठी विभागीय व्यवस्थापक श्री अक्षय मिसाळ उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर डी राठोड उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅम्पस इंटरव्यू समन्वयक डॉ. व्ही जे चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.एम जी लांडगे तर आभार प्रा वाय डी रेड्डी यांनी मानले, या मुलाखतीसाठी महाविद्यालयातील जवळपास 55 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळास निर्देश

इमेज
  मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया  उद्योगाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळास निर्देश कृषी उद्योग विकास महामंडळाच्या  संचालक मंडळाची बैठक कृषी मंत्री  धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न मुंबई दि.12 सप्टेंबर 2023: मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया  उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मार्फत आराखडा तयार करावा, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक कृषी मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे  संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डाँ. मंगेश  गोंदावले आणि महाव्यवस्थापक सुजित पाटील, संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळच्या 2022-23  या वित्तीय वर्षाच्या लेख्यांना मान्यता देण्यात आली. मराठवाड्यात सोयाबीन सिताफळ तसेच इतर कृषी व फळ प्रक्रिया उद्योगाच्या विस्ता

Maratha Reservation: स्थगित नाहीच, फक्त शिथील! जरांगे पाटलांकडून अखेर सरकारला एक महिन्याचा वेळ

इमेज
  Maratha Reservation: स्थगित नाहीच, फक्त शिथील! जरांगे पाटलांकडून अखेर सरकारला एक महिन्याचा वेळ जालना- गेल्या पंधरा दिवसांपासून जा उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. मात्र, आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं ते म्हणाले आहेत. सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे, पण सर्वसामान्य मराठा समाजाला महिन्यानंतर आरक्षण मिळालंच पाहिजे, असं ते म्हणाले. अहवाल कसाही आला तरी महिन्याभरानंतर राज्यात मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप करावंच लागेल. महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल केलेत ते मागे घेण्यात यावेत. दोषी पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री या सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. सर्वकाही मला लिहून द्यावं लागेल, अशा अटी त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत.        मराठा समाजाची बदनामी होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. उपोषण सोडताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन्ही राजे आले पाहिजेत, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. एक महिन्याचा वेळ देत आहे. पण, आंदोलन स्थळावरुन मी हट

PHOTO FEATURE :परळीत अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्तांची अलोट गर्दी!(संपूर्ण फोटो)

इमेज
  परळीत अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्तांची  अलोट गर्दी!

परळी तालुका क्रीडा स्पर्धेची शानदार सुरुवात

इमेज
  परळी तालुका क्रीडा स्पर्धेची शानदार सुरुवात          परळी/प्रतिनिधी क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे  अंतर्गत बीड जिल्हा क्रीडा कार्यालय द्वारा आयोजित परळी त्यालुका क्रीडा स्पर्धेचे आज सोमवार (ता.११) वैद्यनाथ महाविद्यालय च्या मैदानावर शानदार सुरुवात झाली आहे.         वैद्यनाथ महाविद्यालय येथील मैदानावर सोमवारी (ता ११) १४, १७ व १९ वर्ष मुले व मुली यांच्यातील कुस्ती व योगासने या स्पर्धा संपन्न झाल्या         या सपर्धेसाठी वैद्यनाथ महाविद्यालयचे प्राचार्य डॉ आर जी राठोड हे अध्यक्षस्थानी होते. तर जेष्ठ विस्तार अधिकारी श्री पल्लेवाड , क्रीडा शिक्षक डॉ पी एल कराड , उपप्राचार्य हरीश मुंडे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सुभाष नानेकर, तालुका क्रीडा अध्यक्ष एस पी मुंडे, पोलीस हवालदार श्री गित्ते , मराठी विभाग प्रमुख रामेश्वर चाटे , इतिहास विभाग प्रमुख  प्रा शेप , प्रा अतुल दुबे यांच्या प्रमुख उपस्थिती स्पर्धेचे उद्घाटन झाले. परळी तालुका व शहर गटातून अतिशय मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला ,          स्पर्धेची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने या पूर्वीच झाली असल्यामुळे स्पर्धा अतिशय स

शिव-शक्ती परिक्रमा हे प्रदर्शन नाही तर हीच वास्तविक शक्ती ; परिक्रमा पराक्रम ठरणार

इमेज
प्रीतमला मी देणारी आहे ; तीचं घेणार नाही- पंकजा मुंडेंनी  व्यक्त केल्या भावना शिव-शक्ती परिक्रमा हे प्रदर्शन नाही तर हीच वास्तविक शक्ती ; परिक्रमा पराक्रम ठरणार परळी वैजनाथ ।दिनांक ११। मी देणारी आहे, घेणारी नाही. मी प्रीतमला देण्याच्या भूमिकेत आहे, मी तिची आई आहे, बाप आहे, मोठी बहिण आहे. तिला डावलून मी राजकारणात काम करणार नाही. महाराष्ट्रानं, पक्षानं, जगानं समजून घ्यावं, प्रीतम मुंडे उचलून मी स्वःला बसवणार नाही अशा भावना व्यक्त करत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना विराम दिला.       ४ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या शिव-शक्ती परिक्रमेचा समारोप आज झाला, त्यावेळी मतदारसंघातील उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमोर त्या बोलत होत्या. पंकजाताई म्हणाल्या, २०१९ मध्ये जेवढी माझी शक्ती होती, तेवढी २४ मध्ये असेल की नाही सांगता येत नाही पण  प्रार्थना करते की मी जशी शुन्य झाले आणि नंतर स्वतःला घडवले तसं प्रीतमने स्वतःला निर्माण करावं. माझा तिला आशीर्वाद आहे.  शक्ती प्रदर्शन नाही..ही तर शक्तीचं -------- शिव-शक्ती परिक्रमेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला, स्व

ध्यान साधना अन् आंतरिक उर्जा

इमेज
  पंकजा मुंडे, खा.प्रितम मुंडेंनी अभिषेक करत घेतलं प्रभू वैद्यनाथाचं दर्शन शिव-शक्ती परिक्रमेच्या समारोपालाही तितकीच सात्विकता ; महामृत्यूंजय जपाने निर्माण झाली आंतरििक उर्जा परळी वैजनाथ ।दिनांक ११। शिव-शक्ती परिक्रमेतंर्गत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज अखेरच्या श्रावण सोमवारी प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगास अभिषेक करत दर्शन घेतलं. परिक्रमेचा समारोपही आज मोठ्या उत्साहात व तितक्याच सात्विक भावनेनं झाला.     ४ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या शिव-शक्ती परिक्रमेचा आज अखेरच्या श्रावण सोमवारी परळीत समारोप झाला. प्रवचन मंडप येथे यानिमित्त महामृत्यूंजय जप पठणाचे आयोजन करण्यात आले होते. समारोपा पूर्वी पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सकाळी प्रभू वैद्यनाथास विधिवत पूजन व अभिषेक करून दर्शन घेतले.  ध्यान साधना अन् आंतरिक उर्जा -------- पंकजाताई मुंडे यांनी आपल्या कुलदेवतेचे म्हणजे माहूरच्या  श्री रेणुकामातेचे दर्शन घेऊन परिक्रमेला सुरवात केली होती. पाच हजार किमी चा प्रवास करून  ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठाचे त्यांनी दर्शन घेतले. या परिक्रमेचा सम