मराठवाडा मुक्ती संग्रामातील एकजूट प्रेरणादायी - प्रा. डॉ. आर्य

 मराठवाडा मुक्ती संग्रामातील एकजूट प्रेरणादायी - प्रा. डॉ. आर्य

प्रतिनिधी परळी वैजनाथ : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. हर्षवर्धन आर्य यांनी (दि.१२) सप्टेंबर रोजी उपरोक्त मत व्यक्त केले.

                शहरातील थर्मल कॉलनी परिसरातील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लातूर येथील इतिहास तज्ञ प्रा. डॉ. हर्षवर्धन आर्य यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यामध्ये झालेले अन्याय, अत्याचार, सामाजिक परिस्थिती व त्यामध्ये मराठवाड्यातील सामाजिक ऐक्य, तत्कालीन काळातील परिस्थिती त्यातून समाजाला मिळालेले संस्कार , दिलेला लढा व सामाजिक एकोपा याचे सुसूत्र पद्धतीने पुराव्यानिशी सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम यामध्ये मराठवाड्यातील जनतेचे प्रेरणादायी कार्य सांगितले. यावेळी मंचावर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ सदस्य उत्तमरावजी देशमुख , प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. हर्षवर्धन आर्य, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य अजय सोळंके सर, प्राचार्य बी.ए नाईकनवरे, प्रभारी प्राचार्य आर.एस. स्वामी, जेष्ठ प्रा.राजू कोकलगावे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजू कोकलगाव यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अंकुश वाघमारे यांनी तर आभार प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वंदांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?