Maratha Reservation: स्थगित नाहीच, फक्त शिथील! जरांगे पाटलांकडून अखेर सरकारला एक महिन्याचा वेळ

 Maratha Reservation: स्थगित नाहीच, फक्त शिथील! जरांगे पाटलांकडून अखेर सरकारला एक महिन्याचा वेळ


जालना- गेल्या पंधरा दिवसांपासून जा उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे. मात्र, आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

सरकारला एक महिन्याचा वेळ दिला आहे, पण सर्वसामान्य मराठा समाजाला महिन्यानंतर आरक्षण मिळालंच पाहिजे, असं ते म्हणाले.

अहवाल कसाही आला तरी महिन्याभरानंतर राज्यात मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप करावंच लागेल. महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल केलेत ते मागे घेण्यात यावेत. दोषी पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री या सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. सर्वकाही मला लिहून द्यावं लागेल, अशा अटी त्यांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत.
       मराठा समाजाची बदनामी होऊ नये यासाठी हा
निर्णय घेतला आहे. उपोषण सोडताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन्ही राजे आले पाहिजेत, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. एक महिन्याचा वेळ देत आहे. पण, आंदोलन स्थळावरुन मी हटणार नाही. समाजाने गैरसमज करु नये. ४० वर्षे दिले आहेत, आता आणखी एक महिना देऊ, असं जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील यांनी सरकारसमोर ठेवलेल्या अटी

१) अहवाल कसाही आला तरी मराठ्यांना ३१ व्या दिवशी प्रमाणपत्र द्या

२) आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

३) लाठीहल्ला केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा

४) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळ अन् उदयराजे भोसले, संभाजीराजे भोसले,(सरकारच्या अन् मराठ्यांच्या मध्ये हे दोन राजे) यांच्या वतीने टाईम बाँडवर लिहून द्या, मग मी उपोषण सोडतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !