इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

परळी तालुका क्रीडा स्पर्धेची शानदार सुरुवात

 परळी तालुका क्रीडा स्पर्धेची शानदार सुरुवात 



        परळी/प्रतिनिधी

क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे  अंतर्गत बीड जिल्हा क्रीडा कार्यालय द्वारा आयोजित परळी त्यालुका क्रीडा स्पर्धेचे आज सोमवार (ता.११) वैद्यनाथ महाविद्यालय च्या मैदानावर शानदार सुरुवात झाली आहे.

        वैद्यनाथ महाविद्यालय येथील मैदानावर सोमवारी (ता ११) १४, १७ व १९ वर्ष मुले व मुली यांच्यातील कुस्ती व योगासने या स्पर्धा संपन्न झाल्या 

       या सपर्धेसाठी वैद्यनाथ महाविद्यालयचे प्राचार्य डॉ आर जी राठोड हे अध्यक्षस्थानी होते. तर जेष्ठ विस्तार अधिकारी श्री पल्लेवाड , क्रीडा शिक्षक डॉ पी एल कराड , उपप्राचार्य हरीश मुंडे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सुभाष नानेकर, तालुका क्रीडा अध्यक्ष एस पी मुंडे, पोलीस हवालदार श्री गित्ते , मराठी विभाग प्रमुख रामेश्वर चाटे , इतिहास विभाग प्रमुख  प्रा शेप , प्रा अतुल दुबे यांच्या प्रमुख उपस्थिती स्पर्धेचे उद्घाटन झाले. परळी तालुका व शहर गटातून अतिशय मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला , 

        स्पर्धेची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने या पूर्वीच झाली असल्यामुळे स्पर्धा अतिशय सुरळीत पार पडल्या. स्पर्धेचे प्रास्ताविक विलास अरगडे यांनी केले तर प्रास्ताविक अजय जोशी यांनी केले , 

      या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विजय मुंडे , प्रा डॉ जगदीश कावरे , मदन कराड , रामचंद्र गडदे , केशव गित्ते, बाळू भातांगले यांनी परिश्रम घेतले. आभार क्रीडा संयोजक संजय देशमुख यांनी मानले. स्पर्धेतील विजयी स्पर्धक १४ वर्ष वयोगट मुले 

१) ३५ की लो शेजुळ अर्णव 

२) ३८ किलो कुंडगर  रोहित 

३) ४४ किलो मिसाळ महारुद्र

४) ४८ किलो गित्ते दीपक 

     १४ वर्ष वयोगट मुली 

१) ३० किलो कु सलगर यशश्री

२) ३९ किलो कू मोरे कोमल 

३) ५० किलो कु नगराळे गौरी

१७ वर्ष वयोगट मुले

१) ४१ किलो चि मुंडे सुजल 

२) ४६ किलो चि चाटे व्यंकटेश 

३) ४९ किलो चि सानप आदित्य 

४)५२किलो चि चव्हाण अभिजित

५)५६किलो चि कुकर विश्वजित 

१९ वर्ष वयोगट मुले

१) ५७ किलो घाडगे रोहन 

२) ६१ किलो ठोंबरे प्रसाद 

३) ६५ किलो चाटे गोविंद 

४) ८६ किलो कांदे प्रशांत 

१९ वर्ष वयोगट मुली 

१) ५० किलो गित्ते पूनम 

२) ६८ किलो मुंडे पूजा 


•••











       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!