ध्यान साधना अन् आंतरिक उर्जा

 पंकजा मुंडे, खा.प्रितम मुंडेंनी अभिषेक करत घेतलं प्रभू वैद्यनाथाचं दर्शन

शिव-शक्ती परिक्रमेच्या समारोपालाही तितकीच सात्विकता ; महामृत्यूंजय जपाने निर्माण झाली आंतरििक उर्जा

परळी वैजनाथ ।दिनांक ११।

शिव-शक्ती परिक्रमेतंर्गत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आज अखेरच्या श्रावण सोमवारी प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगास अभिषेक करत दर्शन घेतलं. परिक्रमेचा समारोपही आज मोठ्या उत्साहात व तितक्याच सात्विक भावनेनं झाला.


    ४ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या शिव-शक्ती परिक्रमेचा आज अखेरच्या श्रावण सोमवारी परळीत समारोप झाला. प्रवचन मंडप येथे यानिमित्त महामृत्यूंजय जप पठणाचे आयोजन करण्यात आले होते. समारोपा पूर्वी पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सकाळी प्रभू वैद्यनाथास विधिवत पूजन व अभिषेक करून दर्शन घेतले. 


ध्यान साधना अन् आंतरिक उर्जा

--------

पंकजाताई मुंडे यांनी आपल्या कुलदेवतेचे म्हणजे माहूरच्या  श्री रेणुकामातेचे दर्शन घेऊन परिक्रमेला सुरवात केली होती. पाच हजार किमी चा प्रवास करून  ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठाचे त्यांनी दर्शन घेतले. या परिक्रमेचा समारोपही तितक्याच सात्विकतेने व्हावा यासाठी महामृत्यूंजय जप पठणाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने यात सहभागी झाले होते. भगवान श्री शंकराच्या या महामृत्यूंजय जप साधनेने सभोवताली एक वेगळीच आंतरिक उर्जा निर्माण झाली. पंकजाताई व प्रितमताई सोबत हजारो भाविक व कार्यकर्त्यांनी या जपाचे पठण केले. मोठया भक्ती भावनेने सुरू झालेला परिक्रमेचा विराम साधनेने झाला. दरम्यान, परिक्रमेच्या यशस्वीतेबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ज्येष्ठ नेते राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी पंकजाताईंचा पुष्पहार घालून सत्कार केला.

••••











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?