कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळास निर्देश

 मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया  उद्योगाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करा

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळास निर्देश

कृषी उद्योग विकास महामंडळाच्या  संचालक मंडळाची बैठक कृषी मंत्री  धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मुंबई दि.12 सप्टेंबर 2023:

मराठवाडा विभागात कृषी प्रक्रिया  उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मार्फत आराखडा तयार करावा, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.


महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक कृषी मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे  संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डाँ. मंगेश  गोंदावले आणि महाव्यवस्थापक सुजित पाटील, संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.


यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळच्या 2022-23  या वित्तीय वर्षाच्या लेख्यांना मान्यता देण्यात आली. मराठवाड्यात सोयाबीन सिताफळ तसेच इतर कृषी व फळ प्रक्रिया उद्योगाच्या विस्ताराची क्षमता मोठी असून त्याचा सविस्तर अभ्यास करून आराखडा तयार करण्यात यावा. शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा होण्याच्या दृष्टीने महामंडळाने व्यापक आराखडा करावा असेही निर्देश त्यांनी दिले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?