वैद्यनाथ कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्युवमध्ये 55 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग
परळी प्रतिनिधी ---येथील जवाहर शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ कॉलेज आणि एन आय आय टी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12/ 09/ 2023 रोजी कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले. आय सी आय सी आय बँकेत वरिष्ठ अधिकारी या पदावर पात्र विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे, ही मुलाखत घेण्यासाठी विभागीय व्यवस्थापक श्री अक्षय मिसाळ उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर डी राठोड उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅम्पस इंटरव्यू समन्वयक डॉ. व्ही जे चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ.एम जी लांडगे तर आभार प्रा वाय डी रेड्डी यांनी मानले, या मुलाखतीसाठी महाविद्यालयातील जवळपास 55 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा