पोस्ट्स

देश-विदेशातील घडामोडी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS:शिवाचार्यांची विशेष उपस्थिती; आशिर्वादासह संसारोपयोगी साहित्य प्रदान

इमेज
  मोठा सामाजिक सहभाग, मंत्रोच्चार व सनई चौघड्याच्या निनादात  वीरशैव समाजाचा सामुहिक विवाह सोहळा  News by Santosh Jujgar शिवाचार्यांची विशेष उपस्थिती; आशिर्वादासह संसारोपयोगी साहित्य प्रदान प रळी /संतोष जुजगर........ परळी वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वीरशैव समाज सामुहिक विवाह सोहळा आज बुधवार दि.7 जुन रोजी हालगे गार्डन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळयात वधु वरांना आशिर्वाद देण्यासाठी शिवाचार्यांसह समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती. सनई चौघड्यांच्या निनादात अक्षदा कार्यक्रम पार पडला.  प.पू.ष.ब्र.श्री 108 तपोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्या प्रेरणेने वीरशैव समाज परळीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आयोजित वीरशैव समाज सामूहिक विवाह सोहळा बुधवार दिनांक 7 जून रोजी थाटात संपन्न झाला.या सोहळ्यात वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी चार शिवाचार्यांची प्रमुख उपस्थिती होती. ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पुर्णाकर, ष.ब्र.108 शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर, ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर, ष.ब्र.108 चंद्रशेखर गुरु

MB NEWS: कु.शितल रामा वाघमारे चे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

इमेज
 कु.शितल रामा वाघमारे चे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- मार्च २०२३ चा माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु. शितल रामा वाघमारे हिने नेत्रदीपक यश मिळवले आहे. या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.            शहरातील कोळी महासंघाचे परळी तालुकाध्यक्ष रामा वाघमारे यांची  गुणवंत कन्या व विद्यावर्धिनी विद्यालयाची विध्यार्थीनी कु. शितल रामा वाघमारे हिने मार्च २०२३ ला घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परिक्षेत्र 94.50% गुणवत्ता धारक गुण घेऊन अलौकिक यश प्राप्त  केले.  कु. शितल ही शहरातील नवाजलेल्या विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थीनी असून तिने दहावी बोर्ड परीक्षेत 500 पैकी 472 गुण घेतले आहेत. संस्कृत या विषयात तिने 100 गुण घेतले असून इंग्रजी विषयात 82 गणित मध्ये 89 सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयात 95 सोशल सायन्स मध्ये 94 तर मराठी मध्ये 84 गुण घेतले आहेत.     या यशाबद्दल श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता भदाणे साहेब, उपा

MB NEWS:हवामान अभ्यासक पंजाब डक यांचे मार्गदर्शन

इमेज
  मोदी सरकारच्या 9 वर्षांत केवळ महागाई-अंबादास दानवे आहेरचिंचोली येथे शेतकरी मेळाव्यास प्रतिसाद; हवामान अभ्यासक पंजाब डक यांचे मार्गदर्शन बीड (प्रतिनिधी) मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाले असून देशात अमुलाग्र बदल झाल्याचा गवगवा भाजप करत आहे. परंतु, गत 9 वर्षांत केवळ महागाई झाली आहे, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आहेर चिंचोली (ता.बीड) येथे युवा नेते अजय कारांडे यांनी रविवारी (दि.4) आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यास संबोधित केले. यावेळी श्री.दानवे हे बोलत होते. व्यासपीठावर हवामान अभ्यासक पंजाब डक, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, माजी आमदार सुनील धांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, युवा मल्हार सेनेचे अध्यक्ष इंजि.विष्णू देवकते, रासपचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर, माजलगावचे युवासेना शहरप्रमुख विशाल थावरे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री.दानवे म्हणाले, गेल्या 9 वर्षात महागाईमुळे बियाणे, रासायनिक खते यांची दुप्पट भाववाढ झाली, पण त्याबदल्यात शेतमालाचे भाव वाढले नाही. तसेच लागवडीपासून ते शेत माल काढणीपर्यं

MB NEWS:डीसीसी बँकेतील लाचखोरावर एसीबीची कारवाई

इमेज
  डीसीसी बँकेतील लाचखोरावर एसीबीची कारवाई बीड-लेखा परीक्षणाच्या धनादेशाची मंजुरी घेण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शाखा व्यवस्थापकाच्या नातेवाईकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई बीडच्या जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रथमेश उर्फ बाळू ठोंबरे असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.त्याचे काका हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत व्यवस्थापक आहेत.माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या लेखा परीक्षण अहवालाच्या चेकची मंजुरी मिळावी यासाठी ठोंबरे याने वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. त्याच्या या कारभाराबाबत काकाला कसलीच कल्पना नव्हती.प्रथमेश ठोंबरे याला बँकेच्या मुख्य शाखेत वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती."

MB NEWS: 4 लाख 90 हजार रकमेची बॅग पळवली

इमेज
  सिनेस्टारईल वाटमारी : बस स्टँड समोरील रस्त्यावर सीन; पायी जाणाऱ्या इसमाची 4 लाख 90 हजार रकमेची बॅग पळवली परळी वैजनाथ, प्रतिनिधी......          शहरातील बस स्थानका समोरच्या रस्त्यावर सिनेमात घडणाऱ्या लुटमारीच्या प्रसंगा सारखाच एक प्रकार घडला आहे. रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या एका इसमाच्या हातातील बॅग पाठीमागून स्कुटीवर आलेल्या अज्ञात तीन जणांनी हिसकावली व क्षणार्धात परागंदा झाल्याचा हा सीन घडला आहे. या बॅगमध्ये चार लाख 90 हजाराची रक्कम होती. दरम्यान हा बाकाप्रसंग घडलेला इसम परळी बाजारपेठेतील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडे नोकर म्हणून कामाला आहे. या व्यापाऱ्याच्या वसुलीचे काम करून ही रक्कम घेऊन हा इसम येत होता.       या सिनेस्टाईल वाटमारीच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, फिर्यादी रमेश ज्ञानोबा पाचनकर वय 58वर्षे रा. कडबा मार्केट परळी वै हे परळीतील एका व्यापाऱ्याकडे नोकरीस आहेत. या व्यापाऱ्याच्या विविध ठिकाणच्या उधारी वसुलीचे काम ते करतात. काल दिनांक 7 रोजी रात्री ते अशीच विविध ठिकाणाहून वसुल

MB NEWS:Murder: सपासप वार करुन 58 वर्षीय इसमाची निर्घृण हत्या

इमेज
  Murder: सपासप वार करुन 58 वर्षीय इसमाची निर्घृण हत्या किल्ले धारुर...... धारुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 58 वर्षीय इसमाची तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलीआहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.असुन घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली.         धारुर पोलिस हद्दीत  खूनाची घटना घडली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील गिरी वस्तीवर दत्तात्रय रामभाऊ गायके (वय 58 ) या इसमाची तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करुन हत्या करण्यात आली. रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिसांना  घटनेची माहिती मिळाली. सपोनि विजय आटोळे यांनी सहकारी अधिकारी उपनिरिक्षक संतोष भालेराव यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत यांनी भेट देत आवश्यक त्या सुचना केल्या. 

MB NEWS |माझी बातमी - E-Paper 7 June 2023

इमेज
MB NEWS |माझी बातमी - E-Paper 7 June 2023 सप्रेम नमस्कार!      प्रिय वाचक, गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सेवेत विविध बातम्या व माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. डिजीटल व ऑनलाईन बातम्या तत्परतेने आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे.या अनुषंगानेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म बरोबरच E-Paper डिझाईन करण्याचा एक प्रयत्न करून पाहत आहोत. हा प्रयत्न आपणास कसा वाटला हे नक्की काॅमेन्ट मध्ये कळवा. आपली साथ,सहकार्य लाभलेच आहे यापुढेही राहिल हे निश्चित.............! ● आजचा डिजीटल पेपर. Page no.1....... MO मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी MB NEWS पाहा तुमच्या मोबाईलवर.. प्रत्येक बातमी सर्वात आधी MB NEWS वर.   विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, , क्राईम,  पाहा  MB NEWS वर | निवडणूक,  Election, अपडेटसाठी लॉग ऑन करा. https://majhibatmi.blogspot.com Page no.2....... Subscribe YouTube channel: https://youtube.com/@manswibhawawishwa-mbnews Page no.3....... Social Media Handles:Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100063502916437&

MB NEWS:पत्रकारांना मिळणारे सध्याचे निवृत्तीवेतन त्यांच्या निधनानंतर पत्नीला मिळावे व्हाईस ऑफ मीडियाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा

इमेज
  पत्रकारांचे  निवृत्तीवेतन :  व्हाईस ऑफ मीडियाचा  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना मिळणारे सध्याचे निवृत्तीवेतन त्यांच्या निधनानंतर पत्नीला मिळावे, अशी मागणी व्हाईस ऑफ मीडियाने केली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांची अवस्था आणि परिस्थितीपासून शासन अवगत आहोत. पत्रकरांना सद्य:स्थितीत केवळ ११ हजार रुपयांचे मासिक निवृत्तीवेतन देण्यात येते. हे निवृत्ती वेतन देताना अनेक अटी जाचक पद्धतीने सरकारी बाबुंकडून वापरण्यात येत आहेत. त्यामुळे हक्काचे निवृत्ती वेतन मिळविताना पत्रकार व त्यांच्या कुटुंबाची चांगलीच परवड होत असल्याकडे काळे व म्हस्के यांनी लक्ष वेधले आहे. ज्येष्ठ पत्रकार दिनु रणदिवे यांना त्यांचे निधन झाले त्या दिवशी शासनाने त्यांचे निवृत्ती वेतन मंजूर केले. विशेष म्हणजे निवृत्तीवेतन मंजूर झाल्यानंतर रण

MB NEWS:साहेब पंकजाताईंच्या रुपाने झाशीची राणी आपल्याला देउन गेले, त्यांना सांभाळा

इमेज
  मार्ग दाखविला सुपंथ: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन हे संतांनी वर्णिल्या प्रमाणे कृपावंताचे - रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक परळी वैजनाथ, प्रतिनिधी....      कृपावंत कोणाला म्हणावे याचे वर्णन अनेक संतांनी केले आहे. संत सेना महाराज यांचा "उदार तुम्ही संत।मायबाप कृपावंत" हा अभंग लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनाला तंतोतंत लागू पडतो. "मार्ग दाखविला सुपंथ" या न्यायाप्रमाणे त्यांनी लक्षावधींना मार्ग दाखवला.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन हे संतांनी वर्णिल्या प्रमाणे कृपावंताचे असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी केले.        लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमीत्त गोपीनाथ गडावर रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांची किर्तनसेवा झाली.प्रारंभी भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी महाराजांचा सत्कार केला.या किर्तन सेवेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत  रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी विविध दृष्टांत व उदाहरणे देत विवेचन केले.उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत ॥१॥केवढा केला उपकार ।काय व

MB NEWS;मी लोकांसाठी राजकारणात; मला कोणाकडून काहीही मिळवायचं नाही - पंकजा मुंडे

इमेज
 मी लोकांसाठी राजकारणात; मला कोणाकडून काहीही मिळवायचं नाही - पंकजा मुंडे परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          सत्य, स्वाभिमान अन् वंचितांच्या सेवेचा वसा शेवटपर्यंत सोडणार नाही.माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसावण्याचा प्रयत्न करत आहेत.माझे शब्द ठाम असतात. सर्वच पक्षांमध्ये बदल असतात, माझ्या पक्षातही बदल झाले. मी मनात काही साठवून ठेवत नाही. लोकांच्या हितासाठी भूमिका घेते. भाषणातील बोलण्याचे काहीही अर्थ लावून चर्चा घडवल्या जातायत. याने कोणीही बिथरुन जाण्याची गरज नाही. सत्य सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे.मला भुमिका घ्यायची असेल तर ती छातीठोक व जगजाहीर घेऊ असे बेधडक व स्पष्ट प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले.      भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या  पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडेंनी आक्रमक भाषण केलं      यावेळी पुढे बोलतांना पंकजा मुंडे यांनी सांगितले की,आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. हा दिवशी माझ्यासाठी राजकारण शून्य आहे. याठिकाणी जे लोक आले आहेत, त्यांना मी काही दिले नाही. मी यावेळी कोणत्याही राजकारण्यांना नि

MB NEWS:विद्यावर्धिनी विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश

इमेज
विद्यावर्धिनी विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश मार्च २०२३चा माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यात विद्यावर्धिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.विद्यालयाचा निकाल ९९.११℅ लागला आहे.     २२६ विद्यार्थ्यांपैकी १९३ विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण झाले तसेच २४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.यात ९५%  वर गुण घेणारे ४४ विद्यार्थी असून ९०% ते ९५% दरम्यान  गुण घेणारे ६५ विद्यार्थी आहेत.संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे ५२  विद्यार्थी असून गणित विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे०६ विद्यार्थी आहेत. शाळेतील गुणानुक्रमे  पाहिले तीन विद्यार्थी खालीलप्रमाण १ कु भाग्यश्री बालाजी होळंबे ९९.६० २ कु राधिका मदन कराड      ९९.२० ३चि ओंकार रामेश्वर मंत्री       ९८.८० ४कु आरती पांडुरंग कराड      ९८.८०  वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता  भदाणे , उपाध्यक्ष मा  अवचार , सचिव  पी जी ईटके,संस्थेचे सदस्य  कोळगे