इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS:साहेब पंकजाताईंच्या रुपाने झाशीची राणी आपल्याला देउन गेले, त्यांना सांभाळा

 मार्ग दाखविला सुपंथ: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन हे संतांनी वर्णिल्या प्रमाणे कृपावंताचे - रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     कृपावंत कोणाला म्हणावे याचे वर्णन अनेक संतांनी केले आहे. संत सेना महाराज यांचा "उदार तुम्ही संत।मायबाप कृपावंत" हा अभंग लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनाला तंतोतंत लागू पडतो. "मार्ग दाखविला सुपंथ" या न्यायाप्रमाणे त्यांनी लक्षावधींना मार्ग दाखवला.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन हे संतांनी वर्णिल्या प्रमाणे कृपावंताचे असल्याचे प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी केले.

       लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमीत्त गोपीनाथ गडावर रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांची किर्तनसेवा झाली.प्रारंभी भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी महाराजांचा सत्कार केला.या किर्तन सेवेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत  रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी विविध दृष्टांत व उदाहरणे देत विवेचन केले.उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत ॥१॥केवढा केला उपकार ।काय वाणू मी पामर ॥२॥जड जीवा उद्धार केला।मार्ग दाखविला सुपंथ ॥३॥सेना म्हणे उतराई।होता कांहीं दिसेना ॥४॥ " या संत सेना महाराज यांच्या अभंगावर विवेचन केले.

       याप्रसंगी रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी पुढे विवेचन करतांना सांगितले की, ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई यांच्या कालखंडातील, महाराष्ट्राबाहेर जन्मलेले पण कर्मभूमी महाराष्ट्र असलेले संत सेना महाराज यांनी वर्णन केले आहे की, देवाचे उपकार मानण्यापेक्षा संताचे उपकार किती थोर आहेत याची जाणीव झाल्यानंतर  त्यांना उद्देशून अभंगाची सुरुवात करतात " उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत.संत हे फळांनी लगडलेल्या वृक्षा सारखे असतात. नेहमी सावली देतात, खायला गोड फळे देतात कोणी त्याच्यावर कुऱ्हाड चालवली तरीही सहनशील असतात. आईवडीलांसारखे दयाळु, जीवापाड प्रेम करून सांभाळ करतात. हे जग दाखवतात.जन्माला येणारा जीव हा जड असतो, अज्ञानी असतो. अफाट ह्या जगात वाईट गोष्टींची कमी नाही. संत सगळ्यांनाच चांगला मार्ग दाखवतात. त्यांचा उद्धार करतात. सन्मार्ग दाखवतात. हेच जीवन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे आहे.अशा लोकोत्तर कृपावंताने दाखवलेल्या मार्गावर आपण वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी केले. कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील गुणीजण,टाळकरी,भजनी मंडळ व भाविक मोठ्या संख्येंने उपस्थित होते.


● *साहेब पंकजाताईंच्या रुपाने  झाशीची राणी आपल्याला देउन गेले, त्यांना सांभाळा


       दरम्यान, या किर्तन प्रसंगी लोकनेते मुंडे साहेब यांच्या अनेक आठवणींना रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांनी उजाळा दिला.काही प्रसंग सांगतांना महाराज भावूक झाले होते.लोकनेते मुंडे साहेब हे लोकोत्तर कृपावंत आपल्याला पंकजाताईसारखी झाशीची राणी  देउन गेले आहेत, त्यांना सांभाळा असे प्रतिपादन त्यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या