MB NEWS: 4 लाख 90 हजार रकमेची बॅग पळवली

 सिनेस्टारईल वाटमारी : बस स्टँड समोरील रस्त्यावर सीन; पायी जाणाऱ्या इसमाची 4 लाख 90 हजार रकमेची बॅग पळवली



परळी वैजनाथ, प्रतिनिधी......
         शहरातील बस स्थानका समोरच्या रस्त्यावर सिनेमात घडणाऱ्या लुटमारीच्या प्रसंगा सारखाच एक प्रकार घडला आहे. रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या एका इसमाच्या हातातील बॅग पाठीमागून स्कुटीवर आलेल्या अज्ञात तीन जणांनी हिसकावली व क्षणार्धात परागंदा झाल्याचा हा सीन घडला आहे. या बॅगमध्ये चार लाख 90 हजाराची रक्कम होती. दरम्यान हा बाकाप्रसंग घडलेला इसम परळी बाजारपेठेतील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडे नोकर म्हणून कामाला आहे. या व्यापाऱ्याच्या वसुलीचे काम करून ही रक्कम घेऊन हा इसम येत होता.
      या सिनेस्टाईल वाटमारीच्या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, फिर्यादी रमेश ज्ञानोबा पाचनकर वय 58वर्षे रा. कडबा मार्केट परळी वै हे परळीतील एका व्यापाऱ्याकडे नोकरीस आहेत. या व्यापाऱ्याच्या विविध ठिकाणच्या उधारी वसुलीचे काम ते करतात. काल दिनांक 7 रोजी रात्री ते अशीच विविध ठिकाणाहून वसुली करून रात्रीच्या सुमारास परळीत दाखल झाले. बस स्थानकाच्या समोरील रस्त्यावरून आझाद चौकाकडे जात असताना रस्त्याच्या कडेने ते पायी चालत होते. पाठीमागून एक स्कुटी ज्यावर तीन जण होते. या स्कुटीस्वार तिघाजणांनी वेगाने येत त्यांच्या हातातील बॅग हिसकावली व क्षणार्धात निघून गेले. पाचनकर यांना काय होतेय हे कळण्याअगोदरच सर्व घडून गेले होते. या बॅगमध्ये त्यांच्या मालकाची चार लाख 90 हजार 860 रुपये एवढी रक्कम होती. याप्रकरणी त्यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे सपोनि  सपकाळ हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !