परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:हवामान अभ्यासक पंजाब डक यांचे मार्गदर्शन

 मोदी सरकारच्या 9 वर्षांत केवळ महागाई-अंबादास दानवे


आहेरचिंचोली येथे शेतकरी मेळाव्यास प्रतिसाद; हवामान अभ्यासक पंजाब डक यांचे मार्गदर्शन

बीड (प्रतिनिधी)

मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाले असून देशात अमुलाग्र बदल झाल्याचा गवगवा भाजप करत आहे. परंतु, गत 9 वर्षांत केवळ महागाई झाली आहे, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

आहेर चिंचोली (ता.बीड) येथे युवा नेते अजय कारांडे यांनी रविवारी (दि.4) आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यास संबोधित केले. यावेळी श्री.दानवे हे बोलत होते. व्यासपीठावर हवामान अभ्यासक पंजाब डक, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, माजी आमदार सुनील धांडे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, युवा मल्हार सेनेचे अध्यक्ष इंजि.विष्णू देवकते, रासपचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर, माजलगावचे युवासेना शहरप्रमुख विशाल थावरे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री.दानवे म्हणाले, गेल्या 9 वर्षात महागाईमुळे बियाणे, रासायनिक खते यांची दुप्पट भाववाढ झाली, पण त्याबदल्यात शेतमालाचे भाव वाढले नाही. तसेच लागवडीपासून ते शेत माल काढणीपर्यंत मंजुरी खर्च वाढ झाली आहे. गारपीट, अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी फक्त अतिवृष्टीची मदत जाहीर करत पोकळ घोषणा करुन वेळकाढूपणा केला. पण एकाही शेतकर्‍याच्या खात्यावर रुपया जमा झाला नाही. फक्त एसटी बसवर, टि.व्ही.वर जाहिराती करत गतिमान सरकार करत घोषणाबाजी चालू आहे, पण प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या तोंडाला पाणे पुसली जात आहे. तर दुसरीकडे मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनसाठी एका बैठकीत 6,000 कोटी रुपये मंजूर होतात, पण शेतकर्‍यांसाठी फक्त घोषणा करतात. एकीकडे ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला जातो, पण आपल्या शेतकरीच्या कापूस भाव नसल्याने घरात पडलाय. शेतकरी दररोज चिंता करत आज भाव येईल, उद्या येईल अशी आशा करतोय. कांदाचेही तसेच, कांद्याला भाव नाही. शेतकर्‍यांचा कांदा सडतोय, तो अक्षरशः फेकून देतोय, भाव काय तर 2 रूपये किलो आणि तिकडे मुंबईत 40 रूपये किलोला व्यापारी विकतोय, असे हे शेतकर्‍यांचे विदारक चित्र आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकर्‍यांकडे लक्ष द्यायला तयार नाही, अशा शब्दात दानवे यांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला. शेतकरी मेळाव्याचे आयोजक युवा नेते अजय कारांडे यांच्या नियोजनाबद्दल कौतूक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय कारांडे यांनी केले. सुत्रसंचलन ज्ञानदेव काशिद यांनी केले. आभार नारायण काशिद यांनी मानले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यंदा जोरदार पाऊस-पंजाब डक

अवतीभोवतीच्या नैसर्गिक बदलावरून पावसाचा अंदाज येतो. ते बदल आपण वेळोवेळी समाजमाध्यमातून मांडत असतो. यंदा जोरदार पाऊसकाळ होणार असून बळीराजा सुखावणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी चिंता करू नये. शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी आपण वेळोवेळी अचूक अंदाज देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे हवामान अभ्यासक पंबाज डक यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!