MB NEWS: कु.शितल रामा वाघमारे चे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

 कु.शितल रामा वाघमारे चे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- मार्च २०२३ चा माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु. शितल रामा वाघमारे हिने नेत्रदीपक यश मिळवले आहे. या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

          शहरातील कोळी महासंघाचे परळी तालुकाध्यक्ष रामा वाघमारे यांची  गुणवंत कन्या व विद्यावर्धिनी विद्यालयाची विध्यार्थीनी कु. शितल रामा वाघमारे हिने मार्च २०२३ ला घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परिक्षेत्र 94.50% गुणवत्ता धारक गुण घेऊन अलौकिक यश प्राप्त  केले.  कु. शितल ही शहरातील नवाजलेल्या विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थीनी असून तिने दहावी बोर्ड परीक्षेत 500 पैकी 472 गुण घेतले आहेत. संस्कृत या विषयात तिने 100 गुण घेतले असून इंग्रजी विषयात 82 गणित मध्ये 89 सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयात 95 सोशल सायन्स मध्ये 94 तर मराठी मध्ये 84 गुण घेतले आहेत.  

  या यशाबद्दल श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता भदाणे साहेब, उपाध्यक्ष अवचार साहेब, सचिव पी जी ईटके,संस्थेचे सदस्य  कोळगे, भिंगोरे,  एम टी मुंडे,  पैंजणे, सावन्त, चेवले,औष्णिक विद्युत केंद्राचे कल्याण अधिकारी वंजारी,परळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी  कनाके साहेब,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक उन्मेष मातेकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नांदूरकर सुमठाणे तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तसेच कोळी महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष महादेव कडुकटले, विनोद बळवंत, अजय बळवंत, नंदु बळवंत, बाबा बळवंत कृष्णा बळवंत, भालचंद्र बळवंत, अविनाश बळवंत गजानन माने, कुमार माने, विजय साळवे व मित्र मंडळी यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या असून तिने माध्यमिक शालांत परीक्षेत मिळविलेल्या घवघवीत  यशामुळे तिच्यावर मित्र परिवार व कुटूंबियांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार