MB NEWS:Murder: सपासप वार करुन 58 वर्षीय इसमाची निर्घृण हत्या

 Murder: सपासप वार करुन 58 वर्षीय इसमाची निर्घृण हत्या




किल्ले धारुर......
धारुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 58 वर्षीय इसमाची तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलीआहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.असुन घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली.
        धारुर पोलिस हद्दीत  खूनाची घटना घडली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथील गिरी वस्तीवर दत्तात्रय रामभाऊ गायके (वय 58 ) या इसमाची तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करुन हत्या करण्यात आली. रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिसांना  घटनेची माहिती मिळाली. सपोनि विजय आटोळे यांनी सहकारी अधिकारी उपनिरिक्षक संतोष भालेराव यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज कुमावत यांनी भेट देत आवश्यक त्या सुचना केल्या. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !