MB NEWS;मी लोकांसाठी राजकारणात; मला कोणाकडून काहीही मिळवायचं नाही - पंकजा मुंडे

 मी लोकांसाठी राजकारणात; मला कोणाकडून काहीही मिळवायचं नाही - पंकजा मुंडे


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         सत्य, स्वाभिमान अन् वंचितांच्या सेवेचा वसा शेवटपर्यंत सोडणार नाही.माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसावण्याचा प्रयत्न करत आहेत.माझे शब्द ठाम असतात. सर्वच पक्षांमध्ये बदल असतात, माझ्या पक्षातही बदल झाले. मी मनात काही साठवून ठेवत नाही. लोकांच्या हितासाठी भूमिका घेते. भाषणातील बोलण्याचे काहीही अर्थ लावून चर्चा घडवल्या जातायत. याने कोणीही बिथरुन जाण्याची गरज नाही. सत्य सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे.मला भुमिका घ्यायची असेल तर ती छातीठोक व जगजाहीर घेऊ असे बेधडक व स्पष्ट प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केले.

     भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या  पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडेंनी आक्रमक भाषण केलं

     यावेळी पुढे बोलतांना पंकजा मुंडे यांनी सांगितले की,आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक दिवस आहे. हा दिवशी माझ्यासाठी राजकारण शून्य आहे. याठिकाणी जे लोक आले आहेत, त्यांना मी काही दिले नाही. मी यावेळी कोणत्याही राजकारण्यांना निमंत्रित केलेले नाही. कोणत्याही मोठ्या नेत्यांला बोलावले नाही. मी फक्त भजन कीर्तन आणि मुंडेवर निष्पाप प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम ठेवला आहे.एखादी व्यक्ती जेव्हा एखादं वक्तव्य करते तेव्हा ती व्यक्ती पत्रकार परिषद घेऊन बोलते. पण जर एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तींसमोर एका भाषणात बोलत असते, त्या भाषणाचं पोस्टमार्टम करण्याला बातमी म्हणत नाहीत. याची मला सवय झाली आहे. पण ते  प्रेम समजून मी स्विकारते असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

     माझ्या मनात अफाट त्रास असेल, माझ्या वाट्याला  दुःख आले असेल पण मी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. जो चूक नसेल असा व्यक्ती माझ्यासमोर आला तर मी पायावर  डोकं ठेवेन. पण जर कुणी चुकीचा असेल तो माझ्या मनामध्ये कधीच  बरोबर होऊ शकत नाही.गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकांचा पराभव झाला. पण तरीही त्यांना आमदारकी, मंत्रिपदं मिळाली.  त्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली,संभ्रम निर्माण झाला तो आपण तर निर्माण केलेला नाही.आता आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांशी मनमोकळी चर्चा करणार, मी अमित शहा यांची भेट घेणार आहे.  अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे. माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसावण्याचा प्रयत्न करत आहेत. मी कुणासमोरही झुकणार नाही, असं पंकजा म्हणाल्या.

            मी लोकांसाठी राजकारणात आहे. बहुजनांच्या, वंचितांच्या , समाजहिताच्या भुमिका घेतल्या तर त्यात चुकीचं काय आहे.मी मुंडे साहेबांची कन्या आहे.मला भुमिका घ्यायच्या आधी सर्वांना बोलवून सांगेन, छातीठोक भुमिका घेईल.रडगाणं गाणारी मी नाही.मला या चर्चांचा कंटाळा आला आहे. तरीही संयम ठेवू. मी लोकांसाठी राजकारणात आहे.मला कोणाकडून काहीही मिळवायचं नाही.आपली कोणावरही नाराजी नाही.आपली अपेक्षा सर्व सामान्य माणसाकडून आहे.वेळ येईल तेंव्हा तुम्ही ती अपेक्षा नक्कीच पुर्ण कराल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !