इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:विद्यावर्धिनी विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश

विद्यावर्धिनी विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश




मार्च २०२३चा माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यात विद्यावर्धिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे.विद्यालयाचा निकाल ९९.११℅ लागला आहे.

    २२६ विद्यार्थ्यांपैकी १९३ विद्यार्थी विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण झाले तसेच २४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.यात ९५%  वर गुण घेणारे ४४ विद्यार्थी असून ९०% ते ९५% दरम्यान 

गुण घेणारे ६५ विद्यार्थी आहेत.संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे ५२  विद्यार्थी असून गणित विषयात १०० पैकी १०० गुण घेणारे०६ विद्यार्थी आहेत.

शाळेतील गुणानुक्रमे  पाहिले तीन विद्यार्थी खालीलप्रमाण

१ कु भाग्यश्री बालाजी होळंबे ९९.६०

२ कु राधिका मदन कराड      ९९.२०

३चि ओंकार रामेश्वर मंत्री       ९८.८०

४कु आरती पांडुरंग कराड      ९८.८०


 वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता  भदाणे , उपाध्यक्ष मा  अवचार , सचिव  पी जी ईटके,संस्थेचे सदस्य  कोळगे, भिंगोरे, एम टी मुंडे, पैंजणे, सावन्त, चेवले,औष्णिक विद्युत केंद्राचे कल्याण अधिकारी  वंजारी,परळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी  कनाके माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक  उन्मेष मातेकर,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  नांदूरकर  सुमठाणे तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!