MB NEWS: कु.शितल रामा वाघमारे चे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश
कु.शितल रामा वाघमारे चे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मार्च २०२३ चा माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थ्यांनी कु. शितल रामा वाघमारे हिने नेत्रदीपक यश मिळवले आहे. या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. शहरातील कोळी महासंघाचे परळी तालुकाध्यक्ष रामा वाघमारे यांची गुणवंत कन्या व विद्यावर्धिनी विद्यालयाची विध्यार्थीनी कु. शितल रामा वाघमारे हिने मार्च २०२३ ला घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परिक्षेत्र 94.50% गुणवत्ता धारक गुण घेऊन अलौकिक यश प्राप्त केले. कु. शितल ही शहरातील नवाजलेल्या विद्यावर्धिनी विद्यालयाची विद्यार्थीनी असून तिने दहावी बोर्ड परीक्षेत 500 पैकी 472 गुण घेतले आहेत. संस्कृत या विषयात तिने 100 गुण घेतले असून इंग्रजी विषयात 82 गणित मध्ये 89 सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयात 95 सोशल सायन्स मध्ये 94 तर मराठी मध्ये 84 गुण घेतले आहेत. या यशाबद्दल श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तसेच औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता भदाणे साहेब, उपा