पोस्ट्स

MB NEWS-मुलीला जगवा,मुलीला शिकवा असे अभियान दररोज राबविले पाहिजे-मोहन आव्हाड

इमेज
मुलीला जगवा,मुलीला शिकवा असे अभियान दररोज राबविले पाहिजे-मोहन आव्हाड परळी(प्रतिनिधी) आजच्या युगात मुलाला चांगली वागणुक व मुलीचा तिरस्कार  हा भेद अजुनही काही अंशी असुन या साठी मुलीच्या जन्माचे स्वागत करा, मुलीला जगवा,मुलीला शिकवा,यासारखे जनजाग्रती अभियान रोज राबविले गेलेपाहिजे, फक्त स्टेजवर भाषणं देणे तर सोपे असते मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून हे कार्य झाले पाहिजे असे प्रतिपादन औष्णिक विद्युत केंद्राचे अधिक्षक अभियंता मोहन आव्हाड यांनी शक्तिकुंज वसाहतीत बेटी बचाओ,बेटी पढाओ हे समाजउपयोगी जनजाग्रती अभियानाचे स्वागत करतांना केले. Click: 🏵️ *आत्मिय सन्मान: परळीत कर्नाटकच्या तीन 'खास' पाहुण्यांचा विशेष पाहुणचार.* परळी शहरात निर्माण बहुउद्देशिय सेवा भावी संस्था,महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुनल समिती शाखा परळी व परळी शहर ,परळी तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने मुलीच्या जन्मांचे स्वागत करा,मुलीला जगवा,मुलीला शिकवा हे अभियान राबवण्यात येत आहे .आज दिनांक 4एप्रील रोजी शक्तिकुंज थर्मल काँलनी येथे हे अभियान राबविण्यात आले त्याचे स्वागत औष्णिक विद्युत केंद्राचे अधिक्षक आव्हाडसर या

MB NEWS-शिक्षण क्षेत्रातील लाचखोरी: दिड लाखांची लाच घेतांना शिक्षण संस्थेचा सचिव आणि मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या जाळ्यात

इमेज
शिक्षण क्षेत्रातील लाचखोरी: दिड लाखांची लाच घेतांना शिक्षण संस्थेचा सचिव आणि मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या जाळ्यात  केज :- सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाचे वेतन व सेवा निवृत्तीचे वेतन काढण्यासाठी केज तालुक्यातील तांबवा येथील गजानन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवाने १२ लाख रुपयांची लाचेची केली होती. त्या पैकी लाचेच्या रकमेतील दीड लाख रुपयांच्या हप्त्याची लाच स्वीकारताना लाचखोर साचिवासह गणेश माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व अन्य दोघेजण लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणी केज पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.* केज तालुक्यातील तांबवा येथील शिक्षण संस्थेत सहशिक्षक पदावर न्यायालयाच्या आदेशा नुसार रुजू झालेल्या शिक्षकाचा थकलेला पगार व सेवानिवृत्तीचे वेतन आणि इतर लाभ मिळवून देण्यासाठी आणि तक्रारदार सहाशिक्षकाच्या विरुद्ध संस्थेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी गजानन शिक्षण प्रसारक मंडळ तांबवाचे सचिव अशोक हरिभाऊ चाटे, गणेश माध्यमिक विद्यालय तांबवाचे मुख्याध्यापक अनंत बाबुराव हंगे, साने गुरुजी विद्यालय, तांबवा अध्यक्ष उद्धव माणिक

MB NEWS-आडस - होळ रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत मानवी सापळा

इमेज
  आडस - होळ रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत मानवी सापळा     होळ, प्रतिनिधी..  केज तालुक्यात जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा  आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून हा प्रकार घातपाताचा  असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.   केज  तालुक्यातील आडस-होळ रस्त्यावरील वेदांत साधनास्थळा जवळ काही अंतरावर अनोळखी व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला.या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा  केला आहे. मयत व्यक्तीला घटनास्थळीच कडब्याच्या बुचाडात जाळण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस तपासात याबाबतीत खुलासा होईल मृतदेह पुर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटविण्याचे पोलीसांसमोर आव्हान असणार आहे. मृतदेह नेमका महिलेचा की, पुरुषाचा याचा अंदाजही येत नाही

MB NEWS-कै.रावसाहेब आंधळे (पोस्टमन)यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त *ह.भ.प.संदिपान महाराज हासेगावकर यांचे 5 एप्रिल रोजी किर्तन*

इमेज
  कै.रावसाहेब आंधळे (पोस्टमन)यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त  *ह.भ.प.संदिपान महाराज हासेगावकर यांचे 5 एप्रिल रोजी किर्तन* परळी (प्रतिनीधी) सेवानिवृत्त पोस्टमन कै.रावसाहेब आंधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त मंगळवार दि.5 एप्रिल रोजी दुपारी 2 ते 4 यावेळेत संत सावता महाराज मंदिर येथे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.संदिपान महाराज हासेगावकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले असुन किर्तनास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आंधळे परिवाराच्या वतिने करण्यात आले आहे. सेवानिवृत्त पोस्टमन कै.रावसाहेब आंधळे यांचे दि.5 एप्रिल रोजी प्रथम पुण्यस्मरण असुन यानिमीत्त दुपारी 2 ते 4 या वेळेत ह.भ.प.संदिपान महाराज हासेगावकर यांचे किर्तन तर त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होणार आहे.  किर्तन भोजनास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ह.भ.प.ॲड.दत्तात्रय महाराज आंधळे,गोपाळ आंधळे व आंधळे परिवाराच्या वतिने करण्यात आले आहे.

MB NEWS-अखिल भारतीय स्त्री रोग तज्ञ परिषदेत परळीच्या डॉ.शाम काळेंचा समावेश

इमेज
  अखिल भारतीय स्त्री रोग तज्ञ परिषदेत परळीच्या डॉ.शाम काळेंचा समावेश _वैद्यनाथ बॅडमिंटन ग्रुपने केला सत्कार_ परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारी मुळे रखडलेली अखिल भारतीय स्त्री रोग तज्ञ परिषद,(AICOG) 4 ते 8 एप्रिल 2022 या दरम्यान इंदौर ( मध्यप्रदेश) संपन्न होत आहे.या परिषदेसाठी डॉ. शाम काळे (स्त्री रोग तज्ञ) परळी वैजनाथ, जि. बीड हे  उपस्थित राहणार आहेत.  Click:*महाराष्ट्रात लवकरच महायुतीची गुढी उभारु -केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांचे परळीत वक्तव्य*      परिषदेसाठी निवड झाल्याबद्दल डॉ श्याम काळे यांचे वैद्यनाथ बॅडमिंटन ग्रुप तर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले . डॉ. शशांक कोरे डॉ विजय रांदड प्रा  उत्तम धुमाळ ,प्रकाश धुमाळ, संजय फुलारी,अशोक धुमाळ, संजय खाकरे, अरुण तपके श्री गर्जे, बंडू बिराजदार, सुमित केंद्रे,सोपान राव सातपुते आदींनी त्यांचा सत्कार केला. Click:🏵️ *गुढी उभी करतांना आरती कोणती म्हणायची? जाणुन घ्या:* 🔸 *गुढीची आरती..* 🔸  🔸हे देखील वाचा/पहा🔸 Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ त

MB NEWS-धरणाच्या काठावर सेल्फी काढण्याच्या नादात तिघांचा मृत्यू

इमेज
  धरणाच्या काठावर सेल्फी काढण्याच्या नादात तिघांचा मृत्यू वडवणी  वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे  माजलगाव धरणाच्या काठावर सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक दोन एप्रिल रोजी घडली आहे. रात्री 8 च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे. सदरील या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.  Click:*महाराष्ट्रात लवकरच महायुतीची गुढी उभारु -केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांचे परळीत वक्तव्य*  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम राबवली. बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेने वडवणी वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे एका खाजगी उर्दु शाळेमध्ये शिक्षक असणाऱ्या शिक्षकाच्या मुलीचा चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर मुलगी, जावई आणि जावयाचा मित्र सासरवाडीमध्ये आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर चारच्या सुमारास ते फिरण्यासाठी बाहेर पडले. समोर असलेल्या नदीच्या पाण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. मुलगी, जावई, जावयाचा मित्र आणि नात्यातील दोन लहान मुले हे माजलगाव धरणाच्या पात्रात सेल्फी काढत असताना तोल गेला. नदीमध्ये वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड्या

MB NEWS-माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण - धनंजय मुंडे

इमेज
 लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे रविवारी पुण्यात उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार उद्घाटन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांचीही राहणार उपस्थिती माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण - धनंजय मुंडे पुणे (दि. 02) ---- :  लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे रविवार, दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न होणार आहे. या महामंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषद उपाध्यक्षा डॉ. नीलम ताई गोऱ्

MB NEWS-ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी

इमेज
  स्वा.वि.दा.सावरकर ना.सह. पतसंस्थेला ६८ लाख २६ हजार नफा; ३८ कोटी ११ लाख  ठेवीचा टप्पा पार ! ● ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी  ● परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि.        शहरातील अग्रगण्य पतसंस्था स्वा.वि. दा. सावरकर नागरी सहकारी पतंसस्थेने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे.शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात ठरवलेले ठेवींचे उद्दीष्ट पुर्ण केले आहे. पतसंस्थेने सरत्या आर्थिक वर्षात ६८ लाख २६ हजार नफा तर ३८ कोटी रूपयांच्या ठेवीचे उद्दीष्ट गाठले आहे.  Click:*महाराष्ट्रात लवकरच महायुतीची गुढी उभारु -केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांचे परळीत वक्तव्य*         सरत्या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२२ अखेर संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी ३८ कोटी ११ लक्ष रूपये तर भागभांडवल-६६ लाख , कर्ज  २९ कोटी ७९ लाख, गुंतवणूक११ कोटी १८ लाख,निव्वळ नफा ६८ लाख २६ हजार  आहे. राखीव निधी २ कोटी ८४ लाख तर आर्थिक उलाढाल ११० को