इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-मुलीला जगवा,मुलीला शिकवा असे अभियान दररोज राबविले पाहिजे-मोहन आव्हाड

मुलीला जगवा,मुलीला शिकवा असे अभियान दररोज राबविले पाहिजे-मोहन आव्हाड



परळी(प्रतिनिधी) आजच्या युगात मुलाला चांगली वागणुक व मुलीचा तिरस्कार  हा भेद अजुनही काही अंशी असुन या साठी मुलीच्या जन्माचे स्वागत करा, मुलीला जगवा,मुलीला शिकवा,यासारखे जनजाग्रती अभियान रोज राबविले गेलेपाहिजे, फक्त स्टेजवर भाषणं देणे तर सोपे असते मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून हे कार्य झाले पाहिजे असे प्रतिपादन औष्णिक विद्युत केंद्राचे अधिक्षक अभियंता मोहन आव्हाड यांनी शक्तिकुंज वसाहतीत बेटी बचाओ,बेटी पढाओ हे समाजउपयोगी जनजाग्रती अभियानाचे स्वागत करतांना केले.

Click:🏵️ *आत्मिय सन्मान: परळीत कर्नाटकच्या तीन 'खास' पाहुण्यांचा विशेष पाहुणचार.*

परळी शहरात निर्माण बहुउद्देशिय सेवा भावी संस्था,महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुनल समिती शाखा परळी व परळी शहर ,परळी तालुका पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने मुलीच्या जन्मांचे स्वागत करा,मुलीला जगवा,मुलीला शिकवा हे अभियान राबवण्यात येत आहे .आज दिनांक 4एप्रील रोजी शक्तिकुंज थर्मल काँलनी येथे हे अभियान राबविण्यात आले त्याचे स्वागत औष्णिक विद्युत केंद्राचे अधिक्षक आव्हाडसर यांनी केले.

या वेळी अभियानाचे प्रचारक जेष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी कल्याण अधिकारी वंजारीसर, औष्णिक विद्युत केंद्राचे विविध विभागाचे अधिकारी,महाराष्ट्र बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

Click:🏵️ *गुढीपाडव्यानिमित्त नागापुर येथे श्री. नागनाथ प्रभूंचा पारंपरिक पालखी सोहळा उत्साहात.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!