इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-शिक्षण क्षेत्रातील लाचखोरी: दिड लाखांची लाच घेतांना शिक्षण संस्थेचा सचिव आणि मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या जाळ्यात

शिक्षण क्षेत्रातील लाचखोरी: दिड लाखांची लाच घेतांना शिक्षण संस्थेचा सचिव आणि मुख्याध्यापकासह चौघे एसीबीच्या जाळ्यात 



केज :- सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाचे वेतन व सेवा निवृत्तीचे वेतन काढण्यासाठी केज तालुक्यातील तांबवा येथील गजानन शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवाने १२ लाख रुपयांची लाचेची केली होती. त्या पैकी लाचेच्या रकमेतील दीड लाख रुपयांच्या हप्त्याची लाच स्वीकारताना लाचखोर साचिवासह गणेश माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व अन्य दोघेजण लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणी केज पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*


केज तालुक्यातील तांबवा येथील शिक्षण संस्थेत सहशिक्षक पदावर न्यायालयाच्या आदेशा नुसार रुजू झालेल्या शिक्षकाचा थकलेला पगार व सेवानिवृत्तीचे वेतन आणि इतर लाभ मिळवून देण्यासाठी आणि तक्रारदार सहाशिक्षकाच्या विरुद्ध संस्थेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी गजानन शिक्षण प्रसारक मंडळ तांबवाचे सचिव अशोक हरिभाऊ चाटे, गणेश माध्यमिक विद्यालय तांबवाचे मुख्याध्यापक अनंत बाबुराव हंगे, साने गुरुजी विद्यालय, तांबवा अध्यक्ष उद्धव माणिकराव कराड व एक अन्य एक यांनी १२ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार सेवानिवृत्त सहशिक्षक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या नुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. २ एप्रिल रोजी सापळा लावला असता आरोपींनी तक्रारदाराकडे लाचेची मागणीके ली. तसेच पहिला हप्ता म्हणून दिड लाख रुपये स्विकारताना पंचा समक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. केज पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारी नुसार भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर दोघे फरार आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल धस, पोलीस हवालदार सत्यनारायण खेत्रे, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, भरत गारदे, श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, स्नेहलकुमार कोरडे, संतोष राठोड, अविनाश गवळी व चालक गणेश म्हेत्रे यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या