MB NEWS-आडस - होळ रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत मानवी सापळा

 आडस - होळ रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत मानवी सापळा  



 होळ, प्रतिनिधी..

 केज तालुक्यात जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा  आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून हा प्रकार घातपाताचा  असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

 केज  तालुक्यातील आडस-होळ रस्त्यावरील वेदांत साधनास्थळा जवळ काही अंतरावर अनोळखी व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला.या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा  केला आहे.

मयत व्यक्तीला घटनास्थळीच कडब्याच्या बुचाडात जाळण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस तपासात याबाबतीत खुलासा होईल मृतदेह पुर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटविण्याचे पोलीसांसमोर आव्हान असणार आहे. मृतदेह नेमका महिलेचा की, पुरुषाचा याचा अंदाजही येत नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !