MB NEWS-माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण - धनंजय मुंडे

 लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे रविवारी पुण्यात उद्घाटन


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार उद्घाटन


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांचीही राहणार उपस्थिती



माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण - धनंजय मुंडे


पुणे (दि. 02) ---- :  लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे रविवार, दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न होणार आहे.


या महामंडळाच्या उद्घाटन कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषद उपाध्यक्षा डॉ. नीलम ताई गोऱ्हे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांसह  राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधान परिषद तसेच विधानसभा सदस्य, विविध ऊसतोड कामगार व वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी व स्वतः ऊसतोड कामगार बांधव उपस्थित राहणार आहेत.


अगदी लहानपणापासून ऊसतोड कामगारांचा संघर्ष, त्यांची पिढ्यानपिढ्या होत असलेली हेळसांड पाहत असताना, मनाला वेदना होत असत. समाजकारणात सक्रिय झाल्यापासून या प्रवर्गासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काहितरी विधायक करण्याचा माझा मानस राहिलेला आहे. यादृष्टीने आम्ही सत्तेत आल्यापासून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. 


आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला मूर्त स्वरूप येत असून हा आपल्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण आहे. पाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून ऊसतोड कामगारांच्या कल्याणाची नवी गुढी राज्य सरकारच्या माध्यमातून उभारत आहोत, याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. हा दिवस माझ्यासाठी ऐतिहासिक असून, मी निवडून आलो, मंत्री झालो, त्याहीपेक्षा हा मोठा दिवस असल्याची भावनिक प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे व या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Click:🏵️ *गुढी उभी करतांना आरती कोणती म्हणायची? जाणुन घ्या:* 🔸 *गुढीची आरती..* 🔸

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे यांनी लिहिलेला लेख.*

क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

-----------------------------
















---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
---------------------------------------------











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !