इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-धरणाच्या काठावर सेल्फी काढण्याच्या नादात तिघांचा मृत्यू

 धरणाच्या काठावर सेल्फी काढण्याच्या नादात तिघांचा मृत्यू



वडवणी 

वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे  माजलगाव धरणाच्या काठावर सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक दोन एप्रिल रोजी घडली आहे. रात्री 8 च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे. सदरील या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

Click:*महाराष्ट्रात लवकरच महायुतीची गुढी उभारु -केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांचे परळीत वक्तव्य*

 पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम राबवली. बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेने वडवणी वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे एका खाजगी उर्दु शाळेमध्ये शिक्षक असणाऱ्या शिक्षकाच्या मुलीचा चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर मुलगी, जावई आणि जावयाचा मित्र सासरवाडीमध्ये आले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर चारच्या सुमारास ते फिरण्यासाठी बाहेर पडले. समोर असलेल्या नदीच्या पाण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. मुलगी, जावई, जावयाचा मित्र आणि नात्यातील दोन लहान मुले हे माजलगाव धरणाच्या पात्रात सेल्फी काढत असताना तोल गेला. नदीमध्ये वाळू उपशामुळे निर्माण झालेल्या खड्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. ताहा शेख (20, रा.ढाकरगाव, ता.अंबड), सिद्दीकी शेख (22, रा.ढाकरगाव, ता.अंबड), शदाब (25, रा.बिहार, ह.मु.ढाकरगाव) यात तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने नातेवाईकांची दोन मुले सुखरूप वाचली आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेत शोध मोहिम राबवली. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यामध्ये ग्रामस्थांना यश मिळाले. मयत तिघांचा मृतदेह चिंचवण येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वडवणी पोलीसांनी दिली आहे.

Click:🏵️ *गुढी उभी करतांना आरती कोणती म्हणायची? जाणुन घ्या:* 🔸 *गुढीची आरती..* 🔸

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click &read: 🏵️ *27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित्त संशोधक नाट्यकर्मी प्रा.सिद्धार्थ तायडे यांनी लिहिलेला लेख.*

क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis




---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

-----------------------------
















---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.
---------------------------------------------










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!