पोस्ट्स

MB NEWS-मुख्याधिकारी यांच्या भेटीची आठवड्यात चार तास वेळ म्हणजे नागरिकांची चेष्टा-नितीन समशेट्टे

इमेज
  मुख्याधिकारी यांच्या भेटीची आठवड्यात चार तास वेळ म्हणजे नागरिकांची चेष्टा-नितीन समशेट्टे परळी वैजनाथ, प्रतिनिधी..  शहरातील नागरिक नगर परिषदेच्या अकार्यक्षम कामकाजामुळे आधीच त्रस्त आहेत त्यात नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी नागरिकांना भेटण्यासाठी आठवड्यातील फक्त 4 तास वेळ देण्याचा निर्णय म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचा आरोप भाजपाचे नितीन समशेट्टे यांनी केला आहे.       सध्या नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्यामुळे मुख्याधिकारीच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळीत आहेत. नवीन आलेल्या मुख्याधिकार्यांनी चार्ज घेतल्यानंतर शहरात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी नागरिकांना भेटण्यासाठीच बंधने टाकली आहेत. आठवड्यातील फक्त सोमवार आणि मंगळवार याच दिवशी 4 त 6 याच वेळेत भेटावे असा  निर्णय आपल्या कार्यालयाच्या बाहेर लावला आहे.ही  नागरिकांची केलेली चेष्टाच आहे. हा आदेश त्वरित मागे घ्यावा व नागरिकांच्या समस्या दूर करून त्यांना सुविधा देण्यासाठी वेळ द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे नितीन समशेट्टे यांनी दिला आहे. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

MB NEWS-अतिरिक्त ऊसप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - कॉ अजय बुरांडे

इमेज
  अतिरिक्त ऊसप्रश्नी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - कॉ अजय बुरांडे परळी / प्रतिनिधी     मे अखेर शिल्लक राहिलेल्या ऊसाचे पंचनामे करून एक्करी ४० टनाचा उतारा गृहीत धरून एफआरपी प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी यासह इतर मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने मंगळवारी (ता.३१) जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे. या आंदोलनात अतिरीक्त उसधारक शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन कॉ अजय बुरांडे यांनी केले आहे.  १ एप्रिल नंतर गाळप झालेल्या व ३० मे अखेर शिल्लक राहिलेल्या ऊसासोबतच गाळपास दिरंगाई झाल्यामुळे ३२ मार्च नंतर गाळप करण्यात आलेल्या सर्व ऊसाला प्रति टन पाचशे रुपये नुकसान भरपाई द्यावी.३१ मे अखेर शिल्लक राहणाऱ्या ऊसाचा सर्वे करून प्रती एकर ४० टन वजन उतारा पकडून खरीप पेरणीसाठी ३० जून पर्यंत एफआरपी प्रमाणे एकरकमी नुकसान भरपाई देण्यात यावी.ऊस वाहतुकीसाठी पन्नास किलोमीटरच्या पुढे प्रती टन प्रती किमी पाच रुपये या प्रमाणे घोषित निर्णयाच्या वितरणाची अंमलबजावणी करावी. वेळेवर ऊस न गेल्याने वेळेत पीककर्ज फेड न होऊ शकलेल्या व्याज माफीपासून वंचित राहाव

MB NEWS- *भाशिप्र च्या विजयी संचालकांनी पंकजाताई मुंडेंना भेटून मानले आभार*

इमेज
  भाशिप्र च्या विजयी संचालकांनी पंकजाताई मुंडेंना भेटून मानले आभार संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे  परळी ।दिनांक २५।  भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेवर रा. स्व. संघ प्रणित पॅनल विजयी झाल्याचा मला आनंद आहे. आगामी काळात शैक्षणिक प्रगतीसह संस्थेची अधिक भरभराट होईल असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज येथे व्यक्त केला.    भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत संस्था उत्कर्ष पॅनलला घवघवीत असे यश मिळाले. पॅनलचे २० पैकी १९ उमेदवार चांगल्या मतांच्या फरकाने विजयी झाले. आज या सर्व विजयी संचालकांनी पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले व ऋण व्यक्त केले. यावेळी बोलतांना पंकजाताईंनी सर्वांचे अभिनंदन करून त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उत्कर्ष पॅनलचा विजय हा संघशक्तीचा आहे. पॅनलच्या विजयाने मला आनंद झाला आहे. नवनिर्वाचित संचालकांच्या हातून संस्थेची अधिक भरभराट होईल अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.    यावेळी संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, पद्माकर मुळे, विकासराव डुबे यांच्यासह  पॅनलचे विजयी उमेदवार सर

MB NEWS-तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

इमेज
  तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना  कधीही जाउन भेटता येणार नाही !  परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....      परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात अभ्यागतांना भेटण्यासाठी विशिष्ट दिवस आणि ठराविक वेळ नेमून देण्यात आली आहे. याबाबत साधक-बाधक प्रतिक्रिया उमटत आहेत.        शहराची मध्यवर्ती संस्था असलेल्या नगरपरिषदेत नागरिकांची दैनंदिन कामे पडतात. सध्या नगरपरिषद प्रशासकाच्या हातात आहे. त्यामुळे अडलेल्या नडलेल्या कामांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून गार्हाणी मांडणे हा सर्वसामान्य नागरिकांकडे पर्याय असतो. मात्र आता परळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना तुम्हाला कधीही जाउन भेटता येणार नाहीये. त्याचे कारणही तसेच आहे. परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या दालनात अभ्यागतांना भेटण्यासाठी विशिष्ट दिवस आणि ठराविक वेळ नेमून देण्यात आली आहे. याबाबत साधक-बाधक प्रतिक्रिया उमटत आहेत. परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर अभ्यागतांना मुख्याधिकारी यांना भेटण्याची वेळ आणि वार ठरवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता कधीही उठून मुख्याधिकारी साहेबांची भेट होईल व आपलं गार्हाणं मांडता येईल हा पर्याय

MB NEWS-आजचे राशिभविष्य

इमेज
  आजचे राशिभविष्य  मेष- अनावश्यक खरेदी होईल. कर्जदार तगादा लावतील. सरकारी नियमांचे पालन गरजेचे. मनाविरुद्ध घटना घडतील. वाद-विवादापासून दूर राहा. वृषभ- सर्व द़ृष्टीने अनुकूल दिवस. लोकांचा विश्वास द़ृढ होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. आर्थिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस. मिथुन-कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. कौतुकास्पद कार्य कराल. इच्छापूर्तीचा दिवस. कर्क- मनाविरुद्ध घटना घडतील. नियोजनाचा अभाव असल्याने कामात अडचणी येतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. संतुलन महत्त्वाचे आहे. सिंह- त्याच त्याच चुका परत होतील. अस्वस्थता राहील. वादविवादापासून दूर राहा. मध्यस्थी करू नका.आत्मचिंतनाची गरज आहे. कन्या- कुटुंबीयांची काळजी घ्याल. सामंजस्याने प्रश्न सुटतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश प्राप्ती. पराक्रमी दिवस असेल. समाधान लाभेल. राशिभविष्य तूळ – मातुल घराण्याची मदत होईल. शत्रूंवर मात कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल. केलेल्या कार्याचे श्रेय मिळेल. पदोन्नतीचे योग संभवतात. वृश्चिक – असंयमित स्वभावामुळे मनःस्ताप होईल. एकाग्रता साधेल. वादविवा

MB NEWS-अधिकाधिक भाजप नगरसेवक निवडून आणण्यासाठी बैठकीत निर्धार

इमेज
  आगामी न.प.निवडणुक: गावभाग प्रभागात भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसली ! अधिकाधिक भाजप नगरसेवक निवडून आणण्यासाठी बैठकीत निर्धार  परळी वैजनाथ , प्रतिनिधी....आगामी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तयारी संदर्भात आज भाजपा गावभागातील प्रभाग समितीची व्यापक बैठक घेण्यात आली. सध्याच्या सत्ताधारी पक्षाचा भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करून, येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत करण्याचा निर्धार करण्यात आला. भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज गावभागातील प्रभाग समिती सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख, बुथप्रमुख यांची बैठक मंगळवार दि 24 मे रोजी भीमनगर येथे घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना जेष्ठ नेते, भाजपा राज्य सचिव  राजेशजी देशमुख यांनी विरोधकांच्या नकरात्मक गोष्टी सांगण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी सकारात्मक विचार घेऊन मतदारांच्या सुखदुःखात सामील व्हावे, प्रत्येक अडचणीत सोबत असल्याचा विश्वास द्यावा असे सांगितले. भ

MB NEWS-अतिशय ह्रदयद्रावक घटना: लग्‍न समारंभात 'गीत' गातानाच 'संगीता' यांची एक्झिट

इमेज
  अतिशय ह्रदयद्रावक घटना: लग्‍न समारंभात 'गीत' गातानाच 'संगीता' यांची एक्झिट  परभणी: होमगार्डची नोकरी सांभाळत त्‍या गाण्याचा छंद जोपासत हाेत्‍या.  लग्न समारंभात त्‍यांच्‍या सुरेल आवाजाने उपस्‍थित मंत्रमुग्ध  हाेत असतानाच त्‍यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. संगीता गव्हाणे (वय 48) असे  काळाने घाला घातलेल्‍या गायिकेचे नाव असून, विवाह समारंभातील त्‍यांच्‍या आकस्‍मिक एक्झिटने परिसरात हळहळ व्‍यक्‍त हाेत आहे. संगीता यांचा गाणे गात असलेल्या अखेरच्या काही क्षणांचा व्हिडीओ व्हायरल हाेत आहे. Click &watch: व्हिडिओ पहाण्यासाठी या ओळींवर क्लिक करा.          संगीता गव्हाणे यांचे पती पोलिस दलामध्ये जमादार म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. जिल्हा होमगार्ड दलात कार्यरत असलेल्या संगीता आपला गायनाचा छंद जोपासण्यासाठी बँड पथकात गात होत्या. शनिवारी (दि.20) पाथरी रस्त्यावरील मंगल कार्यालयात लग्नसमारंभ होता. यावेळी मिरवणुकीत असलेल्या बँड पथकात संगीता गात होत्या. याचवेळी त्‍यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्या जागीच कोसळल्या. त्यांना जव

MB NEWS-घाटनांदुरच्या तपेश्वर मठ संस्थान येथे निवासी बालसंस्कार शिबीर सुरु

इमेज
  घाटनांदुरच्या तपेश्वर मठ संस्थान येथे निवासी बालसंस्कार शिबीर सुरु  Video पाहण्यासाठी क्लिक करा : 🏵️ *उन्हाळी सुट्टीत वेळेचा सदुपयोग:घाटनांदुरमध्ये बालसंस्काराचे धडे !* घाटनांदुर :- अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदुर या ठिकाणी पहिल्याच वर्षी अध्यात्मिक बालसंस्कार शिबिराची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. उन्हाळी दिवसाच्या सुट्ट्यांचे औचित्य साधून व टीव्ही आणि मोबाईलच्या फंद्यात पडल्याने कुठेतरी मुलांशिवाय ओस  पडलेली मोठमोठी मैदाने पाहून तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीला आध्यात्मिक संस्काराची गरज भासली आणि सरस्वती संगीत विद्यालयाच्या टीम च्या पुढाकाराने अध्यात्मिक बालसंस्कार  शिबिरास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.         यावेळी मठाधिपती रुपगीर महाराज, भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज पुरी, सरस्वती संगीत क्लासेसचे संचालक तुकाराम महाराज आव्हाड, योग साधक अमोल आव्हाड, पत्रकार धर्मराज पुरी सर, तसेच सहकारी रवी पुरी सर, गजानन जाधव आदींची उपस्थिती होती. • Video पाहण्यासाठी क्लिक करा : 🏵️ *उन्हाळी सुट्टीत वेळेचा सदुपयोग:घाटनांदुरमध्ये बालसंस्काराचे धडे !*       घाटनांदुर नगरीतील तपेश्वर मठ संस्थ

MB NEWS-पंकज कुमावत पथकाची धडाकेबाज कारवाई; कत्तलखान्यात निघालेल्या गोवंशाची केली सुटका

इमेज
पंकज कुमावत पथकाची धडाकेबाज कारवाई; कत्तलखान्यात निघालेल्या गोवंशाची केली सुटका  दिनांक 23/05/2022 रोजी मा सहा पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमी बातमी मिळाली की जामखेड येथून आयशर टेम्पो क्रमांक MH 14 BJ 2800 यामध्ये बेकायदेशीररित्या 12  बैल व एक गाई भरून त्यांना क्रूरतेची वागणूक देऊन त्यांची कत्तल करण्यासाठी आज रात्री केज मार्गे  हैदराबाद येथे घेऊन जात आहे  अशी माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती त्यानी त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार यांना दिल्याने पोलीस आमदार यांनी सदर चा आयशर टेम्पो क्रमांक MH 14 BJ 28 00 आज दिनांक 24 /5/ 2022  रोजी 00. 50 वाजता धारूर चौक केज थांबून चालकास नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव जाकिर अजिज कुरेशी रा, चौसाळा व त्याचे दोन साथीदार यांना ताब्यात घेऊन त्यांना सदर  टेम्पो मधील जनावारे बाबत विचारपूस करून कागदपत्र विचारले असता व  जनावरे वाहतूक करण्याचा  परवाना विचारले असता कोणताही परवाना जवळ नसल्याचे  सांगितले व सदरची जनावरे जामखेड येथील व्यापारी साजिद कुरेशी यांच्या असून त्यांच्या सांगण्यावरून जामखेड येथून भरून हैदराबाद येथे कत्तल करण्यासाठ

MB NEWS-लातूरच्या पिकअप जीपला बीड जिल्ह्यात अपघात अपघातात सहाजण जखमी

इमेज
  लातूरच्या पिकअप जीपला बीड जिल्ह्यात अपघात अपघातात सहाजण जखमी बीड : मंगळवारी (दि.24) सकाळी पिकअप जीप व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. अपघात सहा जण जखमी झाले असून जखमींना बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मांजरसुंबा- पाटोदा दरम्यान लिंबागणेश परिसरात झाला. मंगळवारी(दि.24) सकाळी मांजरसुंबा- पाटोदा महामार्गावर लिंबागणेश येथील महावितरण कार्यालयासमोर लातूर जिल्ह्यातील पिकअप जीप आणि ट्रॅक्टरचा अपघात झाल्याचीची घटना घडली. पिकअप जीप (क्रमांक एम.एच. 24 एबी 6460) व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात महादेव जाधव (रा.लिंबागणेश) यांच्यासह पिकअप मधील बबन सोपान सुर्यवंशी (वय 50 वर्ष), कुंडलिक गंगाराम सुर्यवंशी (वय 60 वर्ष), कांशीराम सुर्यवंशी (वय 50 वर्ष), चंद्रकांत विश्वंभर माने (वय 38 वर्ष) अनुसया अच्युत सुर्यवंशी, मंडुबाई केरबा गायकवाड (वय 60 वर्ष), सिंधुबाई धमाजी माने (वय 45 वर्षं) सर्व रा. उदगीर (जि. लातूर) हे जखमीं झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग व नेकनूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, बीड येथे पाठविण्यात

MB NEWS-*परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

इमेज
  परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' ! खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद परळी वैजनाथ, प्रतिनिधी  -              परळी येथे आयोजित मिशन वात्सल्य व विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींना लाभ वितरण व संवाद मेळाव्यात मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चांगलाच हात मारल्याचे समोर आले आहे.महामेळावा ठरलेल्या या ठिकाणी निराधारांना लाभ देताना चोरट्यांनीही आपला 'आधार' या ठिकाणी शोधल्याचे दिसते.अनेकांचे खिशातून पैसे चोरीला गेल्याचे समोर आले असुन यापैकी खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.             परळी येथे प्रथमच मिशन वात्सल्य अंतर्गत कोविड मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या लाभातून दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी 5 लाखांचे धनादेश, एक पालक गमावलेल्या बालकांना प्रतिमाह 1100 रुपये सांगोपन निधी , विधवा झालेल्या महिलांना घरकुल योजनेचा लाभ, यासह विधवा महिलांना नगर परिषदेच्या माध्यमातून 5 हजार रुपयांच

MB NEWS-केज-कळंब रोडवरील एसटी आणि मोटार सायकलच्या अपघातातील जखमीचा मृत्यू

इमेज
  केज-कळंब रोडवरील एसटी आणि मोटार सायकलच्या अपघातातील जखमीचा मृत्यू कज :-  केज-कळंब रोडवर सुर्डी फाट्या जवळील जनविकास सामाजिक संस्थे जवळ मोटार सायकल आणि एसटी बसच्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. Click &read:  परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' ! खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद या बाबतची माहिती अशी की, दि. २३ मे सोमवार रोजी बिभीषण माणिक बचुटे वय (३५ वर्ष) रा. गोटेगाव ता. केज हे हिरो स्पेलेंडर मोटार सायकल क्र  (एम एच-१६/जी-१४६४) कळंब येथून गावाकडे येत असताना सायंकाळी ७:४५  वा. च्या दरम्यान केज-कळंब रोडवरील सुर्डी फाट्या जवळ असलेल्या जनविकास सामाजिक संस्थेच्या समोर केज कडून कळंबकडे भरधाव वेगाने जात असलेल्या कळंब आगराच्या केज-कळंब गाडी क्र. (एम एच-२०/बी एल-०१४८) ने समोरून जोराची धडक दिली. या अपघातात मोटार सायकल वरील बिभीषण माणिक बचुटे वय (३५ वर्ष) रा. गोटेगाव ता. केज याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. जखमीअवस्थेतील बिभीषण माणिक बचुटे वय (३५ वर्ष) यांना १०८ क्र च्या र