MB NEWS-अधिकाधिक भाजप नगरसेवक निवडून आणण्यासाठी बैठकीत निर्धार

 आगामी न.प.निवडणुक: गावभाग प्रभागात भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसली !



अधिकाधिक भाजप नगरसेवक निवडून आणण्यासाठी बैठकीत निर्धार 


परळी वैजनाथ , प्रतिनिधी....आगामी परळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तयारी संदर्भात आज भाजपा गावभागातील प्रभाग समितीची व्यापक बैठक घेण्यात आली. सध्याच्या सत्ताधारी पक्षाचा भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करून, येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत करण्याचा निर्धार करण्यात आला.

भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या आगामी नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज गावभागातील प्रभाग समिती सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख, बुथप्रमुख यांची बैठक मंगळवार दि 24 मे रोजी भीमनगर येथे घेण्यात आली. या बैठकीत मार्गदर्शन करताना जेष्ठ नेते, भाजपा राज्य सचिव  राजेशजी देशमुख यांनी विरोधकांच्या नकरात्मक गोष्टी सांगण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी सकारात्मक विचार घेऊन मतदारांच्या सुखदुःखात सामील व्हावे, प्रत्येक अडचणीत सोबत असल्याचा विश्वास द्यावा असे सांगितले. भारतीय जनता पक्षानेच आत्तापर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विविध पदे देऊन न्याय दिल्याचे सांगितले.



माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर यांनी, राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या नगर परिषदेत भ्रष्टाचाराने कळस गाठला असून नगर परिषद नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात नापास झाली असल्याचे सांगितले. वैद्यनाथ बँकेचे संचालक व प्रभागाचे प्रभारी प्रकाशराव जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांनी आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज रहावे असे सांगितले व बुथप्रमुखानी, शक्तिकेंद्रप्रमुखानी आपापल्या प्रभागातील सर्व मतदारांची इत्यंभूत माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी भाजपा उपाध्यक्ष महादेव ईटके यावेळी बोलताना  म्हणाले की परळीत नगर परिषदेचे कायमस्वरूपी सफाई कामगार आहेत त्याबरोबरच प्रत्येक महिन्याला स्वच्छतेसाठी लाखों रुपयांचे खाजगी कंत्राट असून सुद्धा शहरात जागो जागी कचऱ्याचे ढीग साचत आहेत, नाल्या वेळेवर काढल्या जात नाहीत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा परिणाम होत असल्याचे सांगितले. यावेळी रोहिदास बनसोडे, राजेश कौलवर, बाळू फुले यांनी विचार व्यक्त केले.

अश्विन मोगरकर यांनी प्रास्ताविकात नागापुर धरणात पाणी असून सुद्धा पाच दिवसाला शहराला पाणी येते. शहरातील सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. कित्येक रस्ते हे फक्त कागदावरच केलेले आहेत असा आरोप केला. आभार प्रदर्शन मुंजा फुके यांनी केले.

या बैठकीसाठी बालासाहेब कराळे, अल्पसंख्याक आघाडीचे खालेद राज, दलित आघाडीचे शहराध्यक्ष रमेश गायकवाड, रोहिदास बनसोडे,  शेरू भाई,  विकास हालगे, राजेश कौलवार, बाळू फुले, नरेश पिंपळे, सुशील हरंगुळे, सुनील मस्के, खदीर भाई, दीपक जगतकर, बंडू चौंडे,  श्रीनिवास राऊत, गोविंद मोहेंकर, विजय बुंदेले, पवन तोडकरी, अमित देशमुख, रणजित जगतकर, विशाल पंडित, विलास गायकवाड, शिवा रोडे, मोकिंद आण्णा जगतकर, राजेंद्र जगतकर यांच्या सह बुथप्रमुखकार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• परळी शहर पोलिसांची गुटख्यावर कारवाई;बावन्न हजाराचा माल जप्त

• 

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार