पोस्ट्स

इमेज
  श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार  परळी-: जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खा.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या पत्नी श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचे परळीत भारत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर पुष्पहार घालून व प्रभू श्री वैद्यनाथाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी नगरसेवक चेतन सौंदळे,शकुंतला परमेश्वरअप्पा बुरांडे, अंबाजोगाईच्या सौ. शर्मिला व्यास,श्री.कुशध्वज व्यास,युवा सेनेचे बीड जिल्हा समन्वयक श्री.अतुल दुबे,संजय खाकरे उपस्थित होते. ---------------------------------------------------------- Click:  *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली* Click:  *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा* Click: *भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस* Click: *राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग* Click: *श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार* Click: *परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन* Click: ● *वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान:आंत

●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
  परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..      परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण...... https://youtu.be/tNX8l4ILqz4

MB NEWS-परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन

इमेज
  परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन परळी  प्रतिनिधी  मोंढा व्यापारी असोसिएशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आज बुधवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. या कार्यक्रमात मोंढा परिसरातील असंख्य व्यापारी सहभागी झाले होते.    भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात असून हर घर तिरंगा नंतर आज महाराष्ट्रात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. परळी येथील मोंढा मार्केट असोसिएशनच्या वतीने आज सकाळी 11 वाजता सायरन वाजताच एकाच वेळी राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी संपूर्ण बाजारपेठ राष्ट्रगीता दरम्यान आहे त्या ठिकाणी उभे राहत सहभागी झाली होती. जन गण मन या राष्ट्रगीतांच्या ओळी सुरू होताच सर्वत्र देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले. राष्ट्रगीता नंतर भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांचा एकच निनाद करण्यात आला . परिसरात सर्वत्र नागरिकही यादरम्यान समूह राष्ट्रगीत गायनात सहभागी झाले होते. परळी येथील मोंढा व्यापारी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवीत असते आजचा हा उपक्रम देशासाठी आपले बलिदान देणाऱ्यांना जवानांना समर्पित केला

*मोखाडयातील घटना दुर्दैवी ; सरकारने आदिवासी भागात तातडीने मुलभूत सुविधा पुरवाव्यात* - *पंकजाताई मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी*

इमेज
 *मोखाडयातील घटना दुर्दैवी ; सरकारने आदिवासी भागात तातडीने मुलभूत सुविधा पुरवाव्यात*  - *पंकजाताई मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी*  मुंबई  ।दिनांक १६। आरोग्य सुविधा वेळेत न मिळाल्याने मोखाडा (जि. पालघर) तालुक्यातील एका गर्भवती महिलेच्या जुळ्या बालकांचा झालेला मृत्यु हा दुर्दैवी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत विकासरूपी पोषण अजूनही दुर्गम भागात नाही याचं दुःख आहे असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटची आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी तातडीने दखल घेतली आहे.      जव्हार - मोखाडा सारख्या दुर्गम भागातील आदिवासी महिलेच्या बाबतीत घडलेला हा प्रकार दुर्दैवी आहे, या घटनेने मी व्यथित झाले आहे असे पंकजाताई म्हणाल्या.   "एका माऊलीला जुळ्या मुलांना जीव गमवावा लागला. कारण गावाला रस्ता नाही.गरिबांच्या गरजा आणि जीवाची लढाई आजही कठीण आहे.अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या या भागात विकास रूपी पोषण अजुनही नाही याचं दुःख व दुर्दैवी वाटले " असं ट्विट त्यांनी केलं आहे.  मी स्वतः याबाबत राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे. मी मंत्री असताना

MB NEWS- *केंद्र सरकाच्या शेतकरी धोरणा विरोधात किसान सभा लढा उभारणार-कॉ अजीत नवले*

इमेज
 *केंद्र सरकाच्या शेतकरी धोरणा विरोधात किसान सभा लढा उभारणार-कॉ अजीत नवले* परळी वै. ता.१५ प्रतिनिधी     शेतकऱ्यांना आस्मानी संकटासोबत लढत असतानाच कार्पोरेट कंपन्या धार्जिणे शासकीय धोरणे, कार्पोरेट लॉबी  यांच्या विरोधात लढा उभारावा लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र होत असताना राज्यकर्त्यांना मात्र शेतकऱ्यांच्या असंतोषाची भीती वाटत नाही. कारण शेतकरी एकजुटीला भेदणारे शस्त्र जाती आणि धर्म याचा पद्धतशीर वापर करण्याचे तंत्र सत्ताधार्यांनी आत्मसात केले आहे. यावर मात करून आपल्याला लढा पुढे घेऊन जावा लागणार आहे. लढाया व्यक्तीकेंद्री न ठेवता  आपल्या सदसद विवेकातून पेटून उठले पाहिजे असे मत अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.      अखिल भारतीय किसान सभेचे २३ वे बीड जिल्हा अधिवेशन परळी तालुक्यातील मोहा येथील कॉ शिवाजीराव देशमुख नगरीत कॉ नानासाहेब पोकळे सभागृहात रविवारी (ता.१४) पार पडले. यावेळी किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ किसन गुजर, व कवी शामसुंदर सोन्नर महाराज यांची प्रमुख उपस्थीती होती. यावेळी बोलताना कॉ अजीत नवले यांनी शेती प्रश्नावर व केंद्र सरकारच्या शेतकरी

MB NEWS-LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी

इमेज
  LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी भारतीय आयुर्विमा महामंडळात नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरूणांना सुवर्णसंधी आहे. LIC च्या गृहनिर्माण शाखेमध्ये सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापकच्या ८० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. किमान २१ तर कमाल ४० वयोमर्यादा असलेल्या पदवीप्राप्त उमेदवारांकडून २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. कोणत्याही विषयात पदवी प्राप्त विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतात. सहायक प्रबंधक पदासाठी २१ ते ४० पर्यंत तर सहाय्यक पदासाठी २१ ते २८ वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. सहाय्यक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला ३३ हजार ९६० रुपये तर सहाय्यक प्रबंधक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ८० हजार वेतन मिळणार आहे. असा करा अर्ज..... अर्हता प्राप्त उमेदवार भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या  lichousing.com या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसह गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार आहे. परिक्षेचे स्वरूप व निवड प्रक्रिया ८० पदांसाठी घेण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेकरीता एकूण २

●थेट प्रक्षेपण...... परळी वैजनाथ: शिवमहापुराण

इमेज
 परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण..     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात झाली आहे. ●थेट प्रक्षेपण...... --------------------------------------------- परळी वै.,प्रतिनिधी      बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. मथुरा प्रतिष्ठानने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित बातमी: *आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक - प.पु.प्रदीप मिश्रा* _भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात_

MB NEWS- *नेपाळ कल्चरल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये रानबा गायकवाड लिखित आणि प्रा. सिध्दार्थ तायडे दिग्दर्शित "पाण्याखालचं पाणी" लघुचित्रपटाची निवड*

इमेज
 *नेपाळ कल्चरल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये रानबा गायकवाड लिखित आणि प्रा. सिध्दार्थ तायडे दिग्दर्शित "पाण्याखालचं पाणी" लघुचित्रपटाची  निवड*   परळी,प्रतिनिधी ः   ज्येष्ठ साहित्यीक व पत्रकार रानबा गायकवाड लिखीत आणि प्रख्यात  सिने-नाटय अभिनेता-दिग्दर्शक प्रा. सिध्दार्थ तायडे दिग्दर्शित "पाण्याखालचं पाणी"या लघुचित्रपटाची नेपाळ कल्चरल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या अंतिम फेरीत जगभरातील ३४ देशातील लघुपटातून निवड करण्यात आली आहे.नेपाळ देशातील सांस्कृतिक राजधानी म्हणून परिचित असलेल्या काठमांडू येथे 8 डिसेंबर रोजी हा महोत्सव संपन्न होणार आहे. प्रा. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित पाण्याखालचं पाणी हा लघुपट जगभरातील नामांकित महोत्सवात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे.  ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे.    वास्तवावर आधारित असलेल्या या लघुपटाची निर्मिती-कथा-पटकथा- संवाद प्रसिद्ध साहित्यिक रानबा गायकवाड यांची असून प्रख्यात सिने-नाट्य अभिनेता -लेखक- दिग्दर्शक प्रा. सिध्दार्थ तायडे यांनी दिग्दर्शन केले आहे . सिनेमोटोग्राफी मनोज आलदे

MB NEWS-१५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?

इमेज
  १५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?           भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात १५ ऑगस्ट हा 'स्वातंत्र्य दिन' आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला. देशात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात आला. आता १५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर  करायचे काय ? हा प्रश्न  सर्वांना पडला असला तरी याबाबतीत ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे.           ध्वजसंहिता काय सांगते? भारतीय ध्वज संहितेतल्या नियम २.२ नुसार, कापडी राष्ट्रध्वज खराब झाल्यास किंवा त्याचा रंग फिका झाल्यास तो वापरणं टाळावं. असं न केल्यास तो तिरंग्याचा अपमान समजला जातो. अशा वेळी खराब झालेल्या राष्ट्रध्वजास वेगळ्या जागी नेऊन पूर्णपणे नष्ट करणं गरजेचं आहे. एक तर राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही खराब ध्वज नष्ट करू शकता. - ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवावा. - ध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ नये. - राष्ट्रध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी किंवा अन्य कारणासाठी

MB NEWS-भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात

इमेज
   आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक - प.पु.प्रदीप मिश्रा भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) दि.१५ - प्रभू वैद्यनाथांच्या पावन भुमीत आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेला आज सुरुवात झाली.येथील मथुरा प्रतिष्ठान कडून या कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.भगवान शंकराच्या आराधनेकरिता पवित्र समजला जाणाऱ्या श्रावण महिन्यात शिव भक्तांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक असे प्रतिपादन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी यावेळी केले.कथा श्रवण करण्यासाठी देशभरातून भाविक दाखल झालेले आहेत. श्रावण पर्वात ही कथा संपन्न होत आहे,या कथेचे मुख्य यजमान प्रभू वैद्यनाथ आहेत त्यांच्या इच्छेशिवाय या भूमीत कथा होणे अशक्य आहे.बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कथा करण्याची सोमाणी परिवाराचा संकल्प आहे त्याची सुरुवात परळी च्या वैद्यनाथापासून सुरू झाली आहे.यावेळी महाराजश्रींनी विविध भक्तांनी पाठवलेले पत्र वाचून दाखवले.मनाला माळे सोबत जोडा म्हणजे परमात्मा मिळेल,शिवमहापुराणात २४००० श्लोक आहेत.या श्लोकांत

MB NEWS-विनायक मेटे यांच्या मराठा आरक्षणाच्या अधु-या लढ्याला बळ देऊ -पंकजाताई मुंडे

इमेज
  विनायक मेटे यांच्या मराठा आरक्षणाच्या अधु-या  लढ्याला बळ देऊ -पंकजाताई मुंडे *पंकजाताई मुंडे यांनी शोकसभेत वाहिली मेटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली* बीड ।दिनांक १५। शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या अधु-या लढ्याला आगामी काळात बळ देणार आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मेटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.    विनायक मेटे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी श्रध्दांजली अर्पण करतांना पंकजाताई मुंडे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या,  मेटे यांचे नेतृत्व प्रस्थापितांच्या नव्हे तर एका    सामान्य गरीब कुटुंबातून पुढे आलेला उमदा चेहरा होता. त्यांची  अशी एक्झीट होईल असे वाटले नव्हते.  त्यांचे आणि माझे ऋणानुबंध राहतील. आमच नातचं अस होतं, कधी आम्ही भांडायचो पण कधी तेवढीच मैत्री असायची. आमची भेट ठरली होती. १५ ऑगस्टनंतर आम्ही भेट घेणार होतो पण त्यापूर्वीच ही दुःखद घटना घडली याची मला कायम रूखरूख राहील असे त्या म्हणाल्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड महामंडळ व्हावे अशी त्यांनी आग्रही

MB NEWS-विनायक मेटे अनंतात विलिन ! साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

इमेज
  विनायक मेटे अनंतात विलिन ! साश्रुनयनांनी अखेरचा निरोप  बीड:  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आज अनंतात विलिन झाले. त्यांच्या पार्थिवाला आज अग्नी देण्यात आला आणि एका संघर्षाचा शेवट झाला. विनायक मेटे यांचे बीडमधील शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलं. विनायक मेटे यांचं रविवारी एका अपघातात निधन झालं होते. त्यांना अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. विनायक मेटें अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री आणण्यात आलं आहे. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात आणण्यात आलं. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलं.  दरम्यान, विनायक मेटे यांच्या अंत्यसंस्कारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विनायक मेटे यांचे

MB NEWS- *वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र वैविध्यपूर्ण रंगछटांच्या विद्युत रोषणाईने झगमगीत* ■ *परळीत तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्तांनी साधली दर्शन पर्वणी!*

इमेज
 वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र वैविध्यपूर्ण रंगछटांच्या विद्युत रोषणाईने झगमगीत  ■ *परळीत तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्त शिवभक्तांनी साधली दर्शन पर्वणी!* परळी वैजनाथ . ......              देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या  प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत तिसर्‍या श्रावणी सोमवार निमित्तदर्शनासाठी अपेक्षित गर्दी वाढली. परळी व पंचक्रोशीत श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावण सोमवारला विशेष महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे आज संकष्टी चतुर्थी व सोमवार एकत्र आल्यानेही  मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी दाखल झाले. त्यामुळे या सोमवारी इतर सोमवार पेक्षा भाविकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.                 पवित्र  श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत आज तिसर्‍या श्रावणी सोमवारनिमित्ताने बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक दाखल   झाले.काल रविवारीच प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मोठा ओघ सुरू झाला होता.धर्मदर्शन रांगेत कालपासूनच भाविकांची गर्दी पहावयास मिळत होती  तर सकाळी यामध्ये मोठी वाढ  झाली. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. त्

MB NEWS-परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण...

इमेज
परळी येथे आयोजित शिवमहापुराण कथा थेट प्रक्षेपण...   ----------------------------------------------- परळी वै.,प्रतिनिधी      बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. मथुरा प्रतिष्ठानने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.

MB NEWS-कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांचे परळीत आगमन; प्रभु वैद्यनाथाची पुजा व दर्शन

इमेज
  कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांचे परळीत आगमन; प्रभु वैद्यनाथाची पुजा व दर्शन  परळी वै.,प्रतिनिधी      बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे आज 14रोजी परळीत आगमन झाले.त्यानी बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग प्रभु वैद्यनाथ पुजा व दर्शन घेतले.     वैद्यनाथ देवस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.यावेळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर,वैद्यनाथ देवल कमेटीचे विश्वस्त राजेश देशमुख,मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अभयकुमार ठक्कर,देवल कमेटीचे विश्वस्त प्रा.बाबासर देशमुख,बाबुराव मेनकुदळे,अनिल तांदळे,नागोराव देशमुख,रघुविर देशमुख,नंदकिशोर जाजु,आदी मान्यवर उपस्थित होते.

MB NEWS-प्रभु वैद्यनाथांचे पहिले सुमधूर ध्वनीमुद्रित स्तुतीगीत लाॅन्च

इमेज
  प्रभु वैद्यनाथांचे पहिले सुमधूर ध्वनीमुद्रित स्तुतीगीत लाॅन्च परळी वैजनाथ प्रतिनिधी प्रभू वैद्यनाथावर प्रथमच ध्वनिमुद्रित केलेल्या गोपाळ आंधळे यांनी रचलेल्या गीताचे आंतरराष्ट्रीय कथा वाचक व पु प्रदीप जी मिश्रा यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.         बारा ज्योतिर्लिंगापैकी 5 वे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाचे प्रथमच एक स्तुती गीत सुमधुर आवाजात ध्वनिमुद्रित करून प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रभु वैद्यनाथाच्या गुणगाणाचे हे गीत भाविक भक्तांमध्ये नक्कीच लोकप्रिय ठरणार आहे.     परळीचे शिवभक्त गोपाळ आंधळे यांनी या गीताची रचना केली असून संगीतमय सुमधुर आवाजात या गीताचे ध्वनिमुद्रण करण्यात आले आहे. प्रभू वैद्यनाथ व परळीचे महात्म्य या गीतातून वर्णन करण्यात आले आहे. प्रभु वैद्यनाथाचा महिमा असणारे हे सुमधुर गीत नक्कीच भाविक भक्तांमध्ये व परळी करांमध्ये लोकप्रिय ठरणार आहे. Click &watch: *प्रभु वैद्यनाथांचे पहिले सुमधूर ध्वनीमुद्रित स्तुतीगीत लाॅन्च.* _|MB NEWS |SUBSCRIBE |LIKE |SHARE_     तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला वैद्यनाथाचे स्तुतिगान करणारे हे वैद्यनाथ स्

MB NEWS-आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री. प्रदिप मिश्रा यांची उद्यापासून परळीत शिव महापुराण कथा

इमेज
  आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री. प्रदिप मिश्रा यांची उद्यापासून परळीत शिव महापुराण कथा  परळी वै.,प्रतिनिधी      बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. मथुरा प्रतिष्ठानने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.     परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रध्वजाचे प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या हस्ते व प्रशासकीय अधिकारी व परळी येथील शिवभक्तांच्या उपस्थीतीत ध्वजारोहण होणार असुन यानंतर हवेत तिरंगा बलुन सोडण्यात येणार आहेत. परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानावरील एकुण ३३ एकरातील दहा एक्करमध्ये मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे.  @@ *महाराष्ट्रासह पर राज्यातुन शिवभक्त येणार*  सध्या सुरू असलेला श्रावण मास

MB NEWS- *जाती-धर्म-भावनिकतेच्या विचार सोडूनच लोकशाही टिकविता येईल : कॉ.अजय बुरांडे*

इमेज
 जाती-धर्म-भावनिकतेच्या विचार सोडूनच लोकशाही टिकविता येईल : कॉ.अजय बुरांडे परळी / प्रतिनिधी स्वातंत्र्य समरातील अमर हुतात्मे ज्यांनी आयुष्यातील कित्येक वर्ष स्वातंत्र्यासाठी तुरुंगात काढली,देशाला एकसंघ ठेवण्यासाठी शहीद झाले त्यांचे योगदान कदापी विसरू नये,नव्या पिढीला इतिहास समजावा या उदात्त व सदहेतूने " जागर लोकशाहीचा जथा स्वातंत्र्याचा " ही मोहीम राबविण्यात येत असल्याचेप्रतिपादन कॉ. अजय बुरांडे यांनी परळी तालुक्यातील नागापूर येथे जाहीर सभेत केले. "जागर लोकशाहीचा जत्था स्वातंत्र्याचा" या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या जत्था रविवार दि 14 रोजी सकाळी 9 ला परळी तालुक्यातील नागापूर येथे दाखल झाला.यावेळी नागापूर गावकऱ्यांनी जथ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.गावातील ग्राम पंचायत कार्यालयासमोर यावेळी जाहीर सभा संपन्न झाली यावेळी.माकपाचे जिल्हा सचिव कॉ.अजय बुरांडे,कॉ.पांडुरंग राठोड,कॉ.सुदाम शिंदे आदीसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलताना कॉ.बुरांडे म्हणाले की,देशाला कंपनी सरकारच्या

MB NEWS-*राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर*

इमेज
*राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर* मुंबई, दि. 14:  राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.  त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.  *इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:* *सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील -*  महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास *सुधीर मुनगंटीवार-* वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय *चंद्रकांत पाटील-*  उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य *डॉ. विजयकुमार गावित-*  आदिवासी विक

MB NEWS-भूमिपुत्राला आदरांजली:बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने उद्या बंदचे आवाहन

इमेज
  भूमिपुत्राला आदरांजली: बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने उद्या बंदचे आवाहन बीड – शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष माजी आ विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पार्थिवावर सोमवारी बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आपल्या या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी म्हणून सोमवारी बीड जिल्हा बंद चे आवाहन केले आहे. संबंधित बातमी: *मराठा आरक्षण बैठकीसाठी निघालेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आपघाती निधन* शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे लढवय्ये नेते तथा मराठा आरक्षणासाठी आयुष्यभर लढा देणारे माजी आ.विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाने बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे बीड जिल्ह्याच्या सामाजिक,राजकीय क्षेत्रावर मोठा आघात झाला आहे. ही पोकळी कधीही भरुन येणार नाही. संबंधित बातमी: *विनायक मेटे यांच्या निधनाने चळवळीत काम करणाऱ्या नेत्याला महाराष्ट्र मुकला* *पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली* विनायकराव मेटे यांच्या पार्थीवावर उद्या दि. 15 ऑगस्ट रोजी दुपारी बीड शहरा

MB NEWS-घात की आपघात: तपासासाठी आठ पथकांची नियुक्ती

इमेज
  घात की आपघात: तपासासाठी आठ पथकांची नियुक्ती मुंबई : विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची आता चौकशी होणार आहे. विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकाची चौकशी होणार आहे. एकनाथ कदम असे या चालकाचे नाव आहे. एकूण आठ पथके तयार करण्यात आली आहेत. फॉरेन्सिकची टीमदेखील यामध्ये असणार आहे.  संबंधित बातमी: *मराठा आरक्षण बैठकीसाठी निघालेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आपघाती निधन* पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. एक ते दोन तास मदत मिळाली नाही, असे चालकाने सांगितले आहे. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि ही गाडी कंटेनरला डाव्या बाजूने जोरदारपणे धडकली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. गाडीच्या डाव्या भागाचा चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, विनायक मेटे यांचे पार्थिव जे. जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. याठिकाणी त्यांचे शवविच्छेदन केले जाईल. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाबाहेर विनायक मेटेंच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. यावेळी विनायक मेटे अमर रहे, अशा घोषणाही देण्यात येत होत्या. संबंधित बातमी: *विनायक मेटे यांच्या निधनाने चळवळीत काम करणाऱ्या नेत्याला महाराष्ट्र मुकला*
इमेज
  *श्रीविठ्ठलांनी  वाघ्ररुपात येऊन संत जगमित्रनागा यांना विठोबाची टोंगीवर दर्शन दिले.*   *संतचरित्र लेखक ॲड दत्तात्रय महाराज आंधळे*  परळीवैजनाथ(प्रतिनिधी)संतजगमित्रनागा यांच्या करिता भगवान श्रीविठ्ठलांनी वाघाचे रूपांत येऊन दर्शन दिले . विठोबाची टोंगी (विठ्ठल टेकडी) संत व देव यांचे मुळे पुनीत झालेली आहे असे प्रतिपादन संतजगमित्रनागा चरित्र लेखक तथा संतवाड्.मयाचे संशोधक ह.भ.प.ॲड. दत्तात्रय महाराज आंधळे यांनी  केले.                    मौजे नंदागौळ येथील 'श्रीविठ्ठल टेकडी'येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या  सप्ताहाचे प्रथम पुष्प गुंफताना ह.भ.प. ॲड दत्तात्रय महाराज आंधळे यांनी संतजगमित्रनागा यांच्या *,"भक्ताचिया काजा| रुप धरिले सहजा||१||वैजयंती कुंडलमाळा|पितांबंर घन सांवळा||२||"* या अभंगावर संशोधन युक्त  व भावयुक्त कीर्तन केले.या कीर्तनास गायनाचार्य ह.भ.प.महादेव महाराज गोपाळे,ह.भ.प.अनंत महाराज दौंड,ह.भ.प.ऋक्षराजमहाराज आंधळे ,ह.भ.प.केशव महाराज गीत्ते शास्त्री,मृदंगाचार्य ह.भ.प विष्णू महाराज जायभाये,आदिंची  साथ संगत लाभली. सरपंच सौ.पल्लवी सुंदरराव गीत्ते,श

MB NEWS-दिवंगत विनायक मेटे यांच्या पार्थिवावर उद्या बीडला अंत्यसंस्कार

इमेज
  दिवंगत विनायक मेटे यांच्या पार्थिवावर उद्या बीडला अंत्यसंस्कार बीड: मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर जाताना बोगद्याजवळ १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता झालेल्या अपघातात शिवसंग्रामचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचे दुर्दैवी निधन झाले. या बातमीने बीडवर शोककळा पसरली.  आ. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर उद्या १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता शहरातील कॅनॉल रोडवरील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. संबंधित बातमी: *मराठा आरक्षण बैठकीसाठी निघालेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आपघाती निधन* रविवारची सकाळ माजी आ. विनायक मेटे यांच्या निधनाच्या बातमीने उगवली अन् बीडकरांना धक्काच बसला. यानंतर पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या दिशेने धाव घेतली तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिवसंग्राम भवन येथे पोहोचले. यावेळी अनेकांना शोक अनावर होत होता. अंत्यविधी कोठे करायचा, याबाबत कुटुंबियाशी चर्चा करुन अखेर रिलायन्स पेट्रोल पंपामागील कॅनॉल रोडजवळील शेत हे ठिकाण निश्चित करण्यात आले. शिवसंग्राम भवन येथे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके, पो.नि. केतन राठोड