इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

*मोखाडयातील घटना दुर्दैवी ; सरकारने आदिवासी भागात तातडीने मुलभूत सुविधा पुरवाव्यात* - *पंकजाताई मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी*

 *मोखाडयातील घटना दुर्दैवी ; सरकारने आदिवासी भागात तातडीने मुलभूत सुविधा पुरवाव्यात*



 - *पंकजाताई मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी* 


मुंबई  ।दिनांक १६।

आरोग्य सुविधा वेळेत न मिळाल्याने मोखाडा (जि. पालघर) तालुक्यातील एका गर्भवती महिलेच्या जुळ्या बालकांचा झालेला मृत्यु हा दुर्दैवी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत विकासरूपी पोषण अजूनही दुर्गम भागात नाही याचं दुःख आहे असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटची आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी तातडीने दखल घेतली आहे. 


    जव्हार - मोखाडा सारख्या दुर्गम भागातील आदिवासी महिलेच्या बाबतीत घडलेला हा प्रकार दुर्दैवी आहे, या घटनेने मी व्यथित झाले आहे असे पंकजाताई म्हणाल्या.   "एका माऊलीला जुळ्या मुलांना जीव गमवावा लागला. कारण गावाला रस्ता नाही.गरिबांच्या गरजा आणि जीवाची लढाई आजही कठीण आहे.अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या या भागात विकास रूपी पोषण अजुनही नाही याचं दुःख व दुर्दैवी वाटले " असं ट्विट त्यांनी केलं आहे.


 मी स्वतः याबाबत राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे. मी मंत्री असताना दुर्गम भागातील रस्त्याकडे  विशेष लक्ष दिले होते. मंत्री आणि अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून काम केलं पाहिजे. सरकारने दुर्गम भागाच्या विकासाकडे लक्ष द्यावे आणि राज्य सरकार ते करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान पंकजाताई यांच्या ट्विटची आदिवासी विकास मंत्री गावित यांनी तातडीने दखल घेत सरकारी पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. 

••••

----------------------------------------------------------

Click: *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली*

Click: *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा*

Click:*भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस*

Click:*राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग*

Click:*श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार*

Click:*परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन*

Click:● *वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान:आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरुन धनंजय मुंडेंनी ठणकावून सांगितले......* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

■ VIDEO News ■

--------------------------------------------

Click:  ■ *LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी*

Click :■ *१५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?*

■ VIDEO News ■





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!