इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी

 LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी


भारतीय आयुर्विमा महामंडळात नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरूणांना सुवर्णसंधी आहे. LIC च्या गृहनिर्माण शाखेमध्ये सहाय्यक आणि सहाय्यक व्यवस्थापकच्या ८० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. किमान २१ तर कमाल ४० वयोमर्यादा असलेल्या पदवीप्राप्त उमेदवारांकडून २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.


कोणत्याही विषयात पदवी प्राप्त विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतात. सहायक प्रबंधक पदासाठी २१ ते ४० पर्यंत तर सहाय्यक पदासाठी २१ ते २८ वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. सहाय्यक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला ३३ हजार ९६० रुपये तर सहाय्यक प्रबंधक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ८० हजार वेतन मिळणार आहे.

असा करा अर्ज.....

अर्हता प्राप्त उमेदवार भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या lichousing.com या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसह गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार आहे.


परिक्षेचे स्वरूप व निवड प्रक्रिया

८० पदांसाठी घेण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेकरीता एकूण २०० प्रश्न व १२० मिनिटे वेळ असणार आहेत. यानंतर उमेदवारांची मुलाखत देखील घेतली जाणार आहे. सप्टेंबर ते ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा होणार आहे.

----------------------------------------------------------

Click: *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली*

Click: *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा*

Click:*भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस*

Click:*राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग*

Click:*श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार*

Click:*परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन*

Click:● *वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान:आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरुन धनंजय मुंडेंनी ठणकावून सांगितले......* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

■ VIDEO News ■

--------------------------------------------

Click:  ■ *LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी*

Click :■ *१५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?*

■ VIDEO News ■





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या