युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री. प्रदिप मिश्रा यांची उद्यापासून परळीत शिव महापुराण कथा

 आंतराष्ट्रीय कथा वाचक प.पु.श्री. प्रदिप मिश्रा यांची उद्यापासून परळीत शिव महापुराण कथा 


परळी वै.,प्रतिनिधी


     बारा ज्योतीर्लिंगापैकी पाचवे ज्योतीर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांच्या पावण भुमी असलेल्या परळीत येत्या सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे. मथुरा प्रतिष्ठानने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

    परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पासुन दुपारी १ ते ४ या वेळेत अांतराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेस सुरूवात होत आहे.सोमवार १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रध्वजाचे प.पु.प्रदिप मिश्रा यांच्या हस्ते व प्रशासकीय अधिकारी व परळी येथील शिवभक्तांच्या उपस्थीतीत ध्वजारोहण होणार असुन यानंतर हवेत तिरंगा बलुन सोडण्यात येणार आहेत. परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानावरील एकुण ३३ एकरातील दहा एक्करमध्ये मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

@@

*महाराष्ट्रासह पर राज्यातुन शिवभक्त येणार* 

सध्या सुरू असलेला श्रावण मास या शिवाय पाचवे ज्योर्तिर्लिंगामुळे परळीत शिव महापुराण कथेला बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रासह पर राज्यातुन शिवभक्त येणार  मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार अशी शक्यता लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त वाढवला जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी १५० सिक्युरिटी गार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. 

@@

*सात दिवस रक्तदान शिबिर, बुस्टर डोस मिळणार* 

परळी येथील शिवपुराण कथा  मंडपस्थळी  १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२२ अशा सात दिवसाच्या काळात रक्तदान शिबिर, कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती तेजस सोमानी यांनी दिली. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या