इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *केंद्र सरकाच्या शेतकरी धोरणा विरोधात किसान सभा लढा उभारणार-कॉ अजीत नवले*

 *केंद्र सरकाच्या शेतकरी धोरणा विरोधात किसान सभा लढा उभारणार-कॉ अजीत नवले*



परळी वै. ता.१५ प्रतिनिधी

    शेतकऱ्यांना आस्मानी संकटासोबत लढत असतानाच कार्पोरेट कंपन्या धार्जिणे शासकीय धोरणे, कार्पोरेट लॉबी  यांच्या विरोधात लढा उभारावा लागेल. शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र होत असताना राज्यकर्त्यांना मात्र शेतकऱ्यांच्या असंतोषाची भीती वाटत नाही. कारण शेतकरी एकजुटीला भेदणारे शस्त्र जाती आणि धर्म याचा पद्धतशीर वापर करण्याचे तंत्र सत्ताधार्यांनी आत्मसात केले आहे. यावर मात करून आपल्याला लढा पुढे घेऊन जावा लागणार आहे. लढाया व्यक्तीकेंद्री न ठेवता  आपल्या सदसद विवेकातून पेटून उठले पाहिजे असे मत अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.

     अखिल भारतीय किसान सभेचे २३ वे बीड जिल्हा अधिवेशन परळी तालुक्यातील मोहा येथील कॉ शिवाजीराव देशमुख नगरीत कॉ नानासाहेब पोकळे सभागृहात रविवारी (ता.१४) पार पडले. यावेळी किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ किसन गुजर, व कवी शामसुंदर सोन्नर महाराज यांची प्रमुख उपस्थीती होती. यावेळी बोलताना कॉ अजीत नवले यांनी शेती प्रश्नावर व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर ळेतकऱ्यांना सवीस्तर मार्गदर्शन केले. अधिवेशनाचे उद्घघाटन बालाघाट एँग्रो प्रोडूस कंपनी अंबाजोगाईचे संचालक शेख ईरफान यांनी केले आहे. अधिवेशची सुरूवात किसान सभेच्या ध्वजाचे ध्वजारोहन जेष्ठ नेते कॉ सुदामदादा देशमुख यांच्या हस्ते करूण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तावीक कॉ अजय बुरांडे यांनी केले. शोकसंदेशाचे वाचन कॉ पांडुरंग राठोड यांनी केले. मागील तीन वर्षाचा संघटनेचा कार्यअहवाल कॉ मुरलीधर नागरगोजे यांनी मांडला. अहवालावर झालेल्या चर्चेत जिल्हाभरातील वीस प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. यावेळी कॉ अजीत नवले व कॉ किसन गुजर यांनी किसान सभा प्रत्येक गावात पोंहोचविण्याचे आवहान केले. अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी कॉ अजय बुरांडे, सरचिटणीसपदी कॉ मुरलीधर नागरगोजे, कार्याध्यक्ष कॉ कासीराम सिरसाट, कार्यकारीणीत कॉ पांडुरंग राठोड, कॉ विष्णु देशमुख, कॉ रूस्तुम माने, कॉ भगवान बडे, कॉ बालासाहेब कडभाने, कॉ गंगाधर पोटभरे, कॉ मोहन लांब, कॉ सावळाराम उबाळे, कॉ अशोक डाके, कॉ जगदिश फरताडे, कॉ दादासाहेब सिरसाट यांचा समावेश करण्यात आला आहे.

----------------------------------------------------------

Click: *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली*

Click: *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा*

Click:*भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस*

Click:*राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग*

Click:*श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार*

Click:*परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन*

Click:● *वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान:आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरुन धनंजय मुंडेंनी ठणकावून सांगितले......* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

■ VIDEO News ■

--------------------------------------------

Click:  ■ *LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी*

Click :■ *१५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?*

■ VIDEO News ■





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!