युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात

  

आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक - प.पु.प्रदीप मिश्रा

भक्तिमय वातावरणात अभिषेक शिवमहापुराण कथेला सुरुवात


परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) दि.१५ - प्रभू वैद्यनाथांच्या पावन भुमीत आंतरराष्ट्रीय कथा वाचक भागवत भुषण प.पु.प्रदिपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिव महापुराण कथेला आज सुरुवात झाली.येथील मथुरा प्रतिष्ठान कडून या कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.भगवान शंकराच्या आराधनेकरिता पवित्र समजला जाणाऱ्या श्रावण महिन्यात शिव भक्तांसाठी ही एक पर्वणीच असणार आहे.आत्मा परमात्म्याचे मिलन म्हणजे अभिषेक असे प्रतिपादन प.पु.प्रदीपजी मिश्रा यांनी यावेळी केले.कथा श्रवण करण्यासाठी देशभरातून भाविक दाखल झालेले आहेत.



श्रावण पर्वात ही कथा संपन्न होत आहे,या कथेचे मुख्य यजमान प्रभू वैद्यनाथ आहेत त्यांच्या इच्छेशिवाय या भूमीत कथा होणे अशक्य आहे.बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कथा करण्याची सोमाणी परिवाराचा संकल्प आहे त्याची सुरुवात परळी च्या वैद्यनाथापासून सुरू झाली आहे.यावेळी महाराजश्रींनी विविध भक्तांनी पाठवलेले पत्र वाचून दाखवले.मनाला माळे सोबत जोडा म्हणजे परमात्मा मिळेल,शिवमहापुराणात २४००० श्लोक आहेत.या श्लोकांतील एकही शब्दही कानावर पडल्यास मानव जीवाचे कल्याण होते.भगवान शंकराची कथा परिवार जोडायाला शिकवते असेही पूज्य गुरुदेव म्हणाले.


आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला गेला हा सोहळा अभुतपुर्व होता. व्यासपीठावरून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्याना अभिवादन केले गेले.सकाळी १० वा कथास्थळी ध्वजारोहन करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली यासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.कथेच्या सुरुवातीला मुख्य यजमान गोपाल बन्सीलालजी सोमाणी यांनी आपल्या परिवारासोबत व्यासपूजन केले.कथेदरम्यान महाराजांनी गायलेल्या विविध भजनांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.कथास्थळी तिरंगे बलून लावत नयनरम्य सजावट केली गेली.आरतीने प्रथम दिवसाच्या कथेची सांगता करण्यात आली.कथा श्रवण करण्यासाठी राजश्रीताई धनंजय मुंडे या उपस्थित होत्या,त्यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली.


 *- व्यासपीठावरील वैद्यनाथ मंदिराच्या प्रतिकृतीने वेधले भाविकांचे लक्ष -*


शिवकथेस्थळी व्यासपीठावर वैद्यनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

ही प्रतिकृती अगदी हुबेहूब दिसत असून सोबत दोन दीपमाळ महादेवाची पिंड आणि नंदी महाराज असा मनमोहक नजारा भाविकांना भारावून टाकणारा आहे. मंदिराकडे कावड घेऊन जाणारे कावडी असा नयनरम्य नजारा कथा श्रवण करतांना शिवभक्तांना पहावयाला भेटणार आहे.कथेचा भव्यदिव्य मंडप डोळे दिपावणारा आहे.

----------------------------------------------------------

Click: *घरफोडी:दीड लाखाची रोख रक्कम चोरली*

Click: *सावधान: ओटीपी विचारून दीड लाखाचा गंडा*

Click:*भाजप संसदीय मंडळातून नितीन गडकरी बाहेर तर केंद्रीय निवडणूक प्रचार समितीत देवेंद्र फडणवीस*

Click:*राणी लक्ष्मीबाई टॉवर येथील समूह राष्ट्रगीत गायनात नागरिकांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग*

Click:*श्रीमती महानंदाबाई गंगाधरअप्पा बुरांडे यांचा सत्कार*

Click:*परळीतील व्यापाऱ्यांनी केले सामूहिक राष्ट्रगीत गायन*

Click:● *वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान:आंतरराष्ट्रीय कथा व्यासपीठावरुन धनंजय मुंडेंनी ठणकावून सांगितले......* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा._

■ VIDEO News ■

--------------------------------------------

Click:  ■ *LIC मध्ये नौकरीची सुवर्णसंधी*

Click :■ *१५ आँगस्टला घरी फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे नंतर करायचे काय ?*

■ VIDEO News ■





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या