पोस्ट्स

MB NEWS-कार्तिकीवारी: परळी आगारातून मागणीनुसार विशेष यात्रा बस

इमेज
  कार्तिकीवारी: परळी आगारातून मागणीनुसार विशेष यात्रा बस कार्तिक एकादशी यात्रे निमित्त परळी आगारामार्फत नियमितपणे 3 विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. कार्तिक एकादशी उत्सव दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परळी आगाराने परळी येथून पंढरपूर साठी विशेष बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.       हसकाळ,दुपार व संध्याकाळ या समयी परळी आगारामार्फत या विशेष बस सोडण्यात येणार असून ग्रामीण भागातून देखील प्रवाशी संख्या जास्त असल्यास थेट पंढरपूर दर्शन घडवून त्यांना परत गावी सोडण्यासाठी देखील मागणीनुसार एस.टी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● कार्तिकीवारी निमित्ताने परळी आगारामार्फत दररोज 3 विशेष यात्रा बस सेवा सुरू करण्यात येणार असून ग्रामीण भागात देखील प्रवाशी संख्या जास्त असल्यास मागणीनुसार गावात एस.टी बस देऊन पंढरपूर दर्शन घडवून त्यांना परत गावी सोडण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील भाविकांची याबाबत परळी आगाराशी संपर्क करावा ★ प्रवीण भोंडवे ★ आगार प्रमुख परळी वै

MB NEWS-कार्तिकीवारी:परळी मार्गे पंढरीला दोन विशेष रेल्वे पण रिझर्व्हेशन आवश्यक

इमेज
  कार्तिकीवारी:परळी मार्गे पंढरीला दोन विशेष रेल्वे पण रिझर्व्हेशन आवश्यक              कार्तिक एकादशी यात्रे निमित्त आदिलाबाद आणि नांदेड येथून पंढरपूर करिता पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या दक्षिण मध्य रेल्वेने सुरू केली आहे. कार्तिक एकादशी उत्सव दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता मराठवाड्यातून मोठ्या संख्येने यात्रेकरू प्रवास करतात. प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेने आदिलाबाद आणि नांदेड येथून पंढरपूर साठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहे. गाडी क्र 07502 ही आदिलाबाद ते पंढरपूर गुरुवार दि 3 नोव्हेंबर रोजी धावणार आहे.आदिलाबाद येथीन ही गाडी दुपारी 2 ला सुटणार असून परळी येथे ही विशेष गाडीची वेळ सायंकाळी 10:20 असणार आहे.दुसरी विशेष रेल्वे गाडी क्र 07503 नांदेड ते पंढरपूर ही सोमवार दि 7 रोजी धावणार असून या गाडीची परळी येथे येण्याची वेळ सायंकाळी 10:50 असणार आहे.परतीचा प्रवास पंढरपूर-आदिलाबाद ही 4 नोव्हेंबर तर पंढरपूर-नांदेड ही 8 नोव्हेंबर रोजी करणार आहे. या गाडीस 10 सकैंड सीटिंग ( 2s), 08 स्लीपर क्लास, 01 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, 02 एस. एल. आर असे 21 डब्बे असणार असून ह्या विशेष गाड

MB NEWS-थंडीचा जोर वाढला:तुरीच्या फुलोऱ्याला आला बहर

इमेज
  थंडीचा जोर वाढला:तुरीच्या फुलोऱ्याला आला बहर ! खरीपात शेतकऱ्यांना बसला फटका पण रब्बी हंगामात अच्छे दिन येण्याची चिन्हं प रळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे सध्या फुलोऱ्यात असलेली तूर चांगलीच बहरणार आहे.   शेतकरी चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाची झळ सोसत आहेत. पण, यंदा रब्बी पिकांना निसर्गाने साथ दिली आहे. चांगला पाऊस झाल्याने तुरीची वाढ झपाट्याने होत आहे. सध्या तुरीचे पीक फुलोऱ्यात आहे.गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरणाने तुरीवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. पण, शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करून कीडनाशक फवारणी करून किडीचा बंदोबस्त केला आहे.सध्या थंडीने जोर धरला असून त्यामुळे तुरीची वाढ चांगली होऊन फुलधारणा चांगल्या प्रकारे होत आहे.. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक गेले पण रब्बी हंगामांत शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्याची चिन्हं आहेत .

MB NEWS- 🏵️ Photo of the day: समरांगणीचा शिवसुर्य उगवला....!

इमेज
 🏵️ Photo of the day:  समरांगणीचा शिवसुर्य उगवला....!         'शिवरायाचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप" असे वर्णन असलेल्या या शिवसुर्याचे क्षणाक्षणाला स्मरण करणे हे सदैव प्रेरणादायीच. शिवरायांच्या तेजाला साक्षात सुर्याच्या तेजाचीच उपमा समर्पक ठरते. छायाचित्र: सुनील फुलारी, परळी वैजनाथ.                    शिवरायांच्या या ओजस्वी, तेजस्वी रुपाचे अनेकांनी अनेक प्रकारे वर्णन केलेलेच आहे.एका कविने या शिवसुर्याचे यथार्थ वर्णन आपल्या काव्य प्रतिभेतून केलेले आहे." सह्याद्रीच्या डोंगरावर, समरांगणीचा शिवसुर्य उगवला,अन्यायाच्या काळोखाला भेदित, तो जाणता राजा जाहला " या काव्यपंक्ती यथार्थ ठरवणारे छायाचित्र टिपले आहे परळीतील हरहुन्नरी प्रेस फोटोग्राफर सुनील फुलारी यांनी.          प्रेस फोटोग्राफर सुनील फुलारी हे नेहमीच अतिशय सृजनशील छायाचित्रण करत असतात. आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक गहण कलाकृती छायाचित्राच्या रूपातून देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. मग परळी शहरातील विविध उपक्रम असो की उत्सव, पालखी सोहळा असो कि निसर्ग सौंदर्य या सर्वच ठिकाणी ते एक अर्थपूर्ण व कलात्

MB NEWS-न्यू हायस्कुल १० वी सन २००० बॅच चे स्नेहमिलन उत्साहात

इमेज
  हरवलेले हे दिवस येतील पुन्हा, जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना...अशी अनुभुती  न्यू हायस्कुल १० वी सन २००० बॅच चे स्नेहमिलन उत्साहात            हरवलेले हे दिवस येतील पुन्हा, जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना,    नशिबानेच एकदा पुन्हा कुठेतरी भेटू ,आठवणीला एकदा एकत्र मिळुन वेचु.         पक्तींची आठवण करून देणारे सोनेरी क्षण रविवार ३० ऑक्टोबर २०२२ रोजी येथे थर्मल कॉलनी मधील न्यू हायस्कुल शाळेमध्ये माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी अनुभवला; १९९९ ते २००० सालच्या बॅचच्या मुला-मुलींनी एकत्र येत रविवारी शाळेत स्नेहमिलन सोहळयाचे आयोजन केले होते. गावातील विद्यार्थी तसेच अनेक विद्यार्थी बाहेर गावाकडुन आपल्या शाळेसाठी, गुरूजनांसाठी मित्र-मैत्रिणीसाठी एकत्र आलेले होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजनाने केली. त्यानंतर शाळेची घंटा वाजवुन सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हटले. त्यानंतर प्रार्थना घेतली व सर्व शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यानंतर जमलेल्या सर्व मित्र-मैत्रिणीचे

MB NEWS-परळीच्या परचुंडीनंतर आता भूगर्भातील गुढ आवाजाने बीड,पाटोदा हादरले !

इमेज
  परळीच्या परचुंडीनंतर आता भूगर्भातील गुढ आवाजाने बीड,पाटोदा हादरले ! बीड — काही दिवसांपूर्वीच परळी तालुक्यातील परचुंडी या गावात भूगर्भातून येणाऱ्या गुढ आवाजाने नागरिक भयभीत झाली असून याचा अधिक तपास व्हायच्या अगोदरच बीड शहर व परिसर त्याचप्रमाणे पाटोद्यातील काही भाग अशाच गुढ आवाजाने हादरल्याचे नागरिक सांगत आहेत. मोठा आवाज भूगर्भातून येताच काही क्षण जमीन हादरल्याचा भास निर्माण झाला. ही घटना आज दुपारी 12: 43 च्या दरम्यान घडली. हा आवाज जवळपास पूर्ण बीड तालुक्यात जाणवला. त्याचप्रमाणे पाटोदा येथेही अशाच प्रकारचा जमिनीतून गुढ आवाज आल्याचे नागरिक सांगत आहेत        आज दुपारी 12: 43 च्या दरम्यान भूगर्भातून प्रचंड मोठा आवाज झाल्याने जमीन हादरली.सोबतच कच्च्या घरातील रॅक वरील भांडी देखील पडली असल्याचं सांगितलं जाऊ लागला आहे. हा आवाज इतका मोठा होता की जवळपास पाच ते सात मिनिटं आकाशातून विमान उडताना जसा आवाज होतो त्याच पद्धतीने आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. नेमका हा आवाज कुठून व कसा आला याची अधिकृत माहिती प्रशासनाने अद्याप दिली नाही. ●●●●●●●●● संबंधित बातम्या:खा

MB NEWS-जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची बीड येथे विटंबना

इमेज
 जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची बीड येथे विटंबना पुतळा विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा : वीरशैव समा परळीच्या वतीने उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परळी वैजनाथ /प्रतिनिधी  बीड येथे जगद्ज्योती थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराजांच्या  पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी वीरशैव समाज व बस्वप्रेमी परळीच्या वतीने  उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांना निवेदन देण्यात आले. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी परळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड शहरात सोमवार दि. ३१ ऑक्टोंबर २०२२ रोजी  महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील ग्रील व कोनशिलेची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करुन नासधूस केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील वीरशैव समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे. यापुर्वीही येथे असे प्रकार घडलेले आहेत यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार होत आहेत. थोर समाजसुधारक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यां

MB NEWS-एकता दौडला बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
  बीडमध्ये नवीन भव्य क्रीडा संकुल उभारणार - पालकमंत्री अतुल सावे एकता दौडला बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बी ड, दि. 31 (जि. मा. का) : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच केंद्र शासकीय योजनेतून बीडमध्ये नवीन भव्य असे क्रीडा संकुल निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.             देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दौड (रन फॉर युनिटी) रॅलीच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते रॅलीस हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून सुरू होऊन एकता दौड नगर रोड - शिवाजी चौक - जालना रोड या मार्गाने जाऊन जिल्हा क्रीडा संकुल येथे तिची सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, रा

MB NEWS-जिल्हा नियोजन समितीचे बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

इमेज
  जिल्हा वार्षिक योजनेसाठीचे प्रस्ताव सात दिवसात सादर करावे - पालकमंत्री अतुल सावे जिल्हा नियोजन समितीचे बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न बी ड, दि. 31 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेसाठीचे प्रस्ताव सात दिवसात सादर करावेत, जिल्ह्यातील आमदार, खासदार लोकप्रतिनिधींच्या जिल्ह्याच्या विकास कामांसाठी प्राप्त प्रस्तावांवर पुढील मान्यतेसाठी 15 दिवसात कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.                जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहामध्ये आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीला खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार रजनीताई पाटील, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार श्रीमती नमिता मुंदडा, आमदार संदीप क्षीरसागर,  जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, ज

MB NEWS-प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉरसाठी प्रशासन सकारात्मक*

इमेज
  प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉरसाठी प्रशासन सकारात्मक उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांचा कृती समितीच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद परळी वैजनाथ (प्रतिनिधी) उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर विकास कृती समितीसोबत सोमवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी ठीक बारा वाजता एक अनौपचारिक बैठक आयोजित केली होती. बैठकीत श्रीमती चाटे यांनी कृती समितीच्या परळी वैजनाथ व पंचक्रोशीत प्रभू वैद्यनाथ विकास कॉरिडॉर तयार करून वैद्यनाथ मंदिर तथा संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी केलेल्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद दिला.  देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या आपल्या येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर व परिसराचा राज्य व केंद्र सरकारने "प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर" करावा अशी येथील सर्वसामान्य भाविक व सजग नागरिकांची माफक अपेक्षा आहे. "आस्था जगाची, अस्मिता परळीची" ह्या संकल्पनेला अनुसरून कृती समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सध्या सर्वत्र काशी विश्वनाथ, उज्जैन या कॉरिडॉरची चर्चा सर्वत्र आहे. त्याच धर्तीवर परळी वैजनाथ शहरांत जर प्रकल्प राबविला गेला तर सर्वसामान्य

MB NEWS-महाविकास आघाडीच्या काळात रखडला होता आराखडा ; आता पुन्हा राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार

इमेज
  पंकजाताई मुंडेंनी मंजूर केलेल्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटीच्या आराखडयास गती मिळणार ! महाविकास आघाडीच्या काळात रखडला होता आराखडा ; आता पुन्हा राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार परळी वैजनाथ । दिनांक ३१। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्री असताना मंजूर करून आणलेल्या १३३ कोटीच्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयास पुन्हा गती मिळणार आहे. हा विकास आराखडा जशाचा तशा राबविण्यासाठी पंकजाताई मुंडे यांचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून लवकरच राज्य सरकारकडून यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.   पंकजाताई मुंडे बीडच्या पालकमंत्री असताना  सुधीर मुनगंटीवार राज्याचे अर्थमंत्री होते. पंकजाताई मुंडे यांनी वैद्यनाथ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा ध्यास घेतला होता, त्यांनी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करून वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी १३३ कोटी ५८ लक्ष रुपयाचा विकास आराखडा मंजूर करून घेतला होता.  या आराखड्यातील कामांसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी देखील पुरवणी मागणीव्दारे उपलब्ध झाला होता. या कामाचा शुभारंभ २९ ऑगस्ट २०१९ रोजी मुनगंटीवा

MB NEWS-शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

इमेज
शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार रुग्णालयात दाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार  ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव शरद पवार रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांनीच शरद पवारांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पुढील तीन दिवस त्यांच्यावर उपचार होणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही माहिती दिली आहे. पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. २ नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. ----------------- हे देखील पहा: ● *पहा:- छत्रपती शिवाजी महाराज चौकात डौलाने फडकला भगवा.| एक क्षणचित्र : एक छबी- भगव्या ध्वजांकित 'शिवसुर्याची'.*

MB NEWS-बहिणीच्या लग्नाचे कर्ज फेडू तरी कसे ?:२० वर्षीय भावाने घेतला गळफास !

इमेज
  बहिणीच्या लग्नाचे कर्ज फेडू तरी कसे ?:२० वर्षीय भावाने घेतला गळफास ! केज :- बहिणीच्या लग्नाचे कर्ज फेडावे कसे ? कारण मागील तीन वर्ष सतत नापिकिपीमुळे चिंताग्रस्त असलेल्या वीस वर्षीय भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या बाबतची माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील देवगाव ता. केज येथे रविवार दि. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी २:०० वा च्या सुमारास दीपक बालासाहेब मुंडे याने घरातील पत्र्याच्या अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक मुंडे याच्या बहिणीच्या लग्नात झालेले कर्ज आणि वडिलांच्या नावे असलेले बँकेचे कर्ज हे सततच्या नापिकीपी मुळे फेडता येत नसल्याच्या विवंचनेतून दीपक मुंडे याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. पांडुरंग रामा मुंडे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू  क्र. ६/२०२२ फौजदारी गुन्हे प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी सहाय्य पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरघाट दूरस्थ पोलिस चौकीचे पोलिस हेडकॉन्स्टेबल अभिमान भालेराव हे तपास करीत आहेत.

MB NEWS-दरीत उडी मारून युवकाची आत्महत्या

इमेज
  दरीत उडी मारून युवकाची आत्महत्या अंबाजोगाई - येथील मुकुंदराज परिसरात वनविभागाने तयार केलेल्या व्ह्यू पॉईंटवरून खोल दरीत उडी मारून २० वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सोमवारी (दि.३१) सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास घडली. दिनेश नरेश लोमटे (रा. कोष्टी गल्ली, अंबाजोगाई) असे त्या मयत युवकाचे नाव आहे.

MB NEWS-सुमित्रा महाजन महाराष्ट्राच्या राज्यपाल झाल्याचे वृत्त तथ्यहीन

इमेज
सुमित्रा महाजन महाराष्ट्राच्या राज्यपाल झाल्याचे वृत्त तथ्यहीन पुणे : लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली, ही अफवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजभवनमधील सूत्रांनी अशी बदली झाल्याचे नाकारले आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी हेच अद्याप आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.        महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांना नारळ देऊन त्यांच्या पदावर महाजन यांची नियुक्ती झाल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक जणांनी महाजन यांच्या छायाचित्राचा वापर करून फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आदींवर पोस्ट केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजभवनमधील सूत्रांशी संपर्क साधल्यावर, असा कोणताही बदल झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोश्यारी यांनी 5 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. राज्यपाल पदाची त्यांची कारकीर्द गाजत आहे. महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या बारा नावांची आमदार पदी त्यांनी नियुक्ती केली नव्हती.     तसेच महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना त्यांची राज्य सरकारबरोबर अनेक वेळा चकमक उडाली होत

MB NEWS -शाळेतील मैत्रबंध: भेट अनेक वर्षांनंतर !

इमेज
  शाळेतील मैत्रबंध: भेट अनेक वर्षांनंतर ! शाळेत स्नेहमिलन........ परळी वैजनाथ.......       बालपण देगा देवा, या संतोक्तीची आठवण करून देणारा क्षण रविवार, ३० ऑक्टोबर रोजी येथे नांदूरवेस भागातील नूतन केंद्रीय प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अनुभवला. १९८४ ते १९८९ सालच्या बॅचच्या मुला मुलींनी एकत्र येत रविवारी शाळेत स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन केले होते.  पुणे, नगर, जामखेड,  बीड  औरंगाबाद, लातूर, परभणी, सांगली,  अंबाजोगाई आदी ठिकाणांहून मित्र आणि मैत्रिणी एकत्र आलेल्या होत्या. बालपणीतल्या शालेय आठवणीत सारे रमून गेले होते. बालपणी अल्लडपणातील खोड्या, टिंगल टवाळीसह, खेळण्या-बागडण्यातील इतर अनेक आठवणी मुला-मुलींनी यावेळी जागवल्या. शाळेतील खोडकरपणामुळे कोणी एखाद्या मोठ्या पदावर, उच्च पदस्थ अधिकारी होईल याची कल्पनाही केलेली नव्हती अशी मुले-मुली आज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशोशिखरावर आहेत. आज अनेक जण वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर, औषध निर्माण कंपन्या, यशस्वी उद्योजक, वकील, शिक्षक, पत्रकार, इंजिनिअर म्हणून नावारूपाला आले आहेत.  दरम्यान  प्रा  विद्या  स्वामी  प्रा स्वाती   सरडे ख

MB NEWS-शाळेतील "एका उनाड" दिवसाची अनुभूती...तब्बल ३२ वर्षांनंतर !

इमेज
  शाळेतील "एका उनाड" दिवसाची अनुभूती...तब्बल ३२ वर्षांनंतर !   प रळी,प्रतिनिधी...       सकाळी ७.५५ ची वेळ. एक लांबलचक घुमलेला शिट्टीचा आवाज. प्रार्थनेची वेळ स्मरणात आणून देण्यासाठी.. सावधान, विश्राम, सावधान.. आणि शुरू करेंगे, शुरू कर असे आदेश मिळताच एका स्वरात "जन गण मन अधिनायक जय हे.." असे राष्ट्रगीताचे मंजूळ स्वर बाहेर पडले...मोठा भावाशयगर्भ आणि अर्थपूर्ण आर्ततासोबत घेऊन...! प्रार्थना संपताच एकच कल्ला सुरू झाला आणि शाळेतून एक प्रभातफेरी बाहेर पडली... हे १०-१२ वर्षांच्या मुलांच्या शालेय जीवनातील चित्र नव्हे तर जवळपास तीन तपांच्या आसपासचे म्हणजे तब्बल ३२ ते ३५ वर्षांनंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींचे होते. निमित्त होते बालपणच्या उनाड दिवसातील अनुभूती जागवण्यासाठी शाळा भरवून आयोजित केलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमाचे ! येथील वैद्यनाथ विद्यालयाच्या १९८९ सालच्या वर्ग अ मधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत ३० ऑक्टोबर रोजी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेले आज काही विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांच्या सांसारिक आयुष्यात आजोबा झालेले आहेत, काही त्यासमीप आ

MB NEWS -पालकमंत्री अतुल सावे यांचा बीड जिल्हा दौरा

इमेज
  पालकमंत्री अतुल सावे यांचा बीड जिल्हा दौरा            बीड, दि.30 (जि.मा.का.):-  राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.             सोमवार दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने बीडकडे प्रयाण व  सकाळी 7:30 वाजता राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित बीड येथील एकता दौड कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 3:30 वाजता संतभूमी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.बीड शुभारंभास उपस्थिती. दुपारी 4:30 वाजता भा.ज.पा. पदाधिकारी बैठक, दुपारी 5 वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.                       -*-*-*-*-

MB NEWS-शेकडो सूचना, विकासासाठी जनतेने केला निर्धार

इमेज
  ज्योतिर्लिंग वैद्यनाथ कॉरिडॉर: 'आस्था जगाची, अस्मिता परळीची' संकल्पनेसाठी परळीकर एकत्र   सजग नागरिकांनी दिल्या शेकडो सूचना, विकासासाठी जनतेने केला निर्धार परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 'आस्था जगाची, अस्मिता परळीची' संकल्पना घेऊन शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राष्ट्रमाता जिजामाता उद्यानात ही बैठक रविवार दि. ३० ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या बैठकीला भाविक भक्त तथा सजग नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात वैद्यनाथ कॉरिडॉरच्या माध्यमातून परळी वैजनाथ परिसराचा कसा विकास साधता येईल याबाबत शेकडो सूचनांचा वर्षाव झाला. सर्वधर्मीय नागरिकांची उपस्थिती हे मोठे वैशिष्ट्य ठरले. त्याची सकारात्मक परिणीती अशी झाली की परळी वैजनाथच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी सोमवार दि. ३१ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता त्यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. नागरिकांच्या बैठकीत काशी विश्वनाथ, उज्जैन यांच्या धर्तीवर जर परळी वैजनाथ येथे वैद्यनाथ कॉरिडॉर झाला तर येथील व्यापार, हॉटेलिंग, लॉजिंग आदींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते हा विचार प्रामुख्याने समोर आला. वै

MB NEWS- कु.मंजुश्री घोणेच्या कार्यकर्त्तृत्वाचा गौरव करणारा आ.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्यालेखणीतून विशेष लेख:परळीच्या मातीतील अस्सल टॅलेंट

इमेज
    परळीच्या मातीतील अस्सल टॅलेंट.......   ✍️प्रशांत जोशी (स्वीय सहायक, आ.धनंजय मुंडे) ---------------------------------------------- मा झ्यासोबत या फोटोमध्ये जी मुलगी दिसते ती कोणी सामान्य मुलगी नाही, तर ती मुलगी आहे राजस्थान मध्ये एक दिवस मुख्यमंत्री म्हणून काम केलेली केवळ 21 वर्षाची आमच्या परळीची कन्या मंजुश्री घोणे....  होय हे खरे आहे. मी नायक चित्रपटाची स्टोरी सांगत नाही, तर प्रत्यक्ष या मुलीला भेटून एक सामान्य मुलगी ते राजस्थानची एक दिवसाची मुख्यमंत्री, जिने एका दिवसात राजस्थानमध्ये च्या सरकारमध्ये दोन मोठे निर्णय घेतले आणि त्या दोन्ही निर्णयाची राजस्थान सरकारने अंमलबजावणी केली. इतकंच नाही तर भविष्यात ते पाहून अनेक राज्यांनी त्या निर्णयाची कॉपी केली ती हीच एक दिवसाची मुख्यमंत्री म्हणजे मंजुश्री घोणे! परळीत सुरेश घोणे नावाचा माझा एक जुना मित्र.... कामाच्या व्यापात कधी त्याची भेटही व्हायची नाही किंवा कधी बोलणेही व्हायचे नाही, रस्त्यात कधी भेट झाली तर नमस्कार व्हायचा इतकेच काय ते.  एका सोनाराच्या दुकानावर कारागीर म्हणून काम करता करता एसटी महामंडळात वाहक म्हणून नोकरी करत करत अतिशय सा

MB NEWS-इंजि.भगवान साकसमुद्रे यांना पितृशोक

इमेज
  इंजि.भगवान  साकसमुद्रे यांना पितृशोक परळी (प्रतिनिधी) फुले -शाहू - चळवळीतील कार्यकर्ते तथा पत्रकार भगवान  साकसमुद्रे यांचे वडील आयु.कचरुबा सिताराम साकसमुद्रे यांचे ब्रेनहॅमरेज झाल्यामुळे त्यांना माऊली हॉस्पिटल येथे  व नंतर समर्थ हॉस्पिटल परळी येथे दाखल केले होते.शनिवार रात्री साडेनऊ वाजता  त्यांचे वयाच्या  75 व्या वर्षी दु:खद निधन झाले. ते परळी  औष्णिक विद्युत केंद्राचे सेवानिवृत्त कर्मचारी होते . त्यांचा अंत्यविधी रविवार दिनांक 30/10/2022 रोजी दु. 12वाजता शांतीवन स्मशानभूमी, भीमनगर परळी येथे होईल .  त्यांचा  पत्नी, मुले, मुली ,जावई, सून, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. साकसमुद्रे कुटुंबीयांवर कोसळलेल्या दु:खात एमबी न्युज परिवार सहभागी आहे

MB NEWS-_रविवारी व्यापक बैठकीचे आयोजन_

इमेज
  प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर साठी नागरिक उभारणार लढा रविवारी व्यापक बैठकीचे आयोजन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी)दि.29 - देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत कॉरिडॉर व्हावे यासाठी आता नागरिक व्यापक लढा उभारणार आहेत.सध्या देशभरात वेगवेगळे धार्मिक कॉरिडॉर विकसित होत आहेत.सध्या महाराष्ट्रात मुंबई येथील मुंबादेवी मंदिर व पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा समावेश आहे.याच प्रकारे प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे म्हणून परळीतील नागरिकांनी रविवारी सर्वसमावेशक व्यापक बैठकीचे आयोजन केले आहे.  शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राष्ट्रमाता जिजामाता उद्यानात ही बैठक रविवार दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा आयोजित करण्यात आली आहे.कॉरिडॉर मध्ये मंदिरांचे “संरक्षण आणि जतन” करण्यासाठी करत आधुनिक तंत्रज्ञानाची प्राचीन श्रद्धेशी जोडण्यासाठी काम केले जाते.यामुळे परिसरातील जनतेच्या नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मोठी मदत होते काशी विश्वनाथ, उज्जैन असे मोठे उदाहरण आहेत.या संपूर्ण प्रक्रियेत तेथील स्थानिकांना प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.आता यासाठी परळी वैद्यनाथ शहर व