MB NEWS-_रविवारी व्यापक बैठकीचे आयोजन_

 प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर साठी नागरिक उभारणार लढा





रविवारी व्यापक बैठकीचे आयोजन

परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी)दि.29 - देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत कॉरिडॉर व्हावे यासाठी आता नागरिक व्यापक लढा उभारणार आहेत.सध्या देशभरात वेगवेगळे धार्मिक कॉरिडॉर विकसित होत आहेत.सध्या महाराष्ट्रात मुंबई येथील मुंबादेवी मंदिर व पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा समावेश आहे.याच प्रकारे प्रभू वैद्यनाथ कॉरिडॉर व्हावे म्हणून परळीतील नागरिकांनी रविवारी सर्वसमावेशक व्यापक बैठकीचे आयोजन केले आहे. 


शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या

राष्ट्रमाता जिजामाता उद्यानात ही बैठक रविवार दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा आयोजित करण्यात आली आहे.कॉरिडॉर मध्ये मंदिरांचे “संरक्षण आणि जतन” करण्यासाठी करत आधुनिक तंत्रज्ञानाची प्राचीन श्रद्धेशी जोडण्यासाठी काम केले जाते.यामुळे परिसरातील जनतेच्या नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी मोठी मदत होते काशी विश्वनाथ, उज्जैन असे मोठे उदाहरण आहेत.या संपूर्ण प्रक्रियेत तेथील स्थानिकांना प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.आता यासाठी परळी वैद्यनाथ शहर व परिसरातील नागरिक आता एकत्र येऊन शासन दरबारी आपली मागणी कायदेशीर पद्धतीने मांडणार आहेत.यासाठी सर्व नागरिकांनी या बैठकीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !