MB NEWS-कार्तिकीवारी:परळी मार्गे पंढरीला दोन विशेष रेल्वे पण रिझर्व्हेशन आवश्यक
कार्तिकीवारी:परळी मार्गे पंढरीला दोन विशेष रेल्वे पण रिझर्व्हेशन आवश्यक
कार्तिक एकादशी यात्रे निमित्त आदिलाबाद आणि नांदेड येथून पंढरपूर करिता पूर्णपणे आरक्षित विशेष गाड्या दक्षिण मध्य रेल्वेने सुरू केली आहे. कार्तिक एकादशी उत्सव दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता मराठवाड्यातून मोठ्या संख्येने यात्रेकरू प्रवास करतात. प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रेल्वेने आदिलाबाद आणि नांदेड येथून पंढरपूर साठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहे.
गाडी क्र 07502 ही आदिलाबाद ते पंढरपूर गुरुवार दि 3 नोव्हेंबर रोजी धावणार आहे.आदिलाबाद येथीन ही गाडी दुपारी 2 ला सुटणार असून परळी येथे ही विशेष गाडीची वेळ सायंकाळी 10:20 असणार आहे.दुसरी विशेष रेल्वे गाडी क्र 07503 नांदेड ते पंढरपूर ही सोमवार दि 7 रोजी धावणार असून या गाडीची परळी येथे येण्याची वेळ सायंकाळी 10:50 असणार आहे.परतीचा प्रवास पंढरपूर-आदिलाबाद ही 4 नोव्हेंबर तर पंढरपूर-नांदेड ही 8 नोव्हेंबर रोजी करणार आहे.
या गाडीस 10 सकैंड सीटिंग ( 2s), 08 स्लीपर क्लास, 01 द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, 02 एस. एल. आर असे 21 डब्बे असणार असून ह्या विशेष गाडीस प्रवासाचे आरक्षण करणे आवश्यक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा