इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- 🏵️ Photo of the day: समरांगणीचा शिवसुर्य उगवला....!

 🏵️ Photo of the day:  समरांगणीचा शिवसुर्य उगवला....!



        'शिवरायाचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप" असे वर्णन असलेल्या या शिवसुर्याचे क्षणाक्षणाला स्मरण करणे हे सदैव प्रेरणादायीच. शिवरायांच्या तेजाला साक्षात सुर्याच्या तेजाचीच उपमा समर्पक ठरते.


छायाचित्र: सुनील फुलारी, परळी वैजनाथ.


        










 

        शिवरायांच्या या ओजस्वी, तेजस्वी रुपाचे अनेकांनी अनेक प्रकारे वर्णन केलेलेच आहे.एका कविने या शिवसुर्याचे यथार्थ वर्णन आपल्या काव्य प्रतिभेतून केलेले आहे." सह्याद्रीच्या डोंगरावर, समरांगणीचा शिवसुर्य उगवला,अन्यायाच्या काळोखाला भेदित, तो जाणता राजा जाहला " या काव्यपंक्ती यथार्थ ठरवणारे छायाचित्र टिपले आहे परळीतील हरहुन्नरी प्रेस फोटोग्राफर सुनील फुलारी यांनी.

         प्रेस फोटोग्राफर सुनील फुलारी हे नेहमीच अतिशय सृजनशील छायाचित्रण करत असतात. आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक गहण कलाकृती छायाचित्राच्या रूपातून देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. मग परळी शहरातील विविध उपक्रम असो की उत्सव, पालखी सोहळा असो कि निसर्ग सौंदर्य या सर्वच ठिकाणी ते एक अर्थपूर्ण व कलात्मक वेगळी छबी टिपण्याची धडपड करताना दिसतात. 

     परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे. या ठिकाणी काल दिनांक 31 रोजी उंच भगवा ध्वज फडकवण्यात आला. याचे अर्थपूर्ण मनमोहक छायाचित्र त्यांनी टिपले होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांची कलात्मकता जोपासत त्यांनी याच ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पाठीशी तळपणारा तेजस्वी सूर्य अशा प्रकारचे क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. खरोखरच या शिवसुर्याची अनेक विविध रूपे क्षणाक्षणाला जरी टिपली तरी त्याची महतीही क्षणाक्षणाला वाढतच जाते. एकंदरीतच आज दिवसभराच्या छायाचित्रातील फोटो ऑफ दि डे म्हणून निश्चित हे छायाचित्र वाटते.

छायाचित्र: सुनील फुलारी, परळी वैजनाथ.



        










 



         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!