MB NEWS-परळीच्या परचुंडीनंतर आता भूगर्भातील गुढ आवाजाने बीड,पाटोदा हादरले !

 परळीच्या परचुंडीनंतर आता भूगर्भातील गुढ आवाजाने बीड,पाटोदा हादरले !



बीड — काही दिवसांपूर्वीच परळी तालुक्यातील परचुंडी या गावात भूगर्भातून येणाऱ्या गुढ आवाजाने नागरिक भयभीत झाली असून याचा अधिक तपास व्हायच्या अगोदरच बीड शहर व परिसर त्याचप्रमाणे पाटोद्यातील काही भाग अशाच गुढ आवाजाने हादरल्याचे नागरिक सांगत आहेत. मोठा आवाज भूगर्भातून येताच काही क्षण जमीन हादरल्याचा भास निर्माण झाला. ही घटना आज दुपारी 12: 43 च्या दरम्यान घडली. हा आवाज जवळपास पूर्ण बीड तालुक्यात जाणवला. त्याचप्रमाणे पाटोदा येथेही अशाच प्रकारचा जमिनीतून गुढ आवाज आल्याचे नागरिक सांगत आहेत


       आज दुपारी 12: 43 च्या दरम्यान भूगर्भातून प्रचंड मोठा आवाज झाल्याने जमीन हादरली.सोबतच कच्च्या घरातील रॅक वरील भांडी देखील पडली असल्याचं सांगितलं जाऊ लागला आहे. हा आवाज इतका मोठा होता की जवळपास पाच ते सात मिनिटं आकाशातून विमान उडताना जसा आवाज होतो त्याच पद्धतीने आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. नेमका हा आवाज कुठून व कसा आला याची अधिकृत माहिती प्रशासनाने अद्याप दिली नाही.
●●●●●●●●●

संबंधित बातम्या:खालील ओळींवर क्लिक करा..........👇👇👇👇



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !