MB NEWS-कार्तिकीवारी: परळी आगारातून मागणीनुसार विशेष यात्रा बस

 कार्तिकीवारी: परळी आगारातून मागणीनुसार विशेष यात्रा बस


कार्तिक एकादशी यात्रे निमित्त परळी आगारामार्फत नियमितपणे 3 विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. कार्तिक एकादशी उत्सव दरम्यान श्री विठ्ठला च्या दर्शना करिता मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परळी आगाराने परळी येथून पंढरपूर साठी विशेष बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.

      हसकाळ,दुपार व संध्याकाळ या समयी परळी आगारामार्फत या विशेष बस सोडण्यात येणार असून ग्रामीण भागातून देखील प्रवाशी संख्या जास्त असल्यास थेट पंढरपूर दर्शन घडवून त्यांना परत गावी सोडण्यासाठी देखील मागणीनुसार एस.टी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
कार्तिकीवारी निमित्ताने परळी आगारामार्फत दररोज 3 विशेष यात्रा बस सेवा सुरू करण्यात येणार असून ग्रामीण भागात देखील प्रवाशी संख्या जास्त असल्यास मागणीनुसार गावात एस.टी बस देऊन पंढरपूर दर्शन घडवून त्यांना परत गावी सोडण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील भाविकांची याबाबत परळी आगाराशी संपर्क करावा
★ प्रवीण भोंडवे ★
आगार प्रमुख
परळी वै

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार