MB NEWS-न्यू हायस्कुल १० वी सन २००० बॅच चे स्नेहमिलन उत्साहात
हरवलेले हे दिवस येतील पुन्हा, जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना...अशी अनुभुती
न्यू हायस्कुल १० वी सन २००० बॅच चे स्नेहमिलन उत्साहात
हरवलेले हे दिवस येतील पुन्हा, जगलो आज आणि उद्या हाच दिवस जुना,
नशिबानेच एकदा पुन्हा कुठेतरी भेटू ,आठवणीला एकदा एकत्र मिळुन वेचु.
पक्तींची आठवण करून देणारे सोनेरी क्षण रविवार ३० ऑक्टोबर २०२२ रोजी येथे थर्मल कॉलनी मधील न्यू हायस्कुल शाळेमध्ये माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी अनुभवला; १९९९ ते २००० सालच्या बॅचच्या मुला-मुलींनी एकत्र येत रविवारी शाळेत स्नेहमिलन सोहळयाचे आयोजन केले होते.
गावातील विद्यार्थी तसेच अनेक विद्यार्थी बाहेर गावाकडुन आपल्या शाळेसाठी, गुरूजनांसाठी मित्र-मैत्रिणीसाठी एकत्र आलेले होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन व प्रतिमा पुजनाने केली. त्यानंतर शाळेची घंटा वाजवुन सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत म्हटले. त्यानंतर प्रार्थना घेतली व सर्व शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. यानंतर जमलेल्या सर्व मित्र-मैत्रिणीचे पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवुन शिक्षकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर सेवक मामाचे ही स्मृतीचिन्ह व शॉल देवुन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणुन श्री. अमर देशमुख सर होते.प्रमुख उपस्थितीमध्ये न्यु हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक श्री.निळकंठ शेंडगे सर' मधुकर चव्हाण सर, रमेश वायसे सर, रघुवीर भोसले सर, संजय सुरवसे सर, डि.जी.शिंदे सर,एस.आर. देशमुख सर, डी. एन. देशमुख सर, राठोड सर, छाया देशमुख मॅडम, ओतारी मॅडम, हिरेमठ मॅडम व इतर शिक्षकगण उपस्थित होते.आम्ही ज्यांच्या मुळे घडलो ते आमचे सर्व शिक्षक यांचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेण्याचा योग प्राप्त झाला.
बालपणीतल्या शालेय आठवणीत सारे रमुन गेले होते. बालपणी अल्लडपणातील खोड्या, टिंगल
टवाळीसह खेळण्या-बागडण्यातील इतर अनेक आठवणी मुला-मुलींनी यावेळी जागवल्या. शाळेतील खोडकरपणामुळे कोणी एखाद्या मोठया पदावर, उच्च पदस्थ अधिकारी होईल याची कल्पनाही केलेली नव्हती. अशी मुले-मुली आज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशोशिखरावर आहेत. आज अनेक जण वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर, औषध निर्माण कंपन्या, यशस्वी उद्योजक, वकील, शिक्षक, इंजिनिअर, दुकानदार आदि क्षेत्रात नावारूपाला आले आहेत. दरम्यान अर्चना शिरसाठ, स्नेहल पिवळ, सरपंच नवनाथ मुंडे, प्रकाश पवार, संतोष उगले, रितेश फुके, सुनिता कोडलवाडे, भाग्यश्री चौभांरकर, आदिनी बालपणा वर आठवणीचा उजाळा दिला.
तसेच शिक्षकांनीही आठवणी व पुढील भविष्यात निरोगी रहा. चांगले रहा, एकमेकांना मदत करा, शाळेत येत जा असे सांगितले. बालपणीचे मित्र हेच खरे मित्र असतात त्यांना जपा. असे सांगितले. समारोपात श्री अमर देशमुख सरांनी दररोज व्यायाम करणे, वाईट व्यसनापासुन दर राहणे, एकमेकांच्या सुखा दुखात सहभागी व्हा असे सांगितले.
सुत्रसंचालन श्री. कुलदिप संभाजी मुंडे व माया मोतीराम बावीस्कर व आभार प्रदर्शन धनंजय चंद्रकांत जब्दे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी परळी नियोजन समितीतील विद्यार्थी बाळासाहेब गर्जे, अमोल भोसले, अविनाश अवधुत, आनंद गायकवाड, विकास मुंडे, नितीन काळे, राजेंद्र पवार (मॅडी), दत्ता चव्हाण, सचिन घोडके, अमर नागरगोजे, कुलदिप मुंडे, धनंजय जब्दे, माया मोतीराम बावीस्कर, दिपक लटपटे, महेश काळे, सुनिल पाठक, मनोज फड, तुकाराम गित्ते, आदिनी हातभार लावला सहकार्य घेवुन सर्व कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन खुप चांगल्या प्रकारे केले. यापुढे ही परळी नियोजन समितीचे कार्य अविरत चालू राहणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा