MB NEWS-थंडीचा जोर वाढला:तुरीच्या फुलोऱ्याला आला बहर

 थंडीचा जोर वाढला:तुरीच्या फुलोऱ्याला आला बहर !




खरीपात शेतकऱ्यांना बसला फटका पण रब्बी हंगामात अच्छे दिन येण्याची चिन्हं

रळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

         आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे सध्या फुलोऱ्यात असलेली तूर चांगलीच बहरणार आहे.


  शेतकरी चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाची झळ सोसत आहेत. पण, यंदा रब्बी पिकांना निसर्गाने साथ दिली आहे. चांगला पाऊस झाल्याने तुरीची वाढ झपाट्याने होत आहे. सध्या तुरीचे पीक फुलोऱ्यात आहे.गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरणाने तुरीवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. पण, शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करून कीडनाशक फवारणी करून किडीचा बंदोबस्त केला आहे.सध्या थंडीने जोर धरला असून त्यामुळे तुरीची वाढ चांगली होऊन फुलधारणा चांगल्या प्रकारे होत आहे.. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक गेले पण रब्बी हंगामांत शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्याची चिन्हं आहेत .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !