पोस्ट्स

MB NEWS-द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल,लिटिल स्टार इंग्लिश स्कूल व राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल चे आज वार्षिक स्नेहसंमेलन

इमेज
  द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल,लिटिल स्टार इंग्लिश स्कूल व राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल चे आज वार्षिक स्नेहसंमेलन  परळी वैजनाथ, प्रतिनिधी......            परळीच्या शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली शाळा म्हणून परिचित असलेल्या मदर टेरेसा सेवाभावी संस्थेच्या द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल, लिटल स्टार इंग्लिश स्कूल आणि राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल या शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज दि.२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.                      लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी वैद्यनाथ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक राजनाळे सर हे असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, बीड जिल्हा आरटीई प्रमुख गौतम चोपडे, राष्ट्रमाता जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष अनिल जाधव, अंबाजोगाई येथील रविवार पेठ क्लस्टर हेड कमलाकर कापसे, कनेरवाडी क्ल

MB NEWS:संत तुकाराम महाराज नगर वडसावित्री येथे छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी

इमेज
  संत तुकाराम महाराज नगर वडसावित्री येथे छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी शिवजयंती निमित्त संत तुकाराम महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण परळी (प्रतिनिधी)...         शहरातील वडसावित्री भागातील संत तुकाराम महाराज नगर येथे छत्रपती शिवरायांची 393 वी जयंती मोठ्या उत्साहात व समाज उपयोगी उपक्रमांनी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज नगर येथील प्रवेशद्वाराचे  लोकार्पण देखील संत तुकाराम महाराज गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके सर उपाध्यक्ष वैजनाथराव सोळंके सचिव वसंतराव सूर्यवंशी यांच्यासह संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.     छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत संत तुकाराम गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रा. शेळके सर यांनी गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या येथील नागरिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संत तुकाराम महाराज प्रवेशद्वाराचे काम करून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कमानीचे लोकार्पण केले. यावेळी शिवचरित्रावर प्रकाश टाकत आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे विचार अंगीकारत आपली प्रगती साधावी असे प्र

MB NEWS:खा.प्रितम मुंडे यांच्या हस्ते सावता माळी मंदिराचे कलशारोहन

इमेज
खा.प्रितम मुंडे यांच्या हस्ते सावता माळी मंदिराचे कलशारोहन “स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात" या शिकवणीनुसार काम करण्याचा प्रयत्न - खा. डॉ. प्रितम मुंडे  भाविकांसोबत पंगतीत घेतला प्रसादाचा लाभ परळी । दि. २२ । कर्म आणि कर्तव्य करत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे या सावता माळी महाराजांच्या शिकवणीनुसार आम्ही समाजकारण करत आहोत. सावता माळी महाराज यांची  ‘स्व कर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात' ही शिकवण आम्हाला जनतेची कामे करताना ऊर्जा देते, संतांच्या या शिकवणीनुसार आम्ही लोकसेवेचे कार्य करत राहू असे प्रतिपादन खा.प्रितमताई मुंडे यांनी केले. परळी तालुक्यातील लोणी येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिराचा कलशारोहन सोहळा पार पडल्यानंतर भविकांशी संवाद साधताना खा.प्रितमताई बोलत होत्या. लोणी येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिराचे कलशारोहन आणि खंडोबा मंदिर सभागृहाचे भूमिपूजन खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, जेष्ठ नेते दिलीप आबा बिडगर, राजेश गित्ते, नगरसेवक पवन मुंडे, चंद्रकांत देवकते यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्

MB NEWS:बनावट पत्र तयार केले: आ.धनंजय मुंडेंसह तिघांची बदनामी,संस्थेची फसवणुक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद

इमेज
  नाव,सही व शिक्का वापरत बनावट पत्र तयार केले: आ.धनंजय मुंडेंसह तिघांची बदनामी,संस्थेची फसवणुक केल्याप्रकरणी वैद्यनाथ महाविद्यालयातील चार व अनोळखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ,प्रतिनिधी...          माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे बनावट लेटरहेडचे प्रकरण ताजे असतानाच आता परळीतही बनावट सही शिक्के व कागदपत्र तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.विशेष म्हणजे यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह वैद्यनाथ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सदाशिव मुंडे व प्रा प्रभाकर कराड  यांच्या नावाचा उल्लेख आहे. संस्था अध्यक्षांचे नाव, शिक्का व बनावट सही करून तयार करण्यात आलेल्या या पत्राप्रकरणी जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयातील तीन प्राध्यापक, एक कर्मचारी व अन्य तीन अनोळखी अशा सात जणांविरुद्ध संशयीत म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आहे.        याबाबत वैद्यनाथ महाविद्यालय परळी वै येथील सेवानिवृत्त प्राचार्य  सदाशीव सिताराम मुंडे वय 78 वर्षे  रा. नाथनगर यांनी पोलीस ठाण्यात सविस्तर  फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार एक बनावट पत्र तयार करण्यात आले असुन यामध्ये बदनामीकारक खोटा मजकूर

MB NEWS:महाराष्ट्रातील चार खासदारांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड

इमेज
  महाराष्ट्रातील चार खासदारांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड नवी दिल्ली : वृत्तसंस्था : यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांची घोषणा झाली असून विजेत्या १३ खासदारांत महाराष्ट्रातील लोकसभा खासदार भाजपचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे, भाजपच्या हिना गावित, राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया  खान या चार खासदारांचा समावेश आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये १३ खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार टी. के. रंगराजन यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.       केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखालील आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. कृष्णमूर्ती यांच्या सहअध्यक्षतेखालील निवड समितीकडून संसदरत्न विजेत्यांची निवड करण्यात आली. लोकसभेतील आठ खासदार लोकसभा खासदारांमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, भाजपचे विद्युत बरन महतो, भाजपचे डॉ. सुकांत मजुमदार, काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा, भाजप खासदार हिना विजयकुमार गावित, भाजपचे गोपाळ शेट्टी, भाजपचे सुधीर गुप्ता आणि राष्ट्रवादी काँग्र

MB NEWS:शिक्षकांनीच फोडला इंग्रजीचा पेपर:सहा शिक्षकांना अटक

इमेज
  शिक्षकांनीच फोडला इंग्रजीचा पेपर: सहा शिक्षकांना अटक परभणी..... बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांनीच पेपर फोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहा शिक्षकांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्ञानदानाचे काम करण्याची जबाबदारी असणाऱ्या गुरूंनीच हे असले धंदे सुरु केल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला ! संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. परंतु, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणाऱ्या या परीक्षेबाबत परभणीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महालिंगेश्वर विद्यालयात घडला प्रकार.... परीक्षा केंद्र असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनीच इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत असल्याचा प्रकार समोर आला. इंग्रजीचा पेपर अकरा वाजता देण्यात आला. हा पेपर देताच दोन शिक्षकांनी त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपद्वारे इतर शिक्षकांना पाठवला. हे शिक्षक महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका खोलीत बसून त्

MB NEWS:आर्य समाजातील सप्ताहाची सांगता

इमेज
  महर्षी दयानंदांमुळे महाशिवरात्र 'बोधप्रद' ठरली -पं. राजवीर शास्त्री     आर्य समाजातील सप्ताहाची सांगता                  परळी वैजनाथ दि.२१--                                      सत्यज्ञान व आत्मकल्याणासाठी मानवाने सतत जागृत राहणे, हा शिवरात्रीचा खरा संदेश असून यातूनच महर्षी दयानंदांनी  ईश्वराचे सत्यस्वरूप जाणण्याचा बोध घेतला. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवरात्र ही बोधप्रद ठरली, असे प्रतिपादन वैदिक विद्वान पं. श्री राजवीर शास्त्री यांनी केले.                                                  येथील आर्य समाजात महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त आयोजित वैदिक विचार प्रचार सप्ताहाची रविवारी सांगता झाली. यावेळी श्री शास्त्रीजी प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया हे होते, तर याप्रसंगी आचार्य सत्येंद्रजी, सोममुनीजी, विज्ञानमुनीजी हे उपस्थित होते.         आपल्या मार्गदर्शनपर भाषणात  शास्त्रीजी  म्हणाले- स्वामी दयानंदांनी परंपरागत शिवरात्रीला बोधरात्रीत रूपांतरित करून सत्यज्ञान प्रकाशाच्या दृष्टीने

MB NEWS:शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांच्या वाढदिवस; शालेय साहित्य वाटप,उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप

इमेज
  शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांचा वाढदिवस; शालेय साहित्य वाटप,उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप   परळी वै :-                   शिवसेना मुख्य सचिव तथा ठाणे माजी महापौर संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त, विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते, सचिन स्वामी बालासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप  उपक्रम राबविण्यात आले.    शहरातील लावण्य पब्लिक स्कुल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अध्यक्ष अनंत कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलतांना सचिन स्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शिवसेना मुख्य  मुख्य सचिव संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर  मान्यवरांच्या हस्ते लावण्य पब्लिक स्कुल मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.         शहरातील उपजिल्हा रुग्णालयात  शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेषतः अधीक्षक डॉ ढवळे व डॉ यांचा सत्कार आला,व त्यांच्या व ईतर मान्यवरांच्या

MB NEWS:धनंजय मुंडे यांची परळी मतदारसंघात आणखी एक शब्दपूर्ती

इमेज
  धनंजय मुंडे यांची परळी मतदारसंघात आणखी एक शब्दपूर्ती धर्मापुरीच्या किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी नऊ कोटी तर वैजवाडी येथील केदारेश्वर मंदिर विकासासाठी दीड कोटी रुपये निधी मंजूर परळी (दि. 21) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील जनतेला दिलेल्या आणखी एका शब्दपूर्तीकडे यशस्वी पाऊल टाकले असून, धर्मापुरी येथील प्रसिद्ध किल्ल्याच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागाकडून तब्बल नऊ कोटी रुपयांच्या आराखड्यास धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे; त्याचबरोबर परळी तालुक्यातील वैजवाडी येथील केदारेश्वर मंदिराच्या व परिसराच्या विकासासाठी दीड कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. धर्मापुरी येथील किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्याचा शब्द धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत दिला होता. या कामाच्या निमित्ताने तो शब्द आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून लवकरच प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर वैजवाडी येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या केदारेश्वर मंदिराच्या विकास करण्याबाबतचा शब्द देखील धनंजय मुंडे यांनी पूर्ण केला अस

MB NEWS:बीड जिल्हा एका समाजसेवकाला मुकला

इमेज
  पाटोद्याच्या भोंडवे परिवारावर काळाचा घाला ; पंकजाताई मुंडे यांनी केला शोक व्यक्त बीड जिल्हा एका  समाजसेवकाला मुकला बीड ।दिनांक २१। दीनदयाळ शोध संस्थानच्या माध्यमातून समाजसेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते सुदाम काका भोंडवे यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांचा आज झालेल्या एका रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, एका सामाजिक कार्यकर्त्यांचं असं अचानक जाण वेदनादायी आहे, त्यांच्या निधनानं जिल्हा एका समाजसेवकाला मुकला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त केला आहे.    सुदाम काका भोंडवे हे पाटोदा तालुक्यातील डोमरी येथील  दीनदयाळ शोध संस्थानच्या गुरूकुलचे संचालक होते. या माध्यमातून त्यांचे वंचित, पिडित घटकांसाठी मोठे कार्य सुरू होते. मी अनेकदा गुरूकुलला भेट देऊन त्यांचे काम जवळून पाहिले आहे, त्यांच्यासहित त्यांच्या पत्नी सिंधू काकू,नात आनंदी ,व सुनबाई  कार्तिकी यांचे भीषण अपघातात दुःखद निधन व मुलगा आश्विन जखमी आहे. काळानं अशा प्रकारे त्यांच्या परिवारावर घातलेला घाला खूप वेदनादायी आहे, या दुःखात मी सहभागी आहे, ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो अशा शोका

MB NEWS:भीषण अपघातात भोंडवे कुटुंबातील चौघांचा मृत्यू !

इमेज
  भीषण अपघातात भोंडवे कुटुंबातील चौघांचा मृत्यू ! बीड- कंटेनर आणि इंडिका गाडी च्या शिरूर जवळ झालेल्या अपघातात बीड जिल्ह्यातील सोनदरा गुरुकुलम चे सुदाम काका भोंडवे यांचे दुर्दैवी निधन झाले आहे.यांच्यासह पत्नी,सून आणि नात अशा चार जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुदाम शंकर भोंडवे 66 वर्ष, सिंधूबाई सुदाम भोंडवे 60,कार्तिकी अश्विन भोंडवे 30,आनंदी अश्विन भोंडवे 2 वर्ष सर्व मृत्युमुखी पडले आहेत. अश्विन सुदाम भोंडवे गंभीर जखमी झाला आहे. त्याची तब्येत स्थिर आहे. भोंडवे कुटुंबाच्या गाडीला शिरूर घोडनदी जवळ भीषण अपघात झाला,या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला. या घटनेने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. -------------  video news  ---------------- -------------  video news  ---------------- -------------  video news  ---------------- -------------  video news  ---------------- -------------  video news  ----------------

MB NEWS:शास्त्रीनगर भागातील उद्यानाला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव द्या: उद्यान तात्काळ सुरू करा-योगेश पांडकर

इमेज
शास्त्रीनगर भागातील उद्यानाला लोकनेते गोपीनाथ मुंडे  यांचं नाव द्या: उद्यान तात्काळ सुरू करा-योगेश पांडकर परळी प्रतिनिधी.. परळी शहरातील शास्त्री नगर भागातील ओपन स्पेसवर उद्यान व्हावे यासाठी परळी नगर परिषदेला अनेक निवेदने तसेच आंदोलने केल्यानंतर उद्यान करण्यात आले.     शासनाने लाखों  रूपये खर्च करून उद्यान झाले आहे. या उद्यानाचे काम पूर्ण होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण झाले आहे परंतु भागातील सर्व सामान्य नागरिकांसाठी आजही खुले करण्यात आलेले नाही.    या भागातील लहान मुलांना खेळण्यासाठी,महिलांना व जेष्ठ नागरिकांना वॉकिंग,जाॅगींग करण्यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. उद्यान असून वापरासाठी नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे.   परळीतील वाढतं प्रदुषण नियंत्रणात यावं म्हणून शासनाने वसुंधरा योजनेंतर्गत अनेक ग्रीनरी प्रकल्पांना मंजुरी दिली.परंतु अद्याप असे प्रकल्प पुर्ण होऊनही सुरू करत नसल्यामुळे आज निवेदन देण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी उद्यान व्हावे यासाठी संघर्ष आता खुले करावे म्हणून संघर्ष हे शास्त्रीनगर येथील नागरिकांच्या नशीबी आलंय. नगर परिषदेवर अनेक वेळा निवेदने देऊन आंदोलन केले त्यानंतर आमच्या मा

MB NEWS:10 वी, 12 वी परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी

इमेज
  10 वी, 12 वी परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी               बीड, दि. 20 (जि. मा. का.) जिल्ह्यात माध्यमिक व  उच्च माध्यमिक 12 वीची परीक्षा  दि. 21  फेब्रुवारी,. 2023 ते 21 मार्च 2023 आणि इयत्ता 10 वी ची परिक्षा दि. 2 मार्च 2023 ते 25 मार्च, 2023 मध्ये  या कालावधीत होत असून चालू वर्षी मंडळाच्या वतीने 12 वीच्या 101 व 10 वीच्या 156 परिक्षा केंद्रावर जिल्हयात परिक्षा होणार आहेत 15 ठिकाणी परिरक्षक केंद्र आहेत.  परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता तसेच कायदा व  सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीडच्या जिल्हादंडाधिकारी दिपा मुधोळ,मुडे यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये परीक्षा केद्राच्या व परिक्षासाहित्य केंद्राच्या परिसरामध्ये 50 मिटर अतरामध्ये परिसरात  दि. 21 फेब्रुवारी, 2023 ते 25 मार्च, 2023 पर्यंत परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीत मनाई आदेश जारी केले आहेत.             परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी केला असून परीक्षा केंद्राच्या परिसरात 50 मीटर  अंतरापर्यंत शासकीय कर्तव्ये पार पाडणाऱ्

MB NEWS:प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त चित्र प्रदर्शनाला प्रतिसाद

इमेज
  प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त चित्र प्रदर्शनाला  प्रतिसाद  परळी वैजनाथ /प्रतिनिधी महाशिवरात्रीचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय ओम शांतीच्या वतीने आज शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी श्री जगमित्र नागा मंदिर च्या समोर व्यसनमुक्ती, शिव व आत्म्याचे भव्य चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.        आज शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने भव्य व्यसनमुक्ती शिव व आत्म्याचे चित्र प्रदर्शन चे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ्.विवेक दंडे ,शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर,  ज्योती बहेनजी,दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख, ज्येष्ठ नेते राजाभाऊ दहिवाळ शिवसेनेचे शहर संघटक संजय कुकडे, सुनील सोळंके ,विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास नागरिक व भाविक भक्ता

MB NEWS:तीन पक्ष एकत्र आले तरी कसबा, चिंचवड भाजपकडेच कायम राहणार

इमेज
  भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांची कसब्यात पदयात्रा तीन पक्ष एकत्र आले तरी  कसबा, चिंचवड  भाजपकडेच कायम राहणार *पदयात्रेत मतदारांकडून  ठिक ठिकाणी झाले उत्स्फूर्त स्वागत ; दोन्ही मतदारसंघ काढले पिंजून* पुणे । दिनांक २१। महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीनही पक्ष एकत्र आले तरी कसबा आणि चिंचवड हे दोन्ही मतदारसंघ भाजपचा गड राहिलेले आहेत, पोट निवडणुकीनंतर ते कायम आमच्याकडेच राहतील असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. कसब्याचे उमेदवार हेमंत रासने हे मोठया मतांनी विजयी होतील असेही त्या म्हणाल्या.     कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या वतीने आज पदयात्रा काढण्यात आली, त्यावेळी शाहू चौकात मतदारांशी संवाद साधतांना त्यांनी हेमंत रासने यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.  प्रारंभी  भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिराचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरवात करण्यात आली. यावेळी आमदार माधुरीताई मिसाळ यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थि

MB NEWS:छत्रपती शिवरायांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी - उपप्राचार्य सुनील लोमटे

इमेज
  छत्रपती शिवरायांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी - उपप्राचार्य सुनील लोमटे परळी (संजय क्षिरसागर) :- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी इतिहासतज्ञ उपप्राचार्य सुनील लोमटे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले.                          शहरातील थर्मल कॉलनी परिसरातील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य अजय भैय्या सोळंके सर उपस्थित होते. तर मंचावर प्राचार्य एन.एच. शेंडगे, प्रा. आर.एस. स्वामी, प्रा.आर.एम. कोकलगावे, प्रा. डॉ.बी.आर. चव्हाण उपस्थित होते. इतिहासतज्ञ, इतिहासकार उपप्राचार्य सुनील लोमटे यांनी "शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्य " या विषयावर सखोल मार्गदर्शन करत छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांसमोर सादर केला. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक धोरणाम

MB NEWS:21 ते 26 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी 28 फेब्रुवारी रोजी शिबीर

इमेज
  महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबीर - डाॅ.संतोष मुंडे 21 ते 26 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी 28 फेब्रुवारी रोजी शिबीर परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबीर  आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डाॅ.संतोष मुंडे यांनी दिली आहे.        अपंगांचे कैवारी म्हणून ओळख असलेल्या व विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध आरोग्य शिबिरे व उपक्रम राबवणारे प्रसंगी दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डाॅ.संतोष मुंडे यांच्यावतीने मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी स्थळ : डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हॉस्पिटल, अरुणोदय मार्केट समोर, परळी वै. मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबीर आयोजित करण्य

MB NEWS:विनापरवाना गावठी पिस्तूलसह एकाला पकडले

इमेज
  विनापरवाना गावठी पिस्तूलसह एकाला पकडले परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        विनापरवाना गावठी पिस्तूलसह एकाला परळी शहर पोलीसांनी पकडले आहे. दि.19/02/2023 रोजी 20.00 वा चे सुमारास परळी ते अंबाजोगाई रोडवर कॉलेज समोर परळी वै. येथे आरोपीला शिताफीने पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.       याब ाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहीतीनुसार, आरोपी  उमेश निरंजन दामा वय 43 वर्ष रा. रविवार पेठ अंबाजोगाई हा विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वताचे कमरेला गावठी बनावटीचे पीस्टल व दोन जिवंत काडतुसासह बाळगलेले असतांना मिळुन आला. त्याच्याकडून पिस्टल किंमत 17000/- रुपये व प्रत्येकी काडतुस किमत 300/- रुपये प्रमाणे एकुण 17600/- रुपयचा माल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणात फिर्यादी भास्कर गंगाधरराव केंद्रे वय 49 वर्षे व्यवसाय नौकरी पोहेकॉ/562 पो.ठा. परळी शहर यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुरनं- 42 /2023 कलम 3/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास सपोनि सपकाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. Video