इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS:खा.प्रितम मुंडे यांच्या हस्ते सावता माळी मंदिराचे कलशारोहन

खा.प्रितम मुंडे यांच्या हस्ते सावता माळी मंदिराचे कलशारोहन


“स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात" या शिकवणीनुसार काम करण्याचा प्रयत्न - खा. डॉ. प्रितम मुंडे 



भाविकांसोबत पंगतीत घेतला प्रसादाचा लाभ



परळी । दि. २२ ।
कर्म आणि कर्तव्य करत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे या सावता माळी महाराजांच्या शिकवणीनुसार आम्ही समाजकारण करत आहोत. सावता माळी महाराज यांची  ‘स्व कर्मात व्हावे रत मोक्ष मिळे हातोहात' ही शिकवण आम्हाला जनतेची कामे करताना ऊर्जा देते, संतांच्या या शिकवणीनुसार आम्ही लोकसेवेचे कार्य करत राहू असे प्रतिपादन खा.प्रितमताई मुंडे यांनी केले. परळी तालुक्यातील लोणी येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिराचा कलशारोहन सोहळा पार पडल्यानंतर भविकांशी संवाद साधताना खा.प्रितमताई बोलत होत्या.

लोणी येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिराचे कलशारोहन आणि खंडोबा मंदिर सभागृहाचे भूमिपूजन खा.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, जेष्ठ नेते दिलीप आबा बिडगर, राजेश गित्ते, नगरसेवक पवन मुंडे, चंद्रकांत देवकते यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी ह.भ.प बापूसाहेब महाराज उखळीकर यांचे सुश्राव्य कीर्तन श्रवण करून खा.प्रितमताईंनी कलश पूजन केले व उपस्थित भाविक, ग्रामस्थांशी संवाद साधला.

पुढे बोलताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या कि संतांच्या शिकवणीनुसार आम्ही सार्वजनिक जीवनात काम करत आहोत. लोकांच्या अपेक्षांना, विश्वासाला सार्थ ठरेल असे काम करताना कुणाची निंदा करायची नाही, निंदा केल्याने पुण्याचा नाश होतो ही संतांची शिकवण आम्ही बाळगतो.  पंकजाताई जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना मागणी करण्यापूर्वी विकास कामे होत होती, त्यांनी मंजूर केलेल्या कामांचे आजही नारळ फोडले जात आहेत. तेंव्हाची पाच वर्षे अत्यंत सुखात गेली, मधल्या काळात प्रलंबित राहिलेली कामे भविष्यात मार्गी लावली, केलेल्या कामातून ईश्वर प्राप्ती होते ही शिकवण अंगिकरून आम्ही तुमची कामे करत राहू अशी ग्वाही यावेळी खा.प्रितमताईंनी उपस्थितांना दिली. तद्नंतर त्यांनी महिला भाविकांसोबत पंगतीला बसून प्रसादाचा लाभ घेतला व  महिलांशी संवाद साधला.

------------- video news ----------------


------------- video news ----------------

------------- video news ----------------

------------- video news ----------------


------------- video news ----------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....