इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:आर्य समाजातील सप्ताहाची सांगता

 महर्षी दयानंदांमुळे महाशिवरात्र 'बोधप्रद' ठरली -पं. राजवीर शास्त्री




    आर्य समाजातील सप्ताहाची सांगता  

               परळी वैजनाथ दि.२१--

                                     सत्यज्ञान व आत्मकल्याणासाठी मानवाने सतत जागृत राहणे, हा शिवरात्रीचा खरा संदेश असून यातूनच महर्षी दयानंदांनी  ईश्वराचे सत्यस्वरूप जाणण्याचा बोध घेतला. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवरात्र ही बोधप्रद ठरली, असे प्रतिपादन वैदिक विद्वान पं. श्री राजवीर शास्त्री यांनी केले.                                                  येथील आर्य समाजात महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त आयोजित वैदिक विचार प्रचार सप्ताहाची रविवारी सांगता झाली. यावेळी श्री शास्त्रीजी प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रधान श्री जुगलकिशोर लोहिया हे होते, तर याप्रसंगी आचार्य सत्येंद्रजी, सोममुनीजी, विज्ञानमुनीजी हे उपस्थित होते.

        आपल्या मार्गदर्शनपर भाषणात  शास्त्रीजी  म्हणाले- स्वामी दयानंदांनी परंपरागत शिवरात्रीला बोधरात्रीत रूपांतरित करून सत्यज्ञान प्रकाशाच्या दृष्टीने नवा इतिहास रचला. वयाच्या चौदाव्या वर्षी दयानंदांना शिवमंदिरामध्ये ईश्वराचे वास्तविक स्वरूप जाणण्यासाठी बोध झाला. नंतर त्यांनी जीवनभर  शोधासाठी ज्ञान प्राप्त करण्यासाठी साधना केली. याच ज्ञानसाधनेतून समग्र विश्वाला वेदांचे सत्य स्वरूप समजले. यावेळी सोममुनी  व श्री लोहिया यांनीही मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमाच्या प्रारंभी झालेल्या यज्ञात श्री. व सौ. दोडिया श्री व सौ. चाटे, श्री व सौ. भंडारी हे यजमान म्हणून उपस्थित होते. त्यानंतर सौ. रेखा आर्य, सोनाली तिवार, दीक्षा चव्हाण , योगीराज भारती यांनी भजने सादर केली. प्रास्ताविक प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांनी,  तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरुण चव्हाण व प्रा. डॉ. जगदीश कावरे यांनी केले. शेवटी आभार श्री लक्ष्मणराव आर्य गुरुजी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री रंगनाथ तिवार, देविदासराव कावरे, डॉ. वीरेंद्र शास्त्री, जयकिशोर दोडिया,पं. प्रशांतकुमार शास्त्री, जयपाल लाहोटी आदींनी परिश्रम घेतले.

          -स्पर्धांचे पारितोषिक वितरण-------

                      यानिमित्त महर्षी दयानंद यांच्या जीवन, कार्य व विचार या विषयावर घेण्यात आलेल्या शाळा महाविद्यालयांच्या विविध वयोगटातून घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यात प्राथमिक गटातून कु. आकांक्षा महिपाल सावंत (प्रथम),अनुव्रत अरुण चव्हाण (द्वितीय), प्रज्योत नंदकिशोर यादव (तृतीय), स्वराज सोमनाथ गित्ते, सृष्टी शशिकांत निलंगे (उत्तेजनार्थ) यांना पार्वतीबाई व गणेशलाल भंडारी स्मृतिपुरस्कारांनी गौरविण्यात आले. माध्यमिक गटातून कु. श्रीनिधी अगस्ती धोंडगे (प्रथम),वैष्णवी भागवत दौंड (द्वितीय), सार्थ सचिन तोतला (तृतीय), कु. संध्या कराड , हर्ष मोरे व मुस्तकीन शेख (उत्तेजनार्थ) यांना प्रयागबाई व ज्ञानोबा आघाव स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

       महाविद्यालय गटातून कु.रुपाली संतोष साखरे (प्रथम),शुभम शाम हांडे (द्वितीय), पीयुष उत्तम जगताप (तृतीय), मृदुला दौलत आरबुणे, चैताली सचिन दहिभाते, प्रतीक्षा संजय साखरे (उत्तेजनार्थ) यांना मुद्रिकाबाई व प्रल्हादराव चाटे  स्मृति पारितोषिके प्रदान करण्यात आली. तर गुरुकुलीय गटातून  काशिनाथ बळीराम आर्य, अनुवेद सत्येंद्र आर्य (प्रथम),आदित्य सोनेराव आर्य (द्वितीय)व सुजल संभाजी आर्य (तृतीय) , अमर सरयुग आर्य, राचय्या शांतय्या आर्य  (उत्तेजनार्थ) यांना कांताबाई व बाबुलाल भायेकर स्मृती पुरस्कार  देण्यात आली.



------------- video news ----------------


------------- video news ----------------

------------- video news ----------------

------------- video news ----------------


------------- video news ----------------











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!