इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल,लिटिल स्टार इंग्लिश स्कूल व राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल चे आज वार्षिक स्नेहसंमेलन

 द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल,लिटिल स्टार इंग्लिश स्कूल व राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल चे आज वार्षिक स्नेहसंमेलन


 परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

           परळीच्या शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली शाळा म्हणून परिचित असलेल्या मदर टेरेसा सेवाभावी संस्थेच्या द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल, लिटल स्टार इंग्लिश स्कूल आणि राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल या शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज दि.२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. या स्नेहसंमेलनाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

           

         लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी वैद्यनाथ विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक राजनाळे सर हे असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी, बीड जिल्हा आरटीई प्रमुख गौतम चोपडे, राष्ट्रमाता जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष अनिल जाधव, अंबाजोगाई येथील रविवार पेठ क्लस्टर हेड कमलाकर कापसे, कनेरवाडी क्लस्टर हेड घुगे, दैनिक पुढारीचे पत्रकार प्रा. रविंद्र जोशी, मदर टेरेसा शिक्षण संस्थेचे सचिव पी. एल. बागल सर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

          या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या बागल मॅडम, लिटल स्टार इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या आरसुडे मॅडम, सर्व संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.


------------- video news ----------------


------------- video news ----------------

------------- video news ----------------

------------- video news ----------------


------------- video news ----------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!