इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS:बनावट पत्र तयार केले: आ.धनंजय मुंडेंसह तिघांची बदनामी,संस्थेची फसवणुक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद

 नाव,सही व शिक्का वापरत बनावट पत्र तयार केले: आ.धनंजय मुंडेंसह तिघांची बदनामी,संस्थेची फसवणुक केल्याप्रकरणी वैद्यनाथ महाविद्यालयातील चार व अनोळखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल


परळी वैजनाथ,प्रतिनिधी...
         माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे बनावट लेटरहेडचे प्रकरण ताजे असतानाच आता परळीतही बनावट सही शिक्के व कागदपत्र तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.विशेष म्हणजे यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह वैद्यनाथ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सदाशिव मुंडे व प्रा प्रभाकर कराड  यांच्या नावाचा उल्लेख आहे. संस्था अध्यक्षांचे नाव, शिक्का व बनावट सही करून तयार करण्यात आलेल्या या पत्राप्रकरणी जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयातील तीन प्राध्यापक, एक कर्मचारी व अन्य तीन अनोळखी अशा सात जणांविरुद्ध संशयीत म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आहे.

       याबाबत वैद्यनाथ महाविद्यालय परळी वै येथील सेवानिवृत्त प्राचार्य  सदाशीव सिताराम मुंडे वय 78 वर्षे  रा. नाथनगर यांनी पोलीस ठाण्यात सविस्तर  फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार एक बनावट पत्र तयार करण्यात आले असुन यामध्ये बदनामीकारक खोटा मजकूर लिहलेला आहे. बनावट दस्तावेज तयार करुन त्यावर अध्यक्ष म्हणून सदाशीव मुंडे असे नाव, सही व संस्थेचा बनावट शिक्का वापरण्यात आलेला आहे. तसेच बनावट पत्र तयार करून त्याच्या प्रती राज्यपाल कुलपती राजभवन महाराष्ट्र, उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्य मंत्री,  उच्च शिक्षण संचालक पुणे व सर्व विभागीय संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील अधीसभा, विद्यापरिषद आणी अभ्यास मंडळ व निवडणुक प्रक्रियेद्वारे निवडुन आलेले सर्व सदस्य यांना माहीतीस्तव असा उल्लेख असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
      बनावट पत्र तयार करून त्यावर आपल्या सही सारखी सही करून तसेच जवाहर एज्युकेशन संस्थेचा शिक्का वापरून  माझी व संस्थेची फसवणुक केली. तसेच आपली आणि  लोकप्रतिनिधी आ. धनंजय मुंडे व प्रा. प्रभाकर कराड यांच्या नावलौकीकास बाधा येईल व बदनामी व्हावी अशा मजकुराचे पत्र तयार केले. ते शासनास तसेच संस्थेतील ईतर पदाधीकारी यांना पोस्टाद्वारे छायांकीत प्रत प्रसारीत केली. तसेच आपल्या घराचे गेट समोर आणुन टाकली असे सदाशिव मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
       संस्था अध्यक्षांचा शिक्का व बनावट सही करून तयार करण्यात आलेल्या या पत्राप्रकरणी  वैद्यनाथ महाविद्यालयातील  संशयीत आरोपी रमाकांत माणीकराव फड रा. माणीकनगर परळी वै.   संजय भानुदास रनखांबे रा. मिलींद नगर परळी, प्रा. सोमनाथ विश्वनाथ किरवले मु.पो. टाकळी ता. परळी वै., प्रा. सागर उत्तम शिंदे रा. विद्यानगर परळी या प्राध्यापक , कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनि भार्गव सपकाळ हे करीत आहेत.

------------- video news ----------------


------------- video news ----------------

------------- video news ----------------

------------- video news ----------------


------------- video news ----------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....