MB NEWS:संत तुकाराम महाराज नगर वडसावित्री येथे छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी

 संत तुकाराम महाराज नगर वडसावित्री येथे छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी

शिवजयंती निमित्त संत तुकाराम महाराज प्रवेशद्वाराचे लोकार्पण

परळी (प्रतिनिधी)...

 

      शहरातील वडसावित्री भागातील संत तुकाराम महाराज नगर येथे छत्रपती शिवरायांची 393 वी जयंती मोठ्या उत्साहात व समाज उपयोगी उपक्रमांनी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज नगर येथील प्रवेशद्वाराचे  लोकार्पण देखील संत तुकाराम महाराज गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके सर उपाध्यक्ष वैजनाथराव सोळंके सचिव वसंतराव सूर्यवंशी यांच्यासह संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत संत तुकाराम गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रा. शेळके सर यांनी गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या येथील नागरिकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संत तुकाराम महाराज प्रवेशद्वाराचे काम करून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कमानीचे लोकार्पण केले. यावेळी शिवचरित्रावर प्रकाश टाकत आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे विचार अंगीकारत आपली प्रगती साधावी असे प्रतिपादन प्रा. गंगाधर शेळके सर यांनी केले. तर संत तुकाराम गृहनिर्माण संस्थेचे उपाध्यक्ष वैजनाथराव सोळंके यांनी सांगितले की, छत्रपती शिवराय लोक कल्याणकारी राजे होते. स्वराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील हात लावण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती. आजच्या युवक वर्गाने छत्रपती शिवरायांच्या विधायकवादी विचारांचा स्वीकार करत समाजाचा उत्कर्ष साधावा असे प्रतिपादन वैजनाथ सोळंके यांनी केले. भव्य दिव्य अशा या शिवजयंती समारोहास व संत तुकाराम नगर  प्रवेशद्वार लोकार्पण प्रसंगी संत तुकाराम गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रा. गंगाधर शेळके सर, उपाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, उपाध्यक्ष वैजनाथ भास्कर, सचिव वसंतराव सूर्यवंशी, संचालक वैजनाथ सूर्यवंशी,सुनील देशमुख,श्री बालासाहेब कडबाने, ऍड मराठे साहेब, नाणेकर सर ,ऍड. रणजित सोळंके,पद्माकर भंडारे, श्री चंद्रकांत टाक,श्री नागेश गवळी,श्री शंकर शिंदे प्रा.अशोक देशमुख दत्तात्रय चव्हाण नानेकर अशोक आदींसह संस्थेचे सर्व संचालक, सर्व मार्गदर्शक, विविध मान्यवर, तसेच या भागातील शेकडो शिवप्रेमी नागरिकांची तथा माता भगिनी, आबालवृद्ध आदींची उपस्थिती होती.

------------- video news ----------------


------------- video news ----------------

------------- video news ----------------

------------- video news ----------------


------------- video news ----------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !