इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS:शिक्षकांनीच फोडला इंग्रजीचा पेपर:सहा शिक्षकांना अटक

 शिक्षकांनीच फोडला इंग्रजीचा पेपर:सहा शिक्षकांना अटक



परभणी.....

बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांनीच पेपर फोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहा शिक्षकांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्ञानदानाचे काम करण्याची जबाबदारी असणाऱ्या गुरूंनीच हे असले धंदे सुरु केल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला !

संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. परंतु, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणाऱ्या या परीक्षेबाबत परभणीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

महालिंगेश्वर विद्यालयात घडला प्रकार....

परीक्षा केंद्र असलेल्या महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनीच इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत असल्याचा प्रकार समोर आला. इंग्रजीचा पेपर अकरा वाजता देण्यात आला. हा पेपर देताच दोन शिक्षकांनी त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपद्वारे इतर शिक्षकांना पाठवला. हे शिक्षक महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका खोलीत बसून त्याची विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करत होते. ही बाब समजताच सोनपेठ पोलीस ठाण्याच्या एका पथकाने त्यांना पकडले.


------------- video news ----------------


------------- video news ----------------

------------- video news ----------------

------------- video news ----------------


------------- video news ----------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....