इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS:महाराष्ट्रातील चार खासदारांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड

 महाराष्ट्रातील चार खासदारांची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड




नवी दिल्ली : वृत्तसंस्था : यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांची घोषणा झाली असून विजेत्या १३ खासदारांत महाराष्ट्रातील लोकसभा खासदार भाजपचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे, भाजपच्या हिना गावित, राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान या चार खासदारांचा समावेश आहे.

यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये १३ खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार टी. के. रंगराजन यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

      केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या अध्यक्षतेखालील आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. कृष्णमूर्ती यांच्या सहअध्यक्षतेखालील निवड समितीकडून संसदरत्न विजेत्यांची निवड करण्यात आली. लोकसभेतील आठ खासदार लोकसभा खासदारांमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, भाजपचे विद्युत बरन महतो, भाजपचे डॉ. सुकांत मजुमदार, काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा, भाजप खासदार हिना विजयकुमार गावित, भाजपचे गोपाळ शेट्टी, भाजपचे सुधीर गुप्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


------------- video news ----------------


------------- video news ----------------

------------- video news ----------------

------------- video news ----------------


------------- video news ----------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....