पोस्ट्स

एमपीजे ने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

इमेज
किशोरवयीन मुलींना नियमितपणे पूरक पोषण आहार देण्याची व्यवस्था करा - मागणी  सशक्त आंगणवाडी निरोगी समाज अभियानाअंतर्गत मागणी  एमपीजे ने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन परळी :राज्यात कुपोषण ( Malnutrition )आणि रक्ताची कमतरता ( Anemia )ही गंभीर समस्या आहे . मुव्हमेन्ट फॉर पीस अँन्ड जस्टिस फॉर वेल्फेअर या जन अधिकारासाठी कार्यरत सामाजिक संघटनेतर्फे राज्यव्यापी अभियान सशक्त अंगणवाडी निरोगी समाज राबविण्यात आले . या अभियानांतर्गत निष्कर्षात आलेल्या दोन मागण्या मुख्यमंत्री यांना करण्यात आल्या .  महिला व बालकांना आवश्यक आरोग्य, पोषण आणि प्राथमिक शिक्षण सेवा पुरविणारे आंगनवाड्या  हे एक महत्वाचे सार्वजनिक केन्द्र म्हणून काम करते हे सर्वज्ञात आहे  परंतु  आपल्या राज्यात लोकसंख्येनुसार अंगणवाडी केंद्रे नाहीत , ही खेदाची बाब आहे.  पुरेशा संख्येने अंगणवाडी केंद्रे उपलब्ध नसल्यामुळे अनेक लोक त्याच्या लाभापासून वंचित राहतात या व्यतिरिक्त महाराष्ट्रात मोठ्या संख्येने किशोरवयीन मुली कुपोषण आणि एनिमियाच्या बळी पडल्या आहेत, ज्यांना अंगणवाडीव्दारे पूरक पोषण आहार देण्याची तरतूद आहे.  परंतु अशक्तपणाने ग्रस्त असलेल्य

राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे आंदोलन

इमेज
संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारत केला निषेध महात्मा ज्योतिबा फुले प्रेमींचे राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे आंदोलन  परळी (प्रतिनिधी)   महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठाणचे संभाजी भिडे यांचा म.फुलेप्रेमींच्या वतिने राणी लक्ष्मीबाई टावर येथे मंगळवार दि.1 ऑगस्ट रोजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध केला.भिडे यांच्याविरुध्द कठोर कारवाई करावी या मागणीचे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.  संभाजी भिडे यांनी दोन दिवसापुर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजीक कार्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर समाजातुन निषेध व्यक्त होत आहे.परळी शहरातील महात्मा ज्योतिराव फुले प्रेमींनी मंगळवार दि.1 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारत निषेध नोंदवला यानंतर तहसिलदार यांना मागण्यांचे निवेदन देत भिडे यांच्याविरुध्द कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.यावेळी सचिन आरसुडे,दत्ता लोखंडे,राजकुमार डाके,बाळू फुले अनिल शिंदे,हनुमान आगरकर,नवनाथ खेत्रे,उत्तम लोखंडे,बालासाहेब लोखंडे,धनंजय आढाव,सुनील काळे,रमेश

विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची गरज प्राचार्या- डॉ विद्याताई देशपांडे

इमेज
  स्वातंत्र्याच्या विचाराचा पाया लोकमान्य टिळकांनी रचला-प्रा.डॉ विनोद जगतकर विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची गरज प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे परळी वैजनाथ  दि.०१ (प्रतिनिधी)             टिळक हिंदूवादी होते, पण त्यांनी इतर कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही. प्रचंड स्मरणशक्ती असलेले काँग्रेसचे नेते व स्वातंत्र्याच्या विचाराचा पाया लोकमान्य टिळकांनी रचला असे प्रतिपादन प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी केले तर विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांनी केले.               येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मंगळवारी (ता ०१) आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विनोद जगतकर, क्रिडा विभाग प्रमुख प्रा. डॉ प्रविण दिग्र

उपजिल्हा रुग्णालय:जयंती साजरी

इमेज
  परळी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी परळी वैजनाथ प्रतिनिधी...   परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत, त्यांना अभिवादन करून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे, प्रमुख अतिथी तथा भाजपाचे युवा नेते आश्विन मोगरकर, दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी श्रीराम लांडगे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.         अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज येथील परळी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.याप्रसंगी परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे, प्रमुख अतिथी तथा भाजपाचे युवा नेते आश्विन मोगरकर, दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी श्रीराम लांडगे, डॉ. रामधन कराड, मेट्रन गायकवाड सिस्टर परळी उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सिस्टर, ब्रदर आदींची उपस्थिती होती.
इमेज
  आशा व गटप्रर्वतकांच्या मागण्या बाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....           आशा व गटप्रर्वतकांच्या मागण्या बाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन  देण्यात आले असुन या मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अशी मागणी परळी तालुका आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनने केली आहे.        याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की,'सीटू' च्या वतीने दिनांक ०९ ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व कामगार संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे व निदर्शने करणार आहेत त्याच्याच भाग म्हणून बीड जिल्हयातील आशा व गटप्रवर्तक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढणार आहेत तेव्हा आपण तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांना ०९ ऑगस्ट रोजी कोणतेही कामे लावू नयेत. जिल्हातील सर्वा तालुका अधिका-यांनी केंद्र सरकारचा कोवीड भत्ता ऑक्टोंबर २१ ते मार्च २२ या सहा महिन्याचा प्रती महिना १०००/- प्रमाणे ६०००/- रू. दिले आहेत आपणच तो दिला नाही तेंव्हा तो तात्काळ द्यावा. एप्रील २०२३ ते जून २०२३ ची वाढ अनेक जिल्हयात दिली जात आहे तेंव्हा आपण आशांना १५०००/- व गटप्रर्तकांना १८६००/- वाढ तात्काळ द्यावी.एप्रील ते जून २३

धनंजय मुंडेंनी केलं जोशी कुटुंबियांचे सांत्वन

इमेज
  धनंजय मुंडेंनी केलं जोशी कुटुंबियांचे सांत्वन  अंबाजोगाई, प्रतिनिधी....        राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज अंबाजोगाई येथे दिवंगत पत्रकार प्रशांत जोशी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.        दै.मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांच्या निधनाने परळीच्या पत्रकारितेत मोठी हानी झाली.त्यांच्या निधनाने जोशी कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.या दुःखात आपण या परिवारासोबत असल्याची भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.यावेळी त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी उपस्थित होते.

कलरफुल पक्षी निरिक्षण: पत्रकार अनुप कुसुमकर

इमेज
  कलरफुल पक्षी निरिक्षण: पत्रकार अनुप कुसुमकर आज सकाळी गच्चीवर फिरत असताना आढळून आलेला अनोळखी पाहूणा... मोबाईल कॅमेऱ्यात फोटो कैद करून त्याची माहिती गुगल वर शोधत असताना जे नाव फक्त ऐकण्यात होते ते आज प्रत्यक्ष पाहण्यासाठी मिळाले याचा आंनद झाला. कॉमन किंगफिशर अर्थात इंडियन किंगफिशर हे पक्षी युरेशियन किंगफिशर आणि रिव्हर किंगफिशर म्हणूनही ओळखले जाते. किंगफिशरची ही एक छोटी प्रजाती आहे ज्यात सात उपप्रजाती युरेशिया आणि उत्तर आफ्रिकेतील विस्तृत वितरणामध्ये ओळखल्या जातात . हे त्याच्या बर्‍याच भागात रहिवासी आहे, परंतु हिवाळ्यात नद्या गोठवलेल्या भागातून स्थलांतरित होतात. या चिमणीच्या आकाराच्या पक्ष्याचे वैशिष्ट्यपूर्ण लहान शेपटी, मोठ्या डोक्याचे किंगफिशर प्रोफाइल आहे; त्याचा वरचा भाग निळा, नारिंगी अंडरपार्ट आणि एक लांब बिल आहे. हे मुख्यतः मासे खातात, डायव्हिंगद्वारे पकडले जाते आणि पाण्याखाली शिकार पाहण्यास सक्षम असे डोळे असतात.      खंड्या   किंवा   किलकिल्या   (शास्त्रीय नाव :   Halcyon smyrnensis  ;   इंग्लिश :   White Breasted Kingfisher ,   व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर ) हा लहान आकारातील पाणथ

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मित्र मंडळाच्या वतीने केले अभिवादन!

इमेज
  लोकशाहिर   अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून सामान्य माणसाच्या व्यथा मांडल्या—अँड.मनोज संकाये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मित्र मंडळाच्या वतीने केले अभिवादन! परळी वैजनाथ प्रतिनिधी   संबंध महाराष्ट्रामध्ये १ ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते यावर्षी अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने बस स्टँड जवळील अण्णाभाऊ साठे चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी केली. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या व्यथा मांडल्या असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केले.    दीड दिवसाची शाळा शिकून त्यांनी साहित्यामध्ये विपुल लेखन केले आहे. ते कादंबरीकार, नाट्यकार, कथालेखक, अशा नाविन्यपूर्ण क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य आहे. त्यांनी साहित्यामध्ये पोवाडे, नाटके ,कथा, प्रवास वर्णन, कादंबरी इत्यादी साहित्यात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. जग बदलूनी घाव मज सांगून गेले भीमराव हे गीत अतिशय लोकप्रिय झाले. त्यांनी अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला विशेषतः कामगार वर्गावर होत असलेल्या अन्यायावर आपल्या साहित्यातून टीका केली. तसेच दलि

अभिवादन: लोकशाहिरांना

इमेज
परळीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंनी केले अभिवादन परळी वैद्यनाथ (दि. 01) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त परळी वैद्यनाथ शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार व कार्य आम्हाला कायम प्रेरणा देत राहतील, असे यानिमित्ताने धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी वैद्यनाथ स.कारखान्याचे संचालक अजय मुंडे, रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, शहाराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, के डी उपाडे, पी जी मस्के, हनुमंत गायकवाड, रमेश मस्के, जितेंद्र मस्के, वसंतराव उदार, नानाभाई पठाण, नाजीर हुसेन, सोफीया नंबरदार, शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव शिंदे, वैजनाथराव माने शिंदे, लहुजी क्रांती सेनेचे भागवत वाघमारे, निलेश सगट आदी उपस्थित होते. ••• VIDEO NEWS GALLERY 

Classmates:स्नेहमिलन

इमेज
  23 वर्षानंतर एकत्र:वर्गमित्र-मत्रिणींचा स्नेहमिलन सोहळा  परळी वैजनाथ,प्रतिनिधी...  येथील श्री सरस्वती विद्यालय, परळी वैजनाथ 1999- 2000 च्या दहावीच्या बॅचचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सकाळी ८.०० वा श्री सरस्वती विद्यालय परळी वैजनाथ येथे राष्ट्रगीता पासून सर्वात नंतर हलगे गार्डन यथे मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमात मान्यवर मध्ये श्री कवडे सर, देशपांडे सर, चाटे सर, सोंदले सर, पोहणेरकर सर, रोडगे सर, बजाज मदम व टाले मॅडम, गडम सर या सर्वांची उपस्थिती होती. सर्वांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कृतज्ञता पर भाषण व प्रास्ताविक श्रीनिवास बरडे यांनी व्यक्त केले, श्री कवडे सर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबोली जोशी यांनी केले केले तर योगेश नानवटे यांनी आभार मानले.      कार्यक्रमासाठी योगेश नानवटे, श्रीनिवास बरडे, भाऊड्या कराड,सूरज लाहोटी, किशोरकुलकर्णी, गणेश गांडूळे व धवल जैन, अतिश काटकर, इम्रान खतिब, जहुर शेख, यांनी परिश्रम घेतले.तसेच सर्व मुलींना एकत्र करण्याचे काम स्नेहा हलगे व शीतल चांडक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला 120 सवंगड्यांची उपस्थिती होती. •••

भागवत वारकरी महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

इमेज
वारकऱ्यांनी समाजाला सावध करावे-शरद पवार यांचे आवाहन पुणे (प्रतिनिधी)  :  सध्या काही विघ्नसंतोषि प्रवृत्तीचे लोक सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करीत आहेत. राष्ट्रीय प्रतिकं, महामानव यांच्या विषयी अपशब्द वापरून समाजात असंतोष निर्माण करीत आहेत, अशा प्रवृत्तीपासून समाजाला सावध करण्याचे काम वारकऱ्यांनी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी केले.  भागवत वारकरी महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यावेळी शरद पवार बोलत होते. शिवाजी महाराज यांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना सोबत घेऊन रतेचे राज्य निर्माण केले. संतांनी जातीय-धार्मिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांचेच नाव घेऊन समाजात असंतोष पसरविण्याचे कारस्थानकाही लोक करीत आहेत, असा टोला संभाजी भिडेचे नाव न घेता त्यांनी लागावला. या कारस्थानापासून समाजाला सावध करण्याचे काम वारकऱ्यांनी करावे, असे आवाहन पवार यांनी केले. भागवत वारकरी महासंघाचे समन्वयक ह.भ.प. विकास लवांडे यांनी प्रास्ताविक केले तर ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी समाजात शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठ

महात्मा फुलेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

इमेज
  संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ  दि.१ रोजी जोडे मारो आंदोलन; सहभागी व्हा-दत्ता लोखंडे परळी (प्रतिनिधी):-महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबत केलेल्या त्या वक्तव्याबाबत परळी शहर व तालुक्यातील समस्त फुले प्रेमींच्या वतीने राणी लक्ष्मीबाई टावर येथे संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्ता लोखंडे यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.      याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संभाजी भिडे यांनी एका कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल अत्यंत  निंदनीय वक्तव्य करून तमाम फुले प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. सर्वांचे दैवत महात्मा ज्योतिराव फुले व माता सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल जे वारंवार आक्षेपार्ह  विधान केले जात आहेत. जाणून बुजून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न संभाजी भिडे हा इसम करीत आहे. त्या संदर्भामध्ये आज दि. 01/08/2023 रोजी  सकाळी  12 वा  राणी लक्ष्मीबाई टावर जवळ जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात तमाम बहुजन समाजातील सर्व युवक बांधवांना सहभाग नोंदवावा. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते

ऍड.सुभाष गित्ते यांना मातृशोक !

इमेज
  भागीरथीबाई गित्ते यांचे निधन;ॲड.सुभाष गित्ते यांना मातृशोक  परळी (प्रतीनिधी)परळी तालुक्यातील नंदागौळ येथील भागीरथीबाई मारोती गित्ते वय 80 वर्ष यांचे आज 31 जुलै रोजी पहाटे 4 च्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले . त्यांना धार्मिक कार्याची आवड होती व मनमिळाऊ स्वभाव असलेल्या व्यक्तीमत्व म्हणून परिचित होत्या,त्या परळी येथील प्रसिद्ध विधिज्ञ तथा नोटरी ऍड.सुभाष मारोती गित्ते यांच्या मातोश्री होत्या,त्यांच्या पश्चात एक मुलगा,चार मुली, सुन,नातवंडे असा परिवार आहे.

डोळ्यांचे आरोग्य आणि काळजी...

इमेज
डोळ्यांची विषाणूजन्य साथ: आवश्यक काळजी घ्यावी-डॉ.गोपाल झंवर परळी / प्रतिनिधी बीड जिल्ह्यामध्ये डोळे येण्याच्या संसर्गामध्ये अद्याप लक्षणीय वाढ झालेली नाही.मात्र सध्या सवर्ञ पाऊस सुरू असल्याने हवेतील आर्द्रता वाढून डोळे येण्याची विषाणूजन्य साथ पसरू शकते.ही साथ अत्यंत सांसर्गिक आहे. तिचा प्रसार रोखण्यासाठी डोळ्यांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे.तसेच जिल्हयामध्ये डोळे येण्याची साथ पसरू नये म्हणून आरोग्यविषयक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.अशी माहिती सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ श्री डॉ.गोपालजी झंवर यांनी राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे आज विद्यार्थ्यांना डोळ्यांचे आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी विशेष उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.      महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत.वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता सर्व सरकारीआणि खासगी दवाखान्यांना सतर्क केले आहे.जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे,डोळे येण्याची साथ पसरू नये यासाठी ज्या परिसरात अधिक रुग्ण आहेत, तेथे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचारी घरोघ

'धनुभाऊंचा' एक फोन अन्........

इमेज
  रात्रीच्या ९ वा.फोन आला..... दुपारपासून बसलोत पण बस उपलब्ध नाही...! 'धनुभाऊंचा' एक फोन अन् तुळजापूरमध्ये अडकून पडलेल्या २०० प्रवाशांचा प्रवास सुखकर  बीड : सध्या अधिक मासाचा महिना सुरू असल्याने वारकरी पंढरपूर आणि तुळजापूर मध्ये दर्शनासाठी येत असून त्यांची तीर्थ स्थळी गर्दी होते. यात एसटी बसने प्रवास करणाऱ्या वारकऱ्याची संख्या मोठी आहे, त्यामुळे रविवारी संभाजीनगर आणि जालना येथे जाण्यासाठी दोनशे पेक्षा अधिक वारकरी लहान लहान मुलांसह रविवारी दुपारी 3 वाजल्या पासून तुळजापूर बस स्थानकात बसले होते. मात्र बस मिळत नसल्यानी त्यांचे बस स्थानकात हाल सुरू होते.  याबाबत जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे बीड प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून रात्री 9 च्या सुमारास कळवली, माहिती मिळताच धनंजय मुंडे यांनी रात्री तुळजापूर आगार प्रमुखांशी बोलून दोन बस गाड्यांची व्यवस्था करण्यास सांगितली. संभाजीनगर जालना आणि बीडच्या वारकऱ्यांना सुखरूप घरी पोहोचवले, त्यामुळे अडकलेल्या संपूर्ण वारकऱ्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. ••• VIDEO NEWS GALLERY 

शोकसभेचे आयोजन

इमेज
  ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परळीत 2 ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन परळी,( प्रतिनिधी):- दैनिक मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी यांचे दि. 30 जुलै 2023 रोजी दुःखद निधन झाले. या निधनामुळे वृत्तपत्र क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. प्रशांत प्रभाकर जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परळीत औद्योगिक वसाहतीच्या सभागृहात दिनांक 2 ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.   प्रशांत जोशी यांच्या अकाली निधनाने परळीतील वृत्तपत्र क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण  झाली आहे. याबद्दल दैनिक मराठवाडा साथी परिवार व समस्त पत्रकार व मित्र मंडळ परळी च्या वतीने दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11  वाजता औद्योगिक वसाहत सभागृह येथे शोकसभेचे आयोजन केले आहे.     या कार्यक्रमास परळी शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार, सर्वसामान्य नागरिक, हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन दैनिक मराठवाडा साथी परिवार व समस्त पत्रकार मित्रमंडळी यांनी केले आहे.
इमेज
  पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता तीन ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार - धनंजय मुंडे यांची माहिती राज्यात आतापर्यंत एक कोटी पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला पीक विमा; मागील 24 तासात सात लाख वीस हजार शेतकऱ्यांची नोंद मुंबई (31) - पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती.   Click:  ▪️ राष्ट्रीय संत मोरारी बापू यांनी परळीत येउन पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचे घेतले दर्शन _कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले स्वागत व सारथ्य, दर्शनालाही उपस्थिती_ आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख

लवकरच परळीत रामकथेसाठी येणार - मोरारी बापू

इमेज
  राष्ट्रीय संत मोरारी बापू यांनी परळीत येउन पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचे घेतले दर्शन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले स्वागत व सारथ्य, दर्शनालाही उपस्थिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले स्वागत व सारथ्य, दर्शनालाही उपस्थिती मोरारी बापू 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रेवर, दोन विशेष ट्रेनने तब्बल 960 जणांसह प्रवास नमामी वैद्यनाथमच्या जयघोषाने वैद्यनाथ मंदिर परिसर दुमदुमला परळी वैद्यनाथ (दि. 31) - राष्ट्रीय संत तथा रामचरितमानसचे प्रसिद्ध कथाकार म्हणून देशातच नव्हे तर जगभरात ओळख असलेले मोरारी बापू यांनी आज परळी शहरामध्ये येऊन बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे मनोभावे दर्शन घेऊन पूजन केले. यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती.  कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मोरारी बापू यांचे परळी वैद्यनाथ रेल्वे स्थानकावर स्वागत केले. तसेच स्वतः वाहनाचे सारथ्य करत ते मोरारी बापू यांच्या समवेत वैद्यनाथ मंदिरात दर्शनासही उपस्थित होते.       रामचरितमानस या ग्रंथाचे प्रसिद्ध कथाकार संत मोरारी बापू हे तब्बल 960 भक्तगणांसह देशातील बारा ज्योतिर्लिंगांच्या यात्र