एमपीजे ने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

किशोरवयीन मुलींना नियमितपणे पूरक पोषण आहार देण्याची व्यवस्था करा - मागणी

 सशक्त आंगणवाडी निरोगी समाज अभियानाअंतर्गत मागणी


 एमपीजे ने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन


परळी :राज्यात कुपोषण ( Malnutrition )आणि रक्ताची कमतरता ( Anemia )ही गंभीर समस्या आहे . मुव्हमेन्ट फॉर पीस अँन्ड जस्टिस फॉर वेल्फेअर या जन अधिकारासाठी कार्यरत सामाजिक संघटनेतर्फे राज्यव्यापी अभियान सशक्त अंगणवाडी निरोगी समाज राबविण्यात आले . या अभियानांतर्गत निष्कर्षात आलेल्या दोन मागण्या मुख्यमंत्री यांना करण्यात आल्या .


 महिला व बालकांना आवश्यक आरोग्य, पोषण आणि प्राथमिक शिक्षण सेवा पुरविणारे आंगनवाड्या  हे एक महत्वाचे सार्वजनिक केन्द्र म्हणून काम करते हे सर्वज्ञात आहे

 परंतु  आपल्या राज्यात लोकसंख्येनुसार अंगणवाडी केंद्रे नाहीत , ही खेदाची बाब आहे.  पुरेशा संख्येने अंगणवाडी केंद्रे उपलब्ध नसल्यामुळे अनेक लोक त्याच्या लाभापासून वंचित राहतात


या व्यतिरिक्त महाराष्ट्रात मोठ्या संख्येने किशोरवयीन मुली कुपोषण आणि एनिमियाच्या बळी पडल्या आहेत, ज्यांना अंगणवाडीव्दारे पूरक पोषण आहार देण्याची तरतूद आहे.  परंतु अशक्तपणाने ग्रस्त असलेल्या किशोरवयीन मुलींना पोषक आहार

 पोषणाचा अभाव, या मुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर दीर्घकालीन विपरित परिणाम होतो .

 आणि कुपोषणाचे हे चक्र तिच्या  भविष्यातील आरोग्य, उत्पादकता आणि कालखंडाच्या विकासाला 

 आधार देण्यात मूलभूत भूमिका बजावते.त्यामुळे 

1 -राज्यात लोकसंख्येनुसार अंगणवाडी केंद्रे स्थापन करून त्याच्या सेवा सर्वांसाठी उपलब्ध कराव्या 

2 - किशोरवयीन मुलींना नियमितपणे 

 पूरक पोषण आहार देण्याची व्यवस्था करावी.


अशी मागणी एमपीजे परळी तर्फे देण्यात आलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली यावेळ एम पी जे जिल्हाध्यक्ष सय्यद सबाहत आली, उपाध्यक्ष सय्यद हिना वजाहत अली, परळी अध्यक्ष अब्दुल हफिझ, शेख मिनहाज, सय्यद अब्बास, सय्यद अहमद शेख अबुतलाह,शिरीन काकर ,बीबी मरियम, सय्यद तुबा ,नगमा मुनीर शेख उपस्थित होते.



 •••

VIDEO NEWS GALLERY 



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !