इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची गरज प्राचार्या- डॉ विद्याताई देशपांडे

 स्वातंत्र्याच्या विचाराचा पाया लोकमान्य टिळकांनी रचला-प्रा.डॉ विनोद जगतकर

विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची गरज प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे


परळी वैजनाथ  दि.०१ (प्रतिनिधी)

            टिळक हिंदूवादी होते, पण त्यांनी इतर कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही. प्रचंड स्मरणशक्ती असलेले काँग्रेसचे नेते व स्वातंत्र्याच्या विचाराचा पाया लोकमान्य टिळकांनी रचला असे प्रतिपादन प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी केले तर विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे यांनी केले.

              येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मंगळवारी (ता ०१) आयोजित लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ विद्याताई देशपांडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विनोद जगतकर, क्रिडा विभाग प्रमुख प्रा. डॉ प्रविण दिग्रसकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना प्रा डॉ जगतकर म्हणाले की, लोकमान्य टिळक बालपणापासून निडर,धाडसी होते. देशाला स्वातंत्र्य अगोदर मिळाले पाहिजे असा त्यांचा जहाल विचार होता. तर ज्या साहित्यरत्न आण्णाभाऊंनी वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास केला तेच आण्णाभाऊ नंतर विमानाने मास्को पोहचले.ते आपल्या साहित्याच्या जोरावर, आण्णाभाऊंनी पंतप्रधान नेहरुंची भेट टाळली होती. असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. प्राचार्या डॉ देशपांडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले की, आजच्या काळातही महामानवाच्या विचारांचा जागर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी प्रा डॉ प्रविण दिग्रसकर सह विद्यार्थी वैष्णवी बोबडे, तनुराणी गित्ते, आकांक्षा मुरकुटे, अश्विनी कराड,मुस्कान शेख यांनी मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा प्रविण फुटके, सूत्रसंचालन समृद्धी फड,प्रतिक्षा हाके यांनी तर आभार योगिनी गित्ते हीने मानले. कार्यक्रमास प्रा.प्रविण नव्हाडे, प्रा.विना पारेकरसह विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!