आशा व गटप्रर्वतकांच्या मागण्या बाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

          आशा व गटप्रर्वतकांच्या मागण्या बाबत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन  देण्यात आले असुन या मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात अशी मागणी परळी तालुका आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनने केली आहे.

       याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की,'सीटू' च्या वतीने दिनांक ०९ ऑगस्ट रोजी देशभरातील सर्व कामगार संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे व निदर्शने करणार आहेत त्याच्याच भाग म्हणून बीड जिल्हयातील आशा व गटप्रवर्तक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढणार आहेत तेव्हा आपण तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांना ०९ ऑगस्ट रोजी कोणतेही कामे लावू नयेत. जिल्हातील सर्वा तालुका अधिका-यांनी केंद्र सरकारचा कोवीड भत्ता ऑक्टोंबर २१ ते मार्च २२ या सहा महिन्याचा प्रती महिना १०००/- प्रमाणे ६०००/- रू. दिले आहेत आपणच तो दिला नाही तेंव्हा तो तात्काळ द्यावा. एप्रील २०२३ ते जून २०२३ ची वाढ अनेक जिल्हयात दिली जात आहे तेंव्हा आपण आशांना १५०००/- व गटप्रर्तकांना १८६००/- वाढ तात्काळ द्यावी.एप्रील ते जून २३ चे आरोग्य वर्धीनीचे मानधन देण्यात यावे. ३१ जुलै पर्यंत आशानी काढलेल्या आभा कार्डचा मोबदला देण्यात यावा.दररोज २०० आभा कार्ड काढण्याची सक्ती करू नये. मेंदू ज्वर (JE) चा डोस उपलब्ध नसतो तो उपलब्ध करावा तो उपलब्ध झाला नाही तरी (MR) डोसचा लाभ द्यावा. आदी मागण्याचा आपण सहानभुतीपुर्वक विचार करुन तात्काळ मंजुर कराव्यात अशी मागणी संघटनेचे नेते प्रा.बी.जी.खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुका आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन अध्यक्षा आशा लांडगे,  उपाध्यक्ष किरण सावजी, फरजाना शेख, सरचिटणीस अनिता चाटे, भारती राख, कोषाध्यक्ष सुवर्णा रेवले, सदस्य लता आघाव, अर्चना मस्के,उमा वाघमारे, आशा देशमुख, राजश्री थावरे, हेमा काळे, अनिता गिराम, छाया रणदिवे, सावित्रा कदम, सुवर्णा मुंडे, सुनीता होळंबे आदींनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !